कावेबाजांना तोंडघशी पडावे लागलेः--स्वाती अमोलिक


बेलापूरः(प्रतिनिधी )-गेले अडीच वर्षे गावकरी मंडळाने विकासाभिमुख कारभार केला असे असताना नवले व साळुंके यांनी सरपंच महेंद्र साळवी यांची दिशाभूल करुन ग्रामपंचायतचा कारभार अस्थिर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तसेच समाजाचीही बदनामी केली.तथापी साळवी यांनी हा कावा वेळीच ओळखून गावकरी मंडळात परतण्याचा योग्य निर्णय घेवून कावेबाजांना तोंडघशी पाडल्याची प्रतिक्रिया गावकरी मंडळाच्या ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक यांनी दिली आहे .                            बेलापूर ग्रामपंचायतीतील नुकत्याच झालेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना अमोलिक म्हणाल्या की,ग्रामस्थांनी विरोधकांना डावलून गावकरी मंडळाला बहुमत दिले.गावकरी मंडळानेही जि.परिषद सदस्य शरद नवले तसेच बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, सरपंच महेंद्र साळवी यांचे नेतृत्वाखाली जनहिताचा व विकासाभिमुख कारभार केला.पण सत्तेविना तडफडणा-यांना हे देखवले नाही.त्यांनी सरपंच महेन्द्र साळवी यांची दिशाभूल करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यात प्रामुख्याने कुणाचा सहभाग होता.हे जगजाहीर झालेले आहे .हे करत असतानाच विरोधकांनी जातीयतेचा घाणेरडा आधारही घेतला.यामुळे मागासवर्गिय समाजाची बदनामी झाल्याचा आरोप अमोलिक यांनी केला.राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घातले आणि सरपंच साळवी यांच्या  वस्तुस्थिती  लक्षात आणून दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी यांनी स्वगृही गावकरी मंडळात परतण्याचा निर्णय घेतला.यामुळे कावेबाज व कट कारस्थान करणाऱ्याचा  डाव उधळला गेला.टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट आला.ग्रामस्थांनी गावकरी मंडळाला बहुमत दिले आहे.तेव्हा विरोधकांनी जनमताचा सन्मान राखावा.स्वार्थासाठी कुटील कारस्थान करुन अस्थिरता आणून गावच्या विकासाला खिळ घालू नये अन्यथा जनमताचा अनादर केल्यास ग्रामस्थ विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहित असा इशारा अमोलिक यांनी दिला आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget