आषाढी एकादशीला श्रीरामपुरात कुर्बानी नाही,मुस्लिम समाज व पोलीस खात्याच्या बैठकीत निर्णय.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा मोठा सण असलेली बकरी ईद व हिंदू धर्मीय बांधवांची आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करीत आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद मधील महत्त्वपूर्ण असलेला कुर्बानीचा विधी त्या दिवशी न करण्याचा निर्णय श्रीरामपूर येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे.या निर्णयाचे सर्वत्र व्यापक प्रमाणात स्वागत करण्यात येत आहे.

येथील जामा मशिदीच्या हॉलमध्ये शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांचे सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजातील धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली जमा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू मौलाना अल्हाज मोहम्मद ईमदाद अली,माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फर शेख, नगरसेवक मुख्तार शाह, अदमदभाई जहागिरदार, मुन्ना पठाण,साजिद मिर्झा आदींसह विविध मशिदींचे मौलाना तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते अहमदभाई जहागीरदार यांनी आपल्या मनोगतातून श्रीरामपूर शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाचे संबंध खूप चांगले आहेत. श्रीरामपूरच्या शांततेला गालबोट लावण्याचे अनेक प्रयत्न आत्तापर्यंत झाले. मात्र दोन्ही समाजातील समंजस कार्यकर्त्यांमुळे इथली शांतता टिकून आहे.भविष्यात देखील हेच वातावरण कायम राहण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर राखून वागण्याची गरज आहे असे सांगून आषाढी एकादशीचे असलेले महत्त्व लक्षात घेता श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने त्या दिवशी ईद उल अज्हा निमित्त होणारे कुर्बानीचे विधि न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.

पोलीस निरीक्षक गवळी यांनी श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाने नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे असे सांगून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ईद आणि आषाढी एकादशी एकत्र येत असल्याने कुठेही शांतता भंग होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. आपण घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून श्रीरामपूरची एकात्मता राज्यामध्ये प्रसिद्ध आहे.ती अबाधित ठेवण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करू या असे आवाहन केले.

याप्रसंगी जामा मशिदीचे मौलाना मोहम्मद ईमदाद अली यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आमच्या पैगंबरांनी शांतता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे.श्रीरामपूरात सर्व हिंदू ,मुस्लिम, शीख, इसाई एकोप्याने राहतात. हीच श्रीरामपूरची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवण्याचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे.मुस्लिम समाजाने नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे. यावेळी सुद्धा ईद आणि आषाढी शांततेत साजरी होईल अशी मला आशा आहे.

याप्रसंगी अलहाज मौलाना इमदाद अली,हाफिज जोहर अली,अहमदभाई जहागीरदार, हाजी मुजफ्फर  शेख, रईस जहागीरदार साजीद मिर्ज़ा, मुख्तार शाह, मुन्ना पठान,नज़ीरभाई मुलानी, हाजी एजाज़ बारूदवाला,फिरोज खान,सलीम जहागीरदार, तौफिक शेख,अकील कुरेशी,

इलाहीबक्श कुरेशी, जोएफ जमादार,आरिफ बागवान,वजीरभाई शाह,अहमद शाह,

आमीन शाह,रशीद कुरेशी,अबुल मन्यार , रज़ा शकूर शेख,हाजी जलालुद्दीन पीरजादे, हाजी इब्राहीम कुरेशी,

अकबर खान,गफ्फार पोपटिया,रियाज़ पठान, रज्जाक पठान, इफ्तिखार शेख, सरवर अली मास्टर,नदीम तंबोली,जावेद तंबोली, कलीम कुरेशी,मोहम्मद तनवीर रजा,मौलाना नुरुल हसन,काझी हसन रजा, मौलाना कैसर,मौलाना अब्दुल लतीफ, मौलाना तौकीर रजा, सलीम रिज्वी,

याकूब शाह, हाजी अब्दूल रहेमान, इम्तियाज हसन खान, अजीम शेख आदिसह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना मशीदींचे विश्वस्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी हाजी साजिद मिर्झा यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget