Latest Post

पाथर्डी (गौरव डेंगळे): पाथर्डी येथे एन व्ही नेट क्लबच्या वतीने ४० वर्षा पुढील खेळाडूंसाठी भव्य लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज साखळीतील उपांत्य फेरीच्या  सामन्यांमध्ये वयाच्या पन्नाशीत बॉबी बकालने फक्त ६१ चेंडूत १०२ धावांची झंजावती खेळी करत अशोक जिमखाना संघाला एक हाती विजय मिळवून दिला.आज बॉबीने जुन्या आठवणी ताजा करत सलामीला येऊन १०२ धावांची वादळी खेळी केली,या खेळीत बॉबीने १३ चौकार व ४ षटकार खेचला. बॉबीला सुरेश भोसलेने ३९ धावांची खेळी करत बहुमूल्य साथ दिली. या दोघांच्या सुरेख खेळीच्या जोरावर अशोक जिमखाना संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ३ गडी बाद २१३ धावा फटकावल्या. २१४ धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेला पाथर्डी लेजंड संघाने १५ व्या षटकात सर्व गडी बाद ९४  धावा करू शकला व सामना अशोक जिमखाना संघाने ११९ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.पाथर्डी लेजंड संघाकडून पापू यामे यांनी सर्वाधिक ३२ धावांची योगदान दिले. १०२ धावांची खेळी करणारा बॉबी सामनाविर म्हणून गौरवण्यात आला.

पाथर्डी (गौरव डेंगळे): पाथर्डी येथे एन व्ही नेट क्लबच्या वतीने ४० वर्षा पुढील खेळाडूंसाठी भव्य लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आज साखळीतील तिसऱ्या सामन्यांमध्ये वयाच्या पन्नाशीत बॉबी बकालने ८८ धावांची वादळी खेळी करत अशोक जिमखाना संघाला एक हाती विजय मिळवून दिला.आज बॉबीने जुन्या आठवणी ताजा करत सलामीला येऊन नाबाद ८८ धावांची वादळी खेळी केली,या खेळीत बॉबीने १६ चौकार व १ षटकार खेचला. बॉबीला राहुल पटारेने ५९ धावांची खेळी करत बहुमूल्य साथ दिली. या दोघांच्या सुरेख खेळीच्या जोरावर अशोक जिमखाना संघाने निर्धारित १८ षटकांमध्ये ४ गडी बाद २०० धावा फटकावल्या. २०१ धावांचे आवहान घेऊन मैदानात उतरलेला एमसीसी संघाने निर्धारित १८ षटकारांमध्ये ८ गडी बाद १५० धावा करू शकला व सामना अशोक जिमखाना संघाने ५० धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.एमसीसी संघाकडून साईराज साबळे यांनी सर्वाधिक ३६ धावांची योगदान दिले. जिमखाना संघाकडून महेश कांबळेने ४ गडी बाद केले.८८ धावांची नाबाद खेळी करणारा बॉबी सामनाविर म्हणून गौरवण्यात आला.

बेलापूर ( वार्ताहर ) श्रीरामपूर प्रवरा नदी पात्रात.महसूल पथकाने गुरुवारी दुपारी अवैध वाळू उपसा करण्यासाठी  वापरण्यात येणाऱ्या ३ चप्पू जेसीबीच्या तोडफोड करून पूर्णपणे नष्ट केले.प्रवरा नदीकाठवरील कडीत (ता.श्रीरामपूर ) हद्दीतून १ चप्पू गुहा (ता.राहूरी) गावाच्या हद्दीलगतच्या २ चप्पू दोरीने  वाळू तस्कारांनी बांधून ठेवले होते.३ चप्पू तोडून टाकून महसूल पथकाने नष्ट करून कारवाई केली.                    अनेक दिवसांपासून कडीत येथे अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळाली.तालुक्यातील प्रवरा नदीकाठी अवैधरित्या वाळुची खुलेआम वाहतूक सुरू होती.गुरूवारी दुपारपासून महसुल पथकाने प्रवरा नदीपात्रात कारवाई केली त्या वेळी प्रवरा नदी पात्रातुन वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारे ३ चप्पू पकडण्यात आले.
 ते जेसीबीच्या सहाय्याने तोडून नष्ट करण्यात आले.श्रीरामपुरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार महसुल पथकाने कडीत येथील प्रवरा नदीपात्रात धडक कारवाई केली.विशेष म्हणजे भरलेले चप्पू नदीपात्राकडेला वाळू तस्कारांनी कटवनात लपून ठेवले होते.त्यामुळे प्रशासनासमोर ते काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.मात्र अट्टल पोहणाऱ्याच्या मदतीने ३ चप्पू नदीपात्राबाहेर काढत तोडून टाकण्यात आले.पथकाच्या सुगावाने अवैध वाळु उपसा करणारे मात्र पसार झाले.शासनाने सहाशे रुपयात वाळू देण्याचे धोरण सुरु केले असले तरी आजही कडीत पासुन ते भेर्डापूर पर्यत अनेक ठिकाणी वाळू उपसिसा केला जात आहे काही ठिकाणी वाळू उपसा करुन गाढवाच्या सहाय्याने बाहेर काढली जाते तेथेही कारवाई या पथकात मंडलाधिकारी बी.के मंडलिक,उक्कलगावचे तलाठी इम्रानखान इमानदार मांडवेचे तलाठी हिमालय डमाळे शहाजी वडितके संतोष पारखे कडीतचे पोलीस पाटील कारभारी वडितके यांच्या आदी कर्मचारी सहभागी झाले.यावेळी रावसाहेब वडितके भाऊसाहेब वडितके कडीतचे सरपंच यांचे पती पाडुरंग वडितके उपस्थित होते.

भुवनेश्वर (गौरव डेंगळे):भुवनेश्वर ओडिसा येथे संपन्न झालेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सीबीएसई संघाने प्रथम क्रमांक मिळविला.१४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २१ ते २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत २८ राज्यांनी सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या

सीबीएसई संघामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल पुणे शाळेतील ९ खेळांडू खेळत होते.सीबीएसई महाराष्ट्र संघाने राजस्थान,दिल्ली,मध्यप्रदेश या राज्यांचा साखळी सामन्यांमध्ये पराभव केला.उपांत्य फेरीचा लढतीत बलाढ्य तमिळनाडू संघाचा रंगतदार झालेल्या सामन्यात ३-२ (२५-२०,२५-२१,१८-२५,२०-२५ व १५-११) ने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश संघाचा ३:० (२५-२२,२५-२१ व २५-२२) ने पराभव करून विजेतेपद मिळवले.विजयी संघातून संजना गोठस्कर(कर्णधार),उपज्ञा कारले,आरमान भावे,देवकी रावत,ओवी कदमबांडे, सई जगताप, उमा साईगावकर,अन्वी गोसावी, सई घीवे,सखी दोरखंडे,ॠतुजा डोंगरे यांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले.विजयी संघास राष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक श्री. कुलदिप कोंडे यांनी मार्गदर्शन केले,संघ व्यवस्थापक म्हणून गिताजली भावे व तृप्ती कदमबांडे यांनी काम पाहिले. संघाचे मेंटोर म्हणून शिवाजी जाधव यांनी काम पाहिले.विजयी संघातील खेळाडूंचे शाळेचे संचालक अन्वीत पाठक,अंचिता भोसले,प्राचार्या राधिका वैध,सचिन गायवळ ,रामदास लेकावळे यांनी अभिनंदन केले.

नेवासा (गौरव डेंगळे):येथील रोजलँड इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये दिनांक २८,२९ व  ३० डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्‍घाटन क्रीडा प्रशिक्षक श्री सुरेश लव्हाटे, व्हॉलिबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाऊसाहेब अंबाडे पाटील यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.या वेळी सुरेश लव्हाटे 

 यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन करून खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, खेळातून होत असलेल्या व्यायामामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्य,जिल्हा, विभाग पातळीवर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली.या वेळी स्पर्धकांनी स्पर्धेपूर्वी खेळाविषयी शपथ घेतली.या तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये व्हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,खो-खो,१०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे,लांब उडी,रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.या वेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे पाटील, सदस्या निकिता दिपक अंबाडे, रूपाली अजित अंबाडे,शाळेचे प्राचार्य हेमंत सोलंकी, सुनिलकुमार जैन

तसेच शिक्षक-शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-सार्वजनिक व सामाजिक क्षेञात कार्य करणाऱ्या  व्यक्तींना काही अन्यायकारक घडले तर पोलिस स्टेशनला जावेच लागते.अशाच एका प्रकरणी भाजपचे सुनिल मुथ्था व आप पक्षाचे तिलक डुंगरवाल काही कार्यकर्त्यांसह शहर पोलिस स्टेशनला गेले असता काही समाजकंटकांनी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्यचा प्रयत्न केला.माञ सर्वपक्षिय नेते व सामाजिक संघटनांनी संघटीतपणे विरोध करुन समाजकंटकांचा डाव उधळून लावला. याची सर्वदूर चर्चा होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,एका प्रकरणी महिलेने खोटी फिर्याद दाखल करुन प्राॕपर्टी बळकाविण्याचा प्रयत्न केला.हे समजताच सुनिल मुथ्था व तिलक डुंगरवाल हे  शहर पोलिस स्टेशनला गेले.तेथे पोलिसांना वस्तुस्थिती विशद केली.माञ काही समाजकंटकांनी सदर महिलेला चुकीचा सल्ला देवून संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांवर विनयभंगाची खोटी केस दाखल करायला सांगीतले.तथापि, पोलिस तपासात सदर केस खोटी व हेतूप्रेरीत असल्याचे निष्पन्न झाले.  खोटी केस दाखल केल्याची कुणकुण लागताच माजी आ.भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे ,काँग्रेसचे करण ससाणे,आशिष धनवटे,राजेंद्र सोनवणे,रितेश एडके,रियाज पठाण,अनितीन दिनकर,दिपक पटारे,प्रकाश चित्ते,संजय पांडे,रुपेश हरकल,शंतनु फोपसे,अतुल वढणे,दत्ता जाधव ,अमजद पठाण,शाकिर शेख,शिवसेनेचे  सचिन बडधे, लाखान भगत,निखिल पवार,संजय छल्लारे,अशोक थोरे,रमेश घुले,सुनिल फुलारे,रोहित भोसले,तेजस बोरावके,आम आदमी पक्षाचे विकास डेंगळे,राहुल रणपिसे,प्रवीण जमदाडे,अक्षय कुमावत,भरत डेंगळे,श्रीराम दळवी,श्रीधर कारले,डाॕ.सचिन थोरात,डाॕ.प्रविण राठोड,भैरव मोरे,प्रविण काळे,प्रशांत बागुल,राजमोहंमद शेख,बी.एम.पवार,आर.पी.आय.चे सुरेन्द्र थोरात,सुभाष ञिभूवन,संदीप मगर,राष्ट्रवादीचे अजयभाऊ डाकले,शिवप्रहारचे चंद्रकांत आगे,वंचितचे चरण ञिभूवन,मनसेचे बाबा शिंदे,व्यापारी असोसिएशनचे राहुल मुथ्था,मुन्ना झंवर,गौतम उपाध्ये,बाळासाहेब खाबिया,कल्याण कुंकुलोळ,स्वप्नील चोरडीया,भाग्येश चोरडीया,अनुप लोढा, सामाजिक कार्यकर्ते संजय गांगड,चंद्रकांत सगम,नाना गांगड,संकेत संचेती,युवराज घोरपडे,मुबारक शेख,प्रसाद कटके,चेतन बोगे,संदेश मेहेर,आकाश निकाळजे,निलेश गिते,तेजस उंडे  आदी सर्व पक्षीय नेते,विविध संघटनांचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जमले.त्यांनी समाजकंटकांना पोलिसांनी थारा देवू नये अशी मागणी केली.सामाजिक व सार्वजनिक क्षेञातील कार्यकर्त्यांवर असे खोटे गुन्हे दाखल करुन दबाव आणणे उचित नाही.त्यामुळे शहनीशा व खातरजमा केल्याशिवाय पोलिसांनीही अशा खोट्या केसची दखल घेवू नये.दरम्यान जिल्हा पोलिस आधिक्षक राकेश ओलांशी संपर्क केला गेला.त्यांना या प्रकरणाची सविस्तर  माहिती देण्यात आली.त्यावर श्री.ओला यांनी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कारवाई करु नये अशा सूचना दिल्या.यावार पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी या वेळी ताक्रारीची  शहानिशा केल्याशिवाय नोंद घेतली  जाणार नाही तसेच फिर्याद खोटी निघाल्यास संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल  असे आश्वासन दिले.त्यामुळे खोट्या गुन्ह्याता .मुथ्था व .डुंगरवाल यांना अडकविण्याचा समाज कंटकाचा डाव उधळला गेला.

केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटरनादेड (गौरव डेंगळे): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे पश्चिम विभागीय मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १४ ते १८ डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान  या राज्यातील १०० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.पुण्याच्या भारतीय विद्यापीठ संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत पश्चिम विभागीय स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचा खेळाडू केशव गायकवाड स्पर्धेतील सर्वोत्तम सेंटर ठरला आहे.भारतीय विद्यापीठाने आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचा

३-०(२५-१८,२५-२० व २५-१९) ने पराभव केला.दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठ संघाने श्री कुशदास विधापीठ हनुमानगड संघाचा देखील ३-० (२५-११,२५-२३ व २५-२१ ने  पराभव केला. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय विद्यापीठला LNIPE ग्वाल्हेर विद्यापीठ संघाकडून १-३ (१८-२५,१९-२५,२५-२२ व २४-२६) ने पराभव पत्करावा लागला.भारतीय विद्यापीठ संघाने आपल्या चौथ्या सामन्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाचा ३-०(२५-१७,२५-१४ व २५-१५) ने पराभव करून पश्चिम विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत कर्णधार केशव गायकवाड सह,आदित्य कुडपणे,साईराज बांदल, लक्ष्मी नारायण, प्रणव चिकणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.उपविजेत्या संघाला राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ संतोष पवार व शिवाजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.उपविजेत्या संघाचे डॉ नेताजी जाधव क्रीडा संचालक भारती विद्यापीठ पुणे, डॉ स्वप्निल विधाते प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय भारती विद्यापीठ,पुणे तसेच सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget