
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापूर ग्रामपंचायत सत्तांतर नाट्याबाबत स्वाती आमोलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे व बालिशपणाचे असल्याचा खुलासा ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केला आहे बेलापूर ग्रामपंचायत मधील मागील आठवड्यात सरपंच महेंद्र साळवी यांनी गावकरी मंडळातून काँग्रेस जनता विकास आघाडीत जो प्रवेश केला होता त्याबाबत चर्चा होत आहे त्यामुळे हा खुलासा देणे गरजेचे आहे मी स्वतः गावकरी मंडळातून निवडून आलो होतो . ठरल्याप्रमाणे पंधरा,पंधरा,महिने प्रत्येकी 4 सरपंच देण्याचे ठरले होते पण दोन वर्ष होऊनही काहीच हालचाली झाल्या नाही सर्व गावकरी नेत्यांना भेटुनही उत्तर मिळायचे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर सरपंच बदल करू असे मला सांगण्यात आले होते राजकीय पोळी भाजण्यासाठी जि प. निवडणूक व ठेकेदारी करण्यासाठी कोणी राजीनामा घेतला नाही हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी एक वर्षांपूर्वी गावकरी मंडळातून बाहेर पडलो सरपंचाच्या दावेदार स्वाती अमोलिक यांचे वं कुटुंबियांचे गेल्या 3ते 4 महिन्या पासून गावकरी मंडळाच्या नेत्यांच्या मागे राजीनीमा घेण्यासाठी दबाव वाढत होता परंतु काही होत नाही म्हणून कोणा मार्फत हा राजीनामा घ्यावा हा प्रश्न गावकरीच्या नेत्यांना पडला होता गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांच्या मध्यस्थीने जनता विकास आघाडी चे नेते सुधीर नवले, भरत साळुंके, रवींद्र खटोड, यांना बरोबर घेऊन,सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी कोणाच्या सांगण्या वरून महिना भर विनवण्या करत होते. मागील आठवड्यात 11 सदस्यांच्या सह्या घेऊन महेंद्र साळवी यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी तयारी झाल्याचे सरपंच यांना कळाले त्यामुळे सरपंच साळवी यांनी सभापती सुधीर नवले, व रवींद्र खटोड, भरत साळुंके,यांना भेटले मी कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही परंतु माझ्याकडून नेते मंडळींनी बरीचशी कामे चुकीचे करून घेतलेली आहे. त्याचे पुरावे त्यांचे कडे आहे त्यामुळे माझ्यावर मी एक दलित समाजाचा कार्यकर्ता असल्याने मला यातून आपणच मार्ग काढू शकता अशी विनवणी केली होती मी आपल्याबरोबर काम करण्यास तयार आहे म्हणून सरपंच महेंद्र साळवी यांनी अघाडीत येण्याचा निर्णय घेतला होता साळवी यांनाही आमच्या नेत्यांनी विश्वास दिला कि आमच्या सहा सदस्यांचा पाठिंबा आम्ही आपणास देऊ आपण तीन सदस्य आणा व कारभार तुम्हीच पहा असे ठरले होते आमच्या नेत्यांना वं मला स्वतः कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनिमित्तता झालेली आहे हे पाप वं केलेली खटाटोप झाकण्यासाठी शरद नवले अभिषेक खंडागळे यांनी गटविकास अधिकार्यकडून एक पत्र आणून त्यात 12 मुद्दे भ्रष्टाचाराचे टाकून तुम्हाला 8 दिवसाच्या आत सरपंच पद काढून घेऊ व कामाला लावू असे दबावतंत्र सरपंचांवर राबविण्यात आले
नामदार विखे साहेब यांची दिशाभूल करून सरपंचवर दबाव आणुन माघार घ्यावयास भाग पाडले आहे
राहिली समाजाची बदनामची महेद्र साळवी सुशिक्षित सरपंच असून त्यांचे वर अविश्वास आणताना समाजाची बदनामी झाली नाही का ?त्यावेळेस आपण व आपले कुटुंब त्यात सर्वात पुढे होते हे विसरले का दुसऱ्याने लिहुन दिलेल्या कागदावर सह्या करून व्हाट्सअप वर बदनामी करण्यात आली हे कटकारस्थान थांबवावेत अन्यथा आपल्या मंडळाच्या नेत्यांची महिंद्र साळवी यांच्या बाबतची मोबाईल रेकॉर्डिंग आमच्याकडे असून ती व्हायरल करू मग कोण किती खरं आणि किती खोटं हे जनतेला समजेल असेही शेवटी रमेश अमोलीक यांनी म्हटले आहे
Post a Comment