Latest Post

बेलापुर  (प्रतिनीधी )- येथील बेलापुर एज्युकेशन संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक भगवान क्षिरसागर यांना चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे               भगवान क्षिरसागर यांना मुंबई तसेच पुणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धेत पहीला व दुसरा क्रमांक मिळालेला आहे .आज विवाह ही एक गंभीर समस्या बनलेली आहे ,विवाह समस्येबाबत सलग दिड वर्ष त्यांनी व्यंगचित्र मालीका विविध वृत्तपत्रामधुन सादर केले तसेच व्यसनमूक्तीवर हसत खेळत व्यसनमूक्ती हे सुमारे तिनशे वात्रटीका व व्यंगचित्र असलेले पुस्तकही प्रकाशित झालेले आहे भगवान क्षिरसागर यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल श्री संत शिरोमणी रोहीदास महाराज चर्मकार विकास संघ यांच्या वतीने समाजभूषण हा पुरस्कार देवुन गौरविण्यात आहे त्याबद्दल खासदार सदाशिव लोखंडे   माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे भास्करराव खंडागळे सुनिल मुथा देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम आदिंनी अभिनंदन केले आहे

बेलापूर (प्रतिनिधी): बेलापूर ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा "आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार" चे वितरण महसूलमंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते तसेच खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धराम शालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियांका कुऱ्हे, सुशिलाबाई पवार, वैभव कुऱ्हे आदींनी स्विकारला.                               सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला.                                                   बेलापूर ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजने अंतर्गत १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना,साठवण तलाव,बंदिस्त गटारीची कामे,नियमित घंटागाडीव्दारे कचरा संकलन,नियमित लसीकरण,घरकुल योजनेची काटेकोर अंमलबजावणी ,विना पोलिस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक ,विविध सांस्कृतिक उपक्रम,क्रीडा स्पर्धा,दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण आदि कामे करुन पुरस्कारासाठीची निकषपूर्ती केल्याने सदरचा पुरस्कार देण्यात आला.                   सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी            ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे, भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे हाजी ईस्माईल शेख, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर बंगाळ, माजी उपसरपंच प्रकाश नाईक, बाबुराव पवार, गोपी दाणी, बाबुलाल पठाण, महेश कुऱ्हे, भाऊसाहेब तेलोरे, भैय्या शेख, मधुकर अनाप, अली शेख, मछिंद्र खोसे, सुभाष रशिनकर आदी उपस्थित होते.

राहता (गौरव डेंगळे): प.पू गुरुमाऊलींचे आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साकुरी ता.राहता जि. अहमदनगर येथे दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य एक दिवसीय श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ (मोठा ग्रंथ) पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून ३५१ सेविकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी नवनाथ पाराण्याची सेवा रुजू केली.सेवा सकाळी ७:०० वाजता सुरू झाली तर सायंकाळी ४:३० वाजता संपन्न झाली व त्यानंतर आयोजकाकडून प्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. साकुरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र हे राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी त्रिकाल आरती, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी प्रश्न-उत्तर विभाग, रविवारी बालसंस्कार व ग्राम अभियान तसेच रविवारच्या दिवशी विवाह मंडळाचे कामकाज सुरू असते.केंद्र प्रतिनिधी म्हणून प्रभाकर दंडवते, गुरुपीठ प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण पांगरकर शास्त्री,बाल संस्कार प्रतिनिधी म्हणून उज्वला बावके,ग्राम अभियान प्रतिनिधी म्हणून उर्मिला गायकवाड,कृषी प्रतिनिधी म्हणून निर्मला पोटे तर विवाह मंडळ प्रतिनिधी म्हणून शालिनी वाणी काम बघतात.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने मानव सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्य सुतार समाजाचे विभागीय अध्यक्ष अँड. व्ही. टी. शिंदे ,बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  पत्रकार देविदास देसाई  शेलार बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,शिवाजी पा वाबळे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले ,समता परिषदेचे प्रकाश कुर्हे  ,गणेश लढ्ढा, पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार आदि मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले ,या वेळी बल्लु दायमा अरविंद राठी ,विशाल मेहेत्रे  ,विशाल आंबेकर ,सचिन शर्मा ,बाळासाहेब शर्मा ,सतीश शर्मा शुभम शर्मा ,संजय शर्मा ,राजेंद्र शर्मा ,रामभाऊ वाकचौरे ,गोविंद भराटे ,राजु पोपळघट ,भाऊसाहेब पोपळघट ,निर्मलराज , ईंद्रजीत ,गीरीश परांजपे ,अर्जुन कुर्हे गोरक्षनाथ शिंदे जालींदर शिंदे , आप्पासाहेब महाले , जयराम शर्मा आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

कोपरगाव (गौरव डेंगळे): येथील सोमैया विद्या विहार संचलित 

श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वाहन चालक श्री.शरद अशोकराव त्रिभुवन यांना 

सन २०२३-२४ च्या सर्वोत्तम कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्री शारदा इंग्लिश मिडीयम  स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान श्री.शरद त्रिभुवन यांना प्रमुख पाहुणे श्री.संदीप कोते,

सौ .सारिका कोते,के.जे.सोमैया कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी .एस.यादव,विधीज्ञ 

श्री. सी.एम.वाबळे, शाळेचे प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या सौ.शुभांगी अमृतकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह  प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०००/- प्रदान करण्यात आले.

श्री.त्रिभुवन हे सन २०१६ पासून शारदा शाळेमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असून आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मागील सलग २  वर्षापासून सोमैया वार्षिक पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कारार्थी म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते.संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या भल्या करीता प्रत्येक कामाला त्रिभुवन हे कायम तत्पर असतात. वाहन  चालक म्हणून ते आपली कामगिरी अतिशय चोख  बजावतातच परंतु त्याचबरोबर शाळेतील सर्व कामामध्ये शिक्षकांना सहकार्य देखील करतात.शाळेतील विविध कार्यक्रमासाठी मंडप उभारणी तसेच शाळेतील विविध रंगरंगोटीचे काम यामध्ये ते आपल्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत करतात.शारदा संकुल हे जणू आपलं घरच आहे अशी भावना त्यांच्या मनात नेहमीच असते.त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना हा सर्वोत्तम कर्मचाऱ्यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.श्री.शरद त्रिभुवन यांचे या पुरस्काराबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे माननीय प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपस्थित प्रमुख अतिथी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

श्रीरामपूर, शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्हीआयपी गेस्ट श्रीरामपूर या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकी व प्रवेश सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल भैय्या कोळगे म्हणाले की सध्या देशामध्ये 2024 लोकसभा निवडणूक होणार आहे सध्या देशांमध्ये भाजपचा सरकार आहे या सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी खाजगीकरण भ्रष्टाचार ईडी सीबी आयचा गैरवापर फोडाफोडीचे राजकारण यामुळे जनता त्रस्त झाली आहे या सरकारला खाली खेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी बरोबर युती हो या ना हो परंतु आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला खासदार निवडून द्यायचा आहे यासाठी जनजन पछाडा जीवाचं रान करा असा आव्हान कोळगे यांनी कार्यकर्त्यांना केले, यावेळेस असंख्य महिलांनी पुरुषांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला तसेच काही कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन पदही दिले  त्यामध्ये महिला आघाडीच्या श्रीरामपूर  महासचिव म्हणून दर्शना ताई काळे तालुका संघटक वैशालीताई मुसळे तालुका उपाध्यक्ष ताई जाधव शहराध्यक्ष रिंकू लोखंडे तालुका संघटक रेखाताई बर्डे कार्याध्यक्ष नीताताई साळवे तसेच फादर बॉडी चे  तालुका उपाध्यक्ष शिवा भाऊ साठे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ बारसे तालुका संघटक कृष्णा महांकाळे तालुका संघटक रमेश दिवे शहर उपाध्यक्ष कुणाल भाऊ वाघ  व विद्यार्थी तालुका बॉडी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष संघराज त्रिभुवन शहराध्यक्ष रितेश पाळंदे तालुका उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष  सौरभ जगताप निखिल विघावें कार्याध्यक्ष सार्थक नवले यांच्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दोंदे साहेब महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका सल्लागार ऍड अण्णासाहेब मोहन जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव दिवे सल्लागार लक्ष्मणराव मोहन तालुका कोषाध्यक्ष वसंतराव साळवे  बाबाभाई शेख प्रवीण भाऊ साळवे अब्बास भाई शेख सुमेध भैय्या पडवळ किशोरभाऊ ठोकळ सोपनिल गायकवाड प्रफुल्ल बारसे सुयोग तोरणे रोहित अमोलिक सचिन चक्रनारायण अक्षय चक्रनारायण आकाश भाऊ  आदित्य यादव, प्रशांत चव्हाण कैवल्य लावंड जैद शेख सौरभ जगताप नयन  नवले अजय कमाने तनिष्क वैद्य ओम लेकुरवाळे राज वाकचौरे रवींद्र शिंदे,अक्षय कांगणे, सुरज विटेकर विशाल बनकर, प्रकाश वेताळ ऋषिकेश औताडे,तेजस जगताप , रितेश पाळंदे,,यश गायकवाड,साहिल अटांगरे,निलेश येवलेअधिक कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सुमेधभैय्या पडवळ यांनी केला

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :अहमदनगर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने २१ वर्षाखालील मुले व मुली यांची पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेकरिता -  जिल्हास्तरीय निवड चाचणी सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी १०:०० वा महाले पोदार,श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री नितीन बलराज यांनी दिली.पात्र खेळाडूंची जन्मतारीख १/१/२००४ पुढील असावी. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी खालील कागदपत्रे आपल्याबरोबर घेऊन यावेत M V A फॉर्म,स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो,बोर्ड सर्टिफिकेट,ओळखपत्र,आधार कार्ड,जन्मतारखेचा दाखला,शाळेचे किंवा,महाविद्यालयाचे बोनाफाईट.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री राजेंद्र कोहकडे,श्री शलींद्र त्रिपाठी,श्री सुनील चोळके,श्री पापा शेख,श्री दत्ता घोरपडे,श्री नितीन गायधने आदिशी संपर्क साधावा.


सूचना: येताना सर्वांनी MVA भरून आणायचा आहे. निवड चाचणीसाठी MVA फॉर्म भरणाऱ्या खेळाडूंनाच सहभागी होता येईल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget