बेलापुर (प्रतिनिधी )- शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब डोखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश अपर आयुक्त नाशिक यांनी रद्द केला असुन या निर्णयामुळे डोखे यांना दिलासा मिळाला आहे .या बाबत सविस्तर माहीती अशी की राहुरी तालुक्यातील केसापुर ग्रामपंचायतीचे सदस्य गुलाब आण्णासाहेब डोखे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार अनिल भगत यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली होती त्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी राहुरी पंचायत समीतीचे गटविकास अधीकारी यांचे मार्फत चौकशी अहवाल मागवीला होता गटविकास अधीकाऱ्यांनी समक्ष पहाणी करुन ग्रामपंचायत सदस्य गुलाब डोखे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या पूर्व पश्चिम रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आहवाल दिला होता त्या अहवालावरुन तत्कालीन जिल्हाधिकारी डाँक्टर भोसले यांनी ग्रामपंचायत अधिनियम कलम १९५८ चे कलम १४ ( १ ) ( ज -३ )मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्य अपात्र असलेबाबत निर्णय दिला होता आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ डोखे यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे अपील दाखल केले त्या वेळी युक्तीवाद करताना डोखे यांचे वकील अँड प्रशांत जाधव यांनी असे म्हणणे मांडले की गटविकास अधीकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात वादग्रस्त जागेचे क्षेत्रफळ नमुद नाही .केसापुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष मोजणी करुन पुर्वीच्या नोंदीत अचूक क्षेत्रफळ नमुद नसल्याने दुरुस्ती केल्याचे स्पष्ट दिसुन येत असल्यामुळे डोखे यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले हे सिध्द होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( १ ) (ज -३ )मधील तरतुदी विचारात घेवुन अपर आयुक्त निलेश सागर यांनी अपीलार्थी यांचे अपील मान्य करुन जिल्हाधिकारी अहमदनगर यानी दिलेला आदेश रद्द केला त्यामुळे डोखे याचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधीत राहीले आहे .हा निकाल गावात समजताच अनेकांनी फटाके फोडुन आपला आनंद साजरा केला वरीष्ठ न्यायालयाने सर्व बाजुंची खातरजमा करुन व पुराव्याचे अवलोकन करुन सत्याला न्याय मिळवून दिला माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकीर्द संपवून मला बदनाम करण्याचा कुटील डाव विरोधकांनी रचला होता पण अखेर सत्याचाच विजय झाला -गुलाब डोखे सदस्य केसापुर ग्रामपंचायत
Post a Comment