श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलापूर उपबाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलास पदमभूषण माजी.खा.स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्यावेःनवले व खंडागळे यांची मागणी.
बेलापूरःश्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेलापूर उपबाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दुमजली व्यापारी संकुलास पदमभूषण माजी.खा.स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी केली आहे. श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील काळात विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना बेलापूर येथील उपबाजार येथे दुमजली व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. नुकतेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून सदरच्या व्यापारी संकुलास माजी खा.स्व.बाळासाहेब विखे पा. नाव देणे गरजेचे आहे. स्वर्गीय खा.विखे यांचे बेलापूर शी जुने ऋणानुबंध होते तसेच गावाच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्याच प्रमाणे बाजार समितीच्या वाटचालीत देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाचे कामास विखे पाटील गटाच्या सौ. संगिता नानासाहेब शिंदे या सभापती असताना मंजूर होऊन सुरु करण्यात आले होते.संकुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य झालेले आहे त्यामुळेच सदरचे दुमजली व्यापारी संकुल दिमाखात उभे ठाकले आहे. या योगदानाबद्दल सदरच्या व्यापारी संकुलास पद्मभूषण स्व.खा.बाळासाहेब विखे पा.यांचे नाव देवून उतराई व्हावे असे आवाहन श्री.नवले व श्री.खंडागळे यांनी केले आहे.लवकरच बाजार समितीच्या विखे पाटील गटाच्या संचालकासह बाजार समितीस या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री. नवले व श्री. खंडागळे यांनी म्हंटले आहे.
Post a Comment