Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-गायकवाड वस्ती गोल्डन चारीयट जवळून सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका महीलेने लहान मुलाला पळवुन नेल्याची घटना घडली असुन बेलापुर पोलीसांनी तातडीने सदर महीलेला मुलासह ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते          बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथुन सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातु परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते सदर महीलेचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर महीलेचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना बेलापुर पोलीसांना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीसा निरीक्षक जिवन बोरसे बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ संपत बडे भारत तमनर आदिंनी परिसरात शोध घेतला   दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवुन घेवुन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरीकांनी त्या महीलेला पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना घटनेची माहीती दिली बेलापुर पोलीस स्टेशनचे काँन्स्टेबल संपत बडे व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणाऱ्या महीलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला  आणले सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे दोन वर्ष वयाच्या परवेज शेख यास पळवुन नेणारी महीला खैरुनिसा अकबर शेख ही नाशिक येथील रहीवासी असुन काही वर्षापूर्वी ती गायकवाड वस्ती येथे रहात होती नाशिक येथे तीने विवाह केला होता दहा बारा वर्षानंतर तीने पतीला सोडून दिले गायकवाड वस्ती येथे तीची पहील्या नवऱ्याची मुलगी रहात आहे ती लहान असतानाच ती त्या लहान मुलीला सोडून गेली होती आज ती मुलगी सज्ञान झालेली आहे तिला नेण्यासाठी खैरुनिसा ही गायकवाड वस्ती येथे आली होती परंतु मुलीने येण्यास नकार दिल्यामुळे तिने हे दोन वर्षाचे मुल घेवुन पळ काढला होता परंतु पोलीसांनी ती गायब होण्याच्या आतच मुलासह तीला ताब्यात घेतले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब डोखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश   अपर आयुक्त नाशिक यांनी रद्द केला असुन या निर्णयामुळे डोखे यांना दिलासा मिळाला आहे .या बाबत सविस्तर माहीती अशी की राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब आण्णासाहेब डोखे यांनी  शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार अनिल भगत यांनी  जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती त्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी राहुरी पंचायत समीतीचे गटविकास अधीकारी यांचे मार्फत चौकशी अहवाल मागवीला होता गटविकास अधीकाऱ्यांनी समक्ष पहाणी करुन ग्रामपंचायत सदस्य गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आहवाल दिला होता त्या अहवालावरुन तत्कालीन  जिल्हाधिकारी डाँक्टर भोसले यांनी ग्रामपंचायत अधिनियम कलम १९५८ चे कलम १४ ( १ ) ( ज -३ )मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अपात्र असलेबाबत निर्णय दिला होता  आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ डोखे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील दाखल केले त्या वेळी युक्तीवाद करताना डोखे यांचे वकील अँड प्रशांत जाधव  यांनी असे म्हणणे मांडले की गटविकास अधीकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात वादग्रस्त जागेचे क्षेत्रफळ नमुद नाही .केसापुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष मोजणी करुन पुर्वीच्या नोंदीत अचूक क्षेत्रफळ नमुद नसल्याने दुरुस्ती केल्याचे स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे डोखे यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले हे सिध्द होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( १ ) (ज -३ )मधील तरतुदी विचारात घेवुन अपर आयुक्त निलेश सागर यांनी अपीलार्थी यांचे अपील मान्य करुन जिल्हाधिकारी अहमदनगर यानी दिलेला आदेश रद्द केला त्यामुळे डोखे याचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधीत राहीले आहे .हा निकाल गावात समजताच अनेकांनी फटाके फोडुन आपला आनंद साजरा केला                 वरीष्ठ न्यायालयाने सर्व बाजुंची खातरजमा करुन व पुराव्याचे अवलोकन करुन सत्याला न्याय मिळवून दिला माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकीर्द संपवून मला बदनाम करण्याचा कुटील डाव विरोधकांनी रचला होता पण अखेर सत्याचाच विजय झाला -गुलाब डोखे सदस्य केसापुर ग्रामपंचायत

बेलापुर  (प्रतिनिधी  )-- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आत्तापर्यंत जवळपास ९०० कोटी रुपयांचा निधी आपण आणला असुन त्यात बेलापुर गावाला १६० कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. या निधीतून होणारी विकासकामे ही दर्जेदार होण्यासाठी नागरीकांनी दक्ष रहावे, असे अवाहन आमदार लहु कानडे यांनी केले. 

बेलापूर येथील इंद्रबिल्वेश्वर मंदीरात लोकसंवाद कार्यक्रमात आ. कानडे बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड अध्यक्षस्थानी होते. यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रणजीत श्रीगोड, रविंद्र खटोड, कनजी टाक, प्रवीण काळे, गोविंदराम दायमा, कांतीलाल मुथा व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. कानडे पुढे म्हणाले की विकास कामांना निधी हा एकदाच मिळतो. त्यामुळे होणारी कामे ही दर्जेदारच झाली पाहीजे. त्याकरीता सर्वानीच जागृत असले पाहीजे. या तालुक्यात काहींची मक्तेदारी होती. काही ठेकेदारांची, दलालांची मनमर्जी चालत होती. रस्त्याच्या कामात तीन थर असतात हे श्रीरामपुरकरांना समजले आहे. श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असुन या रस्त्यावर रात्रीही लख्ख प्रकाश असेल, अशी व्यवस्था आमदार निधीतून केलेली आहे. तालुक्यातील एक हजार नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवुन दिला. बेलापुरला मोठी पाणी पुरवठा योजना होत आहे. सर्व शासकीय योजना पुढारी व ठेकेदार यांच्याकरीता न रहाता सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळाला पाहीजे., असे ते म्हणाले.

तालुक्यात विकासकामे जोरात सुरु होती. सरकार बदलल्याने काही अडचणी आल्या. असे असले तरी जनतेने मला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले, याचा विसर पडू देणार नाही. आज तालुक्यातील ९५ % प्रमुख रस्त्याची कामे झाली आहेत. गावोगाव व्यायामशाळा दिल्या. सर्व शाळा डिजीटल केल्या. शाळांना संगणक दिले. भविष्यात या भागातील पाणी प्रश्नदेखील गंभीर होणार आहे. त्याकरीता स्वतंत्र लढा उभारावा लागणार आहे. जनतेच्या कल्याणाच्या नावाखाली स्वतःचे कल्याण करणारी पिढी तयार होत आहे. याकरीता नागरीकांनी सावध व्हावे, असेही आ. कानडे म्हणाले. 

प्रारंभी इंद्रबिल्वेश्वर मंदीराच्या वीस लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमीपुजन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक. रणजीत श्रीगोड आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश खटोड, कैलास चायल, विजय कटारीया, अनिल नाईक, प्रकाश कुर्हे, रफीक शेख, सुभाष बोरा, रमेश अमोलीक, अक्षय नाईक, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, राजेंद्र लखोटिया, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक, शिवाजी पा. वाबळे, वसंतराव शिंदे,  भास्करराव कोळसे, सुरेश अमोलिक, केदार दायमा, सुरेश जाधव, दीपक सिकची, दत्तात्रय कुमावत, सूर्यभान नागले, संजय रासकर, गौरव सिकची, मधुकर ठोंबरे, किशोर खरोटे, चंद्रकांत नाईक, रमेश कुमावत, वसंतराव म्हसे, महेश खंडागळे, दीपक निंबाळकर, सुधाकर खंडागळे, केदारनाथ मंत्री, राजेश राठी, पत्रकार देविदास देसाई, ज्ञानेश गवले, सुहास शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि कोळपकर यांनी केले. अँड. विजयराव सांळूंके यांनी सूत्रसंचलन केले.

...............

कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय हिंदी  वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक - १३ व १४ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक प्रदान करण्यात येतील.ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल. अधिक माहितीसाठी श्री तुरकणे,श्री नन्नवरे,सौ.होन,सौ.जोरी यांच्याशी संपर्क साधवा.

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मा, मंत्री भीमशक्तीचे संस्थापक तसेच काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज भीमशक्ती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे आयोजित केली होती या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्तेना व महिलांना संघटनेचे पद देण्यात आले त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भीमशक्ती  महाराष्ट्र सरचिटणीस भाऊसाहेब साठे सर उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड महिला अध्यक्ष शोभा पातोरे भीमशक्तीचे नेते सिमोन जगताप भीमशक्ती जिल्हा संघटक सुनील संसारे भीमशक्ती पत्रकार सुदाम सरोदे भीमशक्ती तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक नेवासा अध्यक्ष पप्पू कांबळे  तसेच महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे उपशहर अध्यक्ष अरुण खंडीझोड भीमशक्ती सरचिटणीस प्रशांत भोसले रिक्षा युनियन अध्यक्ष कामरान शेख  अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व या कार्यक्रमाला आवर्जून लोकसभेचे भावी खासदार उत्कर्षताई रुपवते या उपस्थित होत्या व त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.लवकरच श्रीरामपूर मध्ये हंडोरे साहेबांचे नेतृत्वाखाली भव्य मेळावा घेणार आहोत सुत्र संचालन शहराध्यक्ष अंबादास निकाळजे यांनी केले व आभार प्रशांत भोसले यांनी मानले.

श्रीरामपुर-हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून तमाम हिंदूंचे मन दुखवणाऱ्या जिहादी लोकांवर देशद्रोहाचे कलम लावून लोकांतर्गत कारवाई करावी असे निवेदन श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाली की गेल्या अनेक दिवसापासून देशात काही मुसलमानातील काही मुले आतंकवादी संघटनांच्या संपर्कात येऊन कट्टर जिहादी बनून संपूर्ण हिंदुस्तानामध्ये हिंदू देवी देवतांच्या सण उत्सवाच्या वेळेस दगडफेक करून व  महापुरुषांबद्दल काही अपशब्द बोलून अपमान करणे व इतर स्वरूपाचे कट कारस्थान करून हिंदूंना टार्गेट करत आहे हिंदू समाजाला त्रास देऊन व तसेच  हिंदुस्थानाला मुस्लिम राष्ट्र बनविण्यासाठीच जातीय तेढ जाणून बुजून निर्माण करत आहे असेच नगर जिल्ह्यात देखील हिंदूंच्या भावना दुखून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथी एका मुसलमान मुलाने हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांना तर नगर शहरातील एका मुसलमानाच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराज यांना गलिच्छ भाषेचा वापर करून या महापुरुषांची बदनामी केल्याने तमाम हिंदूंचे मन दुखवले गेले आहे यामुळे या देशद्रोही जियादी लोकांवर त्वरित देशद्रोह चे कलम लावून मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी व हे लोक कोणत्या आतंकवादी संघटनेच्या सांगण्यावरून असे कृत्य करत आहे  याची देखील सखोल चौकशी करून यांच्या मागचा खरा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा तसेच त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास संपूर्ण हिंदू समाज या देशद्रोह्यांनायांना धडा शिकविण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल जेणेकरून यापुढे हिंदूंच्या देवी-देवतांबद्दल व महापुरुषन बद्दल बोलताना ते हजार वेळेस विचार करतील आणि यापुढे जर कोणी नगर जिल्ह्यात हिंदू देवी देवतांचा व महापुरुषांचा अपमान केला तर मनसे पक्षाच्या वतीने त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल याचा सर्व जातीवादी देशद्रोही लोकांनी नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले या प्रसंगी

मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा सचिव डॉ.संजय नवथर,उपजिल्हाध्यक्ष महेश सोनी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष सतिश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  संकेत शेलार,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष कुणाल सुर्यवंशी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,तालुक सरचिटणीस विकी राऊत,तालुका चिटणीस अंबादास कोकाटे,शहर संघटक निलेश सोनावणे, शहर सचिव प्रतीक सोनावणे,शहर सरचिटणीस,दर्शन शर्मा,तालुका उपाध्यक्ष अमोल साबणे,प्रवीण कारले, सुनील करपे, अरमान शेख,सचिन कदम, राजू शिंदे मनोहर बागुल,संदीप विशंभर,करण कापसे, मारुती शिंदे, संजय शिंदे, लखन कुरे,नितीन खरे,ताया शिंदे, संजय शिंदे, विशाल जाधव, सुरेश शिंदे, राहुल शिंदे, विकी परदेसी, राजू जगताप, अक्षय काळे संतोष आवटी करण नांगल नंदू चाबुकस्वार, किरण वानखेडे ज्ञानेश्वर काळे रतन वर्मा सोनू बोरुडे मच्छिंद्र हिंगमिरे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

बेलापूरःश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेलापूर उपबाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दुमजली व्यापारी संकुलास पदमभूषण माजी.खा.स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न  बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केली आहे.                             श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील काळात विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना बेलापूर येथील उपबाजार येथे दुमजली व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. नुकतेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सदरच्या व्यापारी संकुलास माजी खा.स्व.बाळासाहेब विखे पा. नाव देणे गरजेचे आहे. स्वर्गीय खा.विखे यांचे बेलापूर शी जुने ऋणानुबंध होते तसेच गावाच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्याच प्रमाणे बाजार समितीच्या वाटचालीत देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे कामास विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना मंजूर होऊन सुरु करण्यात आले होते.संकुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य झालेले आहे त्यामुळेच सदरचे  दुमजली व्यापारी संकुल दिमाखात उभे ठाकले आहे. या योगदानाबद्दल सदरच्या व्यापारी संकुलास पद्मभूषण  स्व.खा.बाळासाहेब विखे पा.यांचे नाव देवून उतराई व्हावे असे आवाहन श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी केले आहे.लवकरच बाजार समितीच्या विखे पाटील गटाच्या संचालकासह बाजार समितीस या  मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री. नवले व श्री. खंडागळे यांनी म्हंटले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget