या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम ७०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ५००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/रुपयाचे दोन पारितोषिक प्रदान करण्यात येतील.ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता आठवी ते दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा गट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी आपल्या शाळेमार्फत खाली दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क साधावा.सदर स्पर्धेसाठी शाळेमार्फत केलेली नाव नोंदणीच ग्राह्य धरली जाईल. अधिक माहितीसाठी श्री तुरकणे,श्री नन्नवरे,सौ.होन,सौ.जोरी यांच्याशी संपर्क साधवा.
श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धा
कोपरगाव (गौरव डेंगळे):सोमैया विद्या विहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक - १३ व १४ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.
Post a Comment