चोरी केलेल्या मुलास काही तासातच बेलापूर पोलिसांनी दिले आईच्या ताब्यात
बेलापुर (प्रतिनिधी )-गायकवाड वस्ती गोल्डन चारीयट जवळून सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका महीलेने लहान मुलाला पळवुन नेल्याची घटना घडली असुन बेलापुर पोलीसांनी तातडीने सदर महीलेला मुलासह ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथुन सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातु परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते सदर महीलेचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर महीलेचा तातडीने शोध घेण्याच्या सुचना बेलापुर पोलीसांना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीसा निरीक्षक जिवन बोरसे बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ संपत बडे भारत तमनर आदिंनी परिसरात शोध घेतला दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवुन घेवुन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरीकांनी त्या महीलेला पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना घटनेची माहीती दिली बेलापुर पोलीस स्टेशनचे काँन्स्टेबल संपत बडे व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणाऱ्या महीलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे दोन वर्ष वयाच्या परवेज शेख यास पळवुन नेणारी महीला खैरुनिसा अकबर शेख ही नाशिक येथील रहीवासी असुन काही वर्षापूर्वी ती गायकवाड वस्ती येथे रहात होती नाशिक येथे तीने विवाह केला होता दहा बारा वर्षानंतर तीने पतीला सोडून दिले गायकवाड वस्ती येथे तीची पहील्या नवऱ्याची मुलगी रहात आहे ती लहान असतानाच ती त्या लहान मुलीला सोडून गेली होती आज ती मुलगी सज्ञान झालेली आहे तिला नेण्यासाठी खैरुनिसा ही गायकवाड वस्ती येथे आली होती परंतु मुलीने येण्यास नकार दिल्यामुळे तिने हे दोन वर्षाचे मुल घेवुन पळ काढला होता परंतु पोलीसांनी ती गायब होण्याच्या आतच मुलासह तीला ताब्यात घेतले
Post a Comment