Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापूर ग्रामपंचायत सत्तांतर नाट्याबाबत स्वाती आमोलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे असल्याचा खुलासा ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केला आहे                                       बेलापूर ग्रामपंचायत मधील मागील आठवड्यात सरपंच महेंद्र साळवी यांनी गावकरी  मंडळातून काँग्रेस   जनता विकास आघाडीत जो प्रवेश केला होता त्याबाबत चर्चा होत आहे त्यामुळे हा खुलासा देणे गरजेचे आहे मी स्वतः गावकरी मंडळातून निवडून आलो होतो . ठरल्याप्रमाणे पंधरा,पंधरा,महिने प्रत्येकी 4 सरपंच देण्याचे ठरले होते  पण दोन वर्ष होऊनही काहीच हालचाली झाल्या नाही सर्व गावकरी नेत्यांना भेटुनही उत्तर मिळायचे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर सरपंच बदल करू असे मला सांगण्यात आले होते राजकीय पोळी भाजण्यासाठी जि प. निवडणूक व ठेकेदारी करण्यासाठी कोणी राजीनामा घेतला नाही हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी एक वर्षांपूर्वी  गावकरी मंडळातून बाहेर पडलो सरपंचाच्या दावेदार स्वाती अमोलिक  यांचे वं कुटुंबियांचे गेल्या 3ते 4 महिन्या पासून गावकरी मंडळाच्या नेत्यांच्या मागे राजीनीमा घेण्यासाठी दबाव वाढत होता  परंतु काही होत नाही म्हणून कोणा मार्फत हा राजीनामा घ्यावा हा प्रश्न गावकरीच्या नेत्यांना पडला होता गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांच्या  मध्यस्थीने जनता विकास आघाडी चे नेते सुधीर नवले, भरत साळुंके, रवींद्र खटोड, यांना बरोबर घेऊन,सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर  अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणाच्या सांगण्या वरून महिना भर विनवण्या करत होते.  मागील आठवड्यात 11 सदस्यांच्या सह्या घेऊन महेंद्र साळवी यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी तयारी झाल्याचे सरपंच यांना कळाले त्यामुळे सरपंच साळवी यांनी सभापती सुधीर नवले, व रवींद्र खटोड, भरत साळुंके,यांना भेटले मी कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही परंतु माझ्याकडून नेते मंडळींनी बरीचशी कामे चुकीचे करून घेतलेली आहे. त्याचे पुरावे त्यांचे कडे आहे त्यामुळे माझ्यावर मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता असल्याने मला यातून आपणच मार्ग काढू शकता अशी विनवणी केली होती  मी आपल्याबरोबर काम करण्यास तयार आहे म्हणून सरपंच महेंद्र साळवी यांनी अघाडीत येण्याचा निर्णय घेतला होता साळवी यांनाही आमच्या नेत्यांनी विश्वास दिला कि आमच्या सहा सदस्यांचा पाठिंबा आम्ही आपणास देऊ आपण तीन सदस्य आणा व कारभार तुम्हीच पहा असे ठरले होते  आमच्या नेत्यांना वं मला स्वतः कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती  ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनिमित्तता झालेली आहे  हे पाप वं केलेली खटाटोप झाकण्यासाठी शरद नवले अभिषेक खंडागळे यांनी गटविकास अधिकार्यकडून एक पत्र आणून त्यात 12 मुद्दे भ्रष्टाचाराचे टाकून तुम्हाला 8 दिवसाच्या आत सरपंच पद काढून घेऊ  व कामाला लावू असे दबावतंत्र सरपंचांवर राबविण्यात  आले

नामदार विखे साहेब यांची दिशाभूल करून  सरपंचवर दबाव आणुन माघार घ्यावयास  भाग पाडले आहे

राहिली समाजाची बदनामची महेद्र साळवी सुशिक्षित सरपंच असून त्यांचे वर अविश्वास आणताना समाजाची बदनामी झाली नाही का ?त्यावेळेस आपण  व आपले कुटुंब त्यात सर्वात पुढे होते हे विसरले का दुसऱ्याने लिहुन दिलेल्या कागदावर सह्या करून व्हाट्सअप वर बदनामी करण्यात आली हे कटकारस्थान थांबवावेत अन्यथा आपल्या मंडळाच्या नेत्यांची महिंद्र साळवी यांच्या बाबतची मोबाईल रेकॉर्डिंग आमच्याकडे असून ती व्हायरल करू मग कोण किती खरं आणि किती खोटं हे जनतेला समजेल असेही शेवटी रमेश अमोलीक यांनी म्हटले आहे


बेलापूरः(प्रतिनिधी )-गेले अडीच वर्षे गावकरी मंडळाने विकासाभिमुख कारभार केला असे असताना नवले व साळुंके यांनी सरपंच महेंद्र साळवी यांची दिशाभूल करुन ग्रामपंचायतचा कारभार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तसेच समाजाचीही बदनामी केली.तथापी साळवी यांनी हा कावा वेळीच ओळखून गावकरी मंडळात परतण्याचा योग्य निर्णय घेवून कावेबाजांना तोंडघशी पाडल्याची प्रतिक्रिया गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक यांनी दिली आहे .                            बेलापूर ग्रामपंचायतीतील नुकत्याच झालेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना अमोलिक म्हणाल्या की,ग्रामस्थांनी विरोधकांना डावलून गावकरी मंडळाला बहुमत दिले.गावकरी मंडळानेही जि.परिषद सदस्य शरद नवले तसेच बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, सरपंच महेंद्र साळवी यांचे नेतृत्वाखाली जनहिताचा व विकासाभिमुख कारभार केला.पण सत्तेविना तडफडणा-यांना हे देखवले नाही.त्यांनी सरपंच महेन्द्र साळवी यांची दिशाभूल करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात प्रामुख्याने कुणाचा सहभाग होता.हे जगजाहीर झालेले आहे .हे करत असतानाच विरोधकांनी जातीयतेचा घाणेरडा आधारही घेतला.यामुळे मागासवर्गिय समाजाची बदनामी झाल्याचा आरोप अमोलिक यांनी केला.राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घातले आणि सरपंच साळवी यांच्या  वस्तुस्थिती  लक्षात आणून दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी यांनी स्वगृही गावकरी मंडळात परतण्याचा निर्णय घेतला.यामुळे कावेबाज व कट कारस्थान करणाऱ्याचा  डाव उधळला गेला.टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला.ग्रामस्थांनी गावकरी मंडळाला बहुमत दिले आहे.तेव्हा विरोधकांनी जनमताचा सन्मान राखावा.स्वार्थासाठी कुटील कारस्थान करुन अस्थिरता आणून गावच्या विकासाला खिळ घालू नये अन्यथा जनमताचा अनादर केल्यास ग्रामस्थ विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहित असा इशारा अमोलिक यांनी दिला आहे.


बेलापुरा (प्रतिनिधी  )-कुरणपुर तालुका श्रीरामपुर येथील प्रवरा नदीपात्रातील अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल एका रात्रीत चोरीला गेल्या असुन दिड महीन्यापूर्वीही अशाच प्रकारे केबल व मोटारी चोरीस गेलेल्या होत्या या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे                                              कुरणपुर येथील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी प्रवरा नदी पात्रात वीज मोटारी टाकून शेतीला पाण्याची व्यवस्था केली होती. परवा रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल चोरीस गेलेल्या आहे. यात दत्तात्रय लक्ष्मण महानोर यांची साधारण तीनशे फुट काँपर केबल अंदाजे किंमत ९००० रुपये लक्ष्मण  रामजी चिंधे यांची साधारण ९००० हजार रुपये किमतीची तीनशे फुट काँपर केबल पंकज ज्ञानदेव हळनोर यांची रुपये ९००० किमतीची साधारण तीनशे फुट काँपर केबल नामदेव सहादु थोरात यांची रुपये ७००० किमतीची वीज मोटारीची काँपर केबल विठ्ठल सोपान व्यवहारे यांची तीनशे फुट काँपर केबल राजेंद्र सुखदेव हळनोर यांची तीनशे फुट काँपर केबल आण्णासाहेब सोन्याबपु जाटे यांची तीनशे फुट केबल विठ्ठल भागवत देठे यांची तीनशे फुट केबल दत्तात्रय भानुदास राऊत यांची तीनशे फुट केबल जयवंत नारायण देठे यांची तीनशे फुट केबल सतीश चंद्रभान हळनोर यांची वीज मोटारीवरील केबल आबासाहेब आण्णासाहेब पारखे यांची वीज मोटारीवरील तीनशे फुट केबल अशा एकुण बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल अंदाजीत किंमत एक लाख रुपये किमतीच्या चोरीस गेल्या असुन एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल व तीन शेतकऱ्यांच्या विज मोटारी चोरीस गेलेल्या होत्या त्या चोरीचा तपास लागला नाही केबल चोरीसा गेलेल्या शेतकऱ्यांनी नविन केबल खरेदी करुन शेती वीज पंप सुरु केले होते पुन्हा तसाच प्रकार घडला असुन या बाबत सर्व शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन या चोरांचा तातडीने छडा लावावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


श्रीरामपूर-शितल ही सकाळी 11/00 वा.चे सुमारास  लोणी PMT दवाखान्यामध्ये जात असुन सायंकाळी 04/00 ते 05/00 वा.चे सुमारास घरी येईल असे सांगुन मुलगा अशिष वय 05 वर्षे यास घेवुन गेली आहे. तरी ती संध्याकाळ पर्यत घरी आली नाही
 तीचे वर्णन पुढील प्रमाणे
नाव शितल फ्रान्सीस श्री सुंदर वय 23 वर्षे रा. गोंधवणी वार्ड न 01 श्रीरामपुर उंची 5 फुट 5 इंच, रंग -सावळा,बांधा- सडपातळ, चेहरा- गोल, केस काळे लांब, नेसणीस - गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल तसेच मुलगा नामे आशिष वय 5 वर्षे उंची 3 फुट, रंग- गोरा, बांधा मजबुत पायात चप्पल, नेसणीस जीन्स पॅन्ट व रंगीत शर्ट
तरी दि05/06/2023 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास माझी पत्नी शितल फ्रान्सीस श्रीसुंदर व मुलगा आशीष फ्रान्सीस श्रीसुंदर हे लोणी PMT दवाखान्यामध्ये जात आहे असे शेजारी राहणारे ताई हीस सांगुन निघुन गेली आहे तीचा शोध लागल्यास विनंती.
संपर्क करा
अंमलदार
श्रीरामपूर शहर पो.स्टे. 02422-222666
पती फ्रान्सीस राँबेल श्रीसुंदर  - 84598 99182


बेलापुर  (प्रतिनिधी  )-गैरसमज झाल्यामुळे आज माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस  प्रवेश करण्याचे निश्चित झालेले बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी पुन्हा घुमजाव करत गावकरी मंडळात प्रवेश केला असुन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांनी आपला गैरसमज दुर केला असुन आता आपण गावाकरी मंडळाबरोबरच कायम स्वरुपी राहणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे .                      आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याचे कारण सांगून सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता .त्या निर्णयाचे काँग्रेस गोटातुन जोरदार स्वागत केले . त्या वेळी फटाक्याची मोठी अतिषबाजीही करण्यात आली होती काहींनी पेढेही वाटले होते परंतु त्यांचा आनंद दिर्घकाळ टिकला नाही तिसऱ्याच दिवशी सरपंच महेंद्र साळवी यांनी पत्रकारासमक्ष गावकरी मंडळात पुन्हा प्रवेश करत असल्याचे जाहीर केले भरत साळूंके व सुधीर नवले यांनी आपला बुद्धीभेद केला. तुमच्यावर अविश्वास आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. असे भासविले त्यामुळे गैरसमजातुन आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खरी वस्तूस्थिती समजल्यावर झालेली चुक लक्षात आली त्यामुळे लगेच ती चुक सुधारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनी सरपंच महेंद्र साळवी यांचेशी महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी बोलणे करुन दिले .गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्वाना बरोबर घेवुन जायचे आहे .बेलापुरच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर आहे असे नामदार विखे यांनी सांगताच सरपंच महेंद्र साळवी यांनी आपला निर्णय  बदलला व गावाच्या विकासासाठी मी गावकरी मंडळाबरोबरच असल्याचे जाहीर केले    त्यामुळे तीन दिवसापासुन गावात चाललेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे .या वेळी बोलताना गावकरी मंडळाचे नेते शरद नवले म्हणाले की काहींनी सरपंच महेंद्र साळवी यांना चुकीची माहीती देवुन आपल्या जाळ्यात ओढले परंतु खरी वस्तुस्थिती लक्षात आल्यावर सरपंच स्वगृही परतले सरपंचाना आपल्या पार्टीत घेण्याचे असुरी स्वप्न पहाणारांची आता झोपच उडाली आहे  त्यांनी फोडलेले फटाके फुसकेच निघाले गावाच्या विकासाचे काय होईल अशी दोन दिवस गावात चर्चा सुरु होती पण भगवान श्री हरिहर केशव गोविंदिंना देखील ते मान्य नव्हते महसुल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरपंच  साळवी यांचा गैरसमज दुर केला त्यामुळे ते गावकरी मंडळातही आले तसेच सरपंच  पदाचा राजीनामाही दिला आहे.राजकारणात लोकांनी नाकारलेल्यांनी खेळलेला कुटील डाव फसला असल्याचेही नवले म्हणाले         *माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांचा काँग्रेस प्रवेश करण्याचे निश्चित झाले होते आमदार बाळासाहेब थोरात त्या करीता ग्रामपंचायत कार्यालयातही आले परंतु कार्यालयात सरपंच नव्हते ते नाँट रिचेबलश आल्यामुळे  तो कार्यक्रम स्थगीत झाला*


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा मोठा सण असलेली बकरी ईद व हिंदू धर्मीय बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करीत आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद मधील महत्त्वपूर्ण असलेला कुर्बानीचा विधी त्या दिवशी न करण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे.या निर्णयाचे सर्वत्र व्यापक प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

येथील जामा मशिदीच्या हॉलमध्ये शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजातील धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली जमा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना अल्हाज मोहम्मद ईमदाद अली,माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फर शेख, नगरसेवक मुख्तार शाह, अदमदभाई जहागिरदार, मुन्ना पठाण,साजिद मिर्झा आदींसह विविध मशिदींचे मौलाना तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी आपल्या मनोगतातून श्रीरामपूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाचे संबंध खूप चांगले आहेत. श्रीरामपूरच्या शांततेला गालबोट लावण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले. मात्र दोन्ही समाजातील समंजस कार्यकर्त्यांमुळे इथली शांतता टिकून आहे.भविष्यात देखील हेच वातावरण कायम राहण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखून वागण्याची गरज आहे असे सांगून आषाढी एकादशीचे असलेले महत्त्व लक्षात घेता श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने त्या दिवशी ईद उल अज्हा निमित्त होणारे कुर्बानीचे विधि न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.

पोलीस निरीक्षक गवळी यांनी श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे असे सांगून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ईद आणि आषाढी एकादशी एकत्र येत असल्याने कुठेही शांतता भंग होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. आपण घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून श्रीरामपूरची एकात्मता राज्यामध्ये प्रसिद्ध आहे.ती अबाधित ठेवण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करू या असे आवाहन केले.

याप्रसंगी जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद ईमदाद अली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आमच्या पैगंबरांनी शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे.श्रीरामपूरात सर्व हिंदू ,मुस्लिम, शीख, इसाई एकोप्याने राहतात. हीच श्रीरामपूरची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवण्याचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे.मुस्लिम समाजाने नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. यावेळी सुद्धा ईद आणि आषाढी शांततेत साजरी होईल अशी मला आशा आहे.

याप्रसंगी अलहाज मौलाना इमदाद अली,हाफिज जोहर अली,अहमदभाई जहागीरदार, हाजी मुजफ्फर  शेख, रईस जहागीरदार साजीद मिर्ज़ा, मुख्तार शाह, मुन्ना पठान,नज़ीरभाई मुलानी, हाजी एजाज़ बारूदवाला,फिरोज खान,सलीम जहागीरदार, तौफिक शेख,अकील कुरेशी,

इलाहीबक्श कुरेशी, जोएफ जमादार,आरिफ बागवान,वजीरभाई शाह,अहमद शाह,

आमीन शाह,रशीद कुरेशी,अबुल मन्यार , रज़ा शकूर शेख,हाजी जलालुद्दीन पीरजादे, हाजी इब्राहीम कुरेशी,

अकबर खान,गफ्फार पोपटिया,रियाज़ पठान, रज्जाक पठान, इफ्तिखार शेख, सरवर अली मास्टर,नदीम तंबोली,जावेद तंबोली, कलीम कुरेशी,मोहम्मद तनवीर रजा,मौलाना नुरुल हसन,काझी हसन रजा, मौलाना कैसर,मौलाना अब्दुल लतीफ, मौलाना तौकीर रजा, सलीम रिज्वी,

याकूब शाह, हाजी अब्दूल रहेमान, इम्तियाज हसन खान, अजीम शेख आदिसह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना मशीदींचे विश्वस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी हाजी साजिद मिर्झा यांनी आभार मानले.


बेलापुर (प्रतिनिधी  )-सत्तेच्या लालसेपोटी या गटातुन त्या गटात कोलांट उड्या मारणाऱ्या  तसेच एका मागासवर्गीय सरपंचाला कारभार पाहु न देणाऱ्या बिनपदाच्या पदाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी काँग्रेस व जनता विकासअघाडीत जाहीर प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया सरपच महेंद्र साळवी यांनी दिली आहे             या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेंद्र साळवी यांनी पुढे म्हटले आहे की पाच वर्षाच्या कार्यकाळात ठेकेदारी मलाच मिळाली पाहीजे या भावनेतुन काम करणाऱ्या जि प सदस्यांनी सर्व सदस्यांना बाजुला ठेवुन केवळ पैसे मिळवीणे हाच उद्देश समोर ठेवुन दादागीरी व दहशत सुरु केली जि प सदस्य मलाच मिळावे या करीता सारा खटाटोप चालला असुन काय चालले हे पक्ष श्रेष्ठीसह एकाही सदस्याला माहीत नाही याच सदस्याने २००७ला मुरकुटे व जनता अघाडी अशी युती करुन सरपंच झाले  सन२००८ ला अशोक सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निमित्त पुढे करुन राजीनामा न देता ससाणे गटाबरोबर युती केली व एकट्यानेच प्रवेश करुन पुन्हा वीस महीने सत्ता बळकावीली व आशोक गवते यांना सरपंचपदापासुन दुर ठेवले याचा आपणास विसर पडला का ?  तसेच २०१० मध्ये कै ससाणे साहेबांचा विश्वासघात करुन ग्रामपंचायतला स्वतंत्र पँनल करुन पराभव झाला. परत २०१२ ला जि प निवडणूकीत पुन्हा मुरकुटे बरोबर युती करुन जी प सदस्यपद मिळवीले त्यानतर २०१४ ला सभापतीपदही मिळवीले २०१७ ला महाविकास अघाडीकडून मुरकुटे व राम शिंदे यांच्या गटाकडून निवडून आले अन त्याच वेळी आमदार राम शिंदे व मुरकुटे यांना टाळून विखेंशी हातमिळवणी केली अन या वेळेस गावकरी मंडळाच्या नेत्यांचाही विश्वासघात केला तसेच मिस्टर शेलार व कै जबाजी अमोलीक यांचाही विश्वासघात कुणी केला हे आठवा  अशा कोलांटउड्या मारणारांनी दुसऱ्याला तत्वज्ञान पाजाळू नये मला सत्तेची लालसा नव्हती म्हणून मीच तीन बैठका घेतल्या त्या वेळी सदस्यांचा कल उपसरपंच पदाच्या बदलाकडे  असल्याचे जाणवले त्यावरुन उपसरपंच खंडागळे याना मी त्यांच्या विरोधात काम करतो असे वाटले १५ १५ महीने असा कार्यकाल ठरला आसताना माझे काम यांच्या सांगण्यानुसार होत होते तो पर्यत यांना माझी कुठलीही आडचण झाली नाही श्रेष्ठींनीही माझा राजीनामा मगीतला नाही पण मी माझ्या कार्यकर्त्याला दोन कामे दिली तर यांच्या पोटात गोळा उठु लागला अन तेथुनच खरी सुरुवात झाली .काही ठिकाणी मी सह्या करण्याचे नाकारलै त्यामुळे तर त्यांचा माथा आणखीनच भडकला आडीच वर्ष तुमच्या मनाप्रमाणे वागलो ते चालले अन आता लगेच अविश्वास ठराव सरपंच बदलाचे वारे का वाहु लागले हे गावालाही समजले पाहीजे अजुन बरेच काही आहे वेळ आली तर  तुम्हाला सर्वासमोर उघडे करण्याचे काम मी  करेल मला संपविण्यासाठी यांनी विरोधकांशी हात मिळवणी केली तर चालते यांनी पुढील जी प व प स निवडणुकीत नवले व खंडागळे यांना सोडून गावकरी मंडळाच्या सदस्यांना उमेदवारी देवुन दाखवावी मी लगेच राजीनामा देतो मला सत्तेची लालसा नव्हती व नाही .श्रेष्ठींनी सांगावे मी कुठे चुकलो  उपसरपंच खंडागळे यांनाही सर्व पदेही मलाच पाहीजे नवले व खंडागळे यांनाच सर्व पदे हवीत श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीत सुधीर नवले सभापती झाले ते ही काहींच्या पचनी पडले नाही त्यांना सह्याचे अधीकार मिळू नये यासाठी जीवाचा आटापीटा कोणी केला हे ही तालुक्याला माहीत आहे गावाला पद मिळाले या पेक्षा सुधीर नवलेंना मिळाले यांचे दुःख झाले होते  माझी भावजयी निरक्षर आहे तसेच अमोलीक ताई नोकरी करते त्यामुळे त्यांना नामधारी पदे देवुन आपली पोळी भाजण्याचे षडयंत्र फिसकटले म्हणून यांचा तिळपापड झाला असल्याचेही सरपंच साळवी यांनी शेवटी म्हटले आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget