Latest Post

श्रीरामपूर : शहरातील रेव्हीन्यू कॉलनी येथील समाज मंदिरा समोरील ओपन स्पेस मध्ये ,एका अनोळखी इसमाने आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास, बंद अवस्थेतील ट्रक बॉडीला ,फेट्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. सदरची बाब लक्षात येताच, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सामाजिक कार्यकर्ते रितेश एडके व स्थानिक नागरिकांनी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सहाय्यक फौजदार श्रीधर हापसे पोलीस नाईक संजय पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन. घटनेचा पंचनामा करून अज्ञात इसमाचा मृतदेह,उत्तरीय तपासणी करिता पाठवला असून. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून. मयत इसम कोण, कुठूला व त्याने आत्महत्या का केली। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस तपास करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ७ विद्यार्थी पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष खैरनार, ऋग्वेद गांगुली,मोहित माळवे अनुष्का राठी,सावरी खटाणे तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अस्मिता रासकर,मोहीन पाटील यांनी चांगले गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रतिक्षित टेकावडे, सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश अरुण पुंड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी- कुटुंबाच्या उपजीविकेसाठी सर्वच जण काही ना काही खटाटोप करता. ज्यात शासनाच्या परवानगी घेऊन, संगमनेर नगरपालिके समोरील ८० परवाना धारक रिक्षा चालक, इमाने इतबारे, राजहंस रिक्षा स्टॉप रिक्षा चालवून आपले पोट भरत असतांना. जाणीवपूर्वक ८० रिक्षा धारकांच्या अन्नात माती काळविण्यासाठी.खोट्या तक्रारी केल्याने, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता. ४५ वर्षांपासून इमानदारीत कष्ट करणाऱ्या रिक्षा चालकांवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागाने, दडपशाहीचा वापर करून. सदर परमिटधारक रिक्षा चालकांना हुसकून लावल्याने. ४५ वर्षात कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना. आमच्यावर हा अन्याय का असा सवाल करत.वाहन चालक मालक सामजिक संघाच्या वतीने. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागास निवेदन देण्यात आले. यावेळी खोट्या तक्रारींची शहानिशा न करता. जर आमच्या अन्नात माती काळवणार असाल तर, ८ दिवसात शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून असा इशारा. चालक मालक सामजिक संघाने दिला आहे. यावेळी कुमार  परदेशी, पप्पू गोरे, मोरेश्वर परदेशी, विकास ढमाले , शाम आव्हाड ,आसिर मन्यार, सोपान चोळके, आनंदा पानसरे, मोईन शेख,विक्रांत जाधव, सचिन चौधरी, अन्वर शेख,रिपाई वाहतूक आघाडीचे सलीम शेख आदींसह, चालक मालक सामजिक संघाचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचा श्रीराम अकॅडमी सीबीएससी स्कूलचा टेबलटेनिस १४ वर्षाखालील मुलांचा संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.१४ वर्षाआतील मुलांच्या गटांमध्ये जिल्हाभरातून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात श्रीराम ॲकॅडमी संघाने दि ग सराफ संगमनेर संघाचा पराभव करून शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या विजेत्या संघातील चिराग दुधेडिया ,सक्षम दळवी ,श्लोक ढाके,अभिज्ञान वेंकटरमन,वेदांत कोरडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाआतील श्रीराम अकॅडमी मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रत्यशित टेकावडे,सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्या जयश्री पोटघन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडाशिक्षक अल्ताफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-गौरव डेंगळे ऑकलॅण्ड (न्युझीलँड): राष्ट्रकुल पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ऑकलँड न्यूझीलंड येथे राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सुरू आहे.या स्पर्धेत ९३ किलो वजन गटात श्रीरामपूरचे प्रा सुभाष देशमुख यांनी ऐतिहासिक कामगिरी करत १६७.५ किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.९३ किलो वजन गटात इंग्लंड,कॅनडा,पाकिस्तान,श्रीलंका दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,बांगलादेश,आयर्लंड,ऑस्ट्रेलिया या देशातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना प्रा देशमुख यांनी सुवर्णपदक पटकावले. न्यूझीलंडच्या खेळाडूला रोप्यपदक तर कॅनडाच्या खेळाडूला कांस्यपदक मिळाले. देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे ही माझ्या वडिलांची इच्छा होती.आज मी वयाच्या ५७ व्या वर्षीशी मी ती पूर्ण केली असे प्रा देशमुख यांनी राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अहमदनगर प्रतिनिधी-  पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एक मोठी कारवाई केली असून. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून. कमानी जवळ उभा असलेल्या, शुभम सुभाष सरोदे या २२ वर्षीय राहुरी येथील इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता. त्याच्या जवळून, २ गावठी कट्टे, १ सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे, असा ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची विचारपूस केली असता. आरोपीने जप्त करण्यात आलेले घातक शस्त्र, बेकायदशिररित्या स्वत: तयार करुन विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती समोर आल्याने. आरोपी विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचणा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वी रित्या पारपडली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये सध्या निवृत्तीचा ओघ लागला असून दर महिन्याला एक एक मोहरा निवृत्त होत आहे. एकीकडे चांगलं काम करणारे शिक्षक निवृत्त होत असतांना दुसरीकडे नवीन शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यासाठी निवृत्त होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी आमच्या शाळांमध्ये येऊन बाल गोपालांना ज्ञानदान करून सहकार्य करावे व बालगोपालांचे आशीर्वाद घ्यावेत. कारण सेवानिवृत्तांची संख्या वाढत असल्याने शालेय कामकाज चालवणे अवघड झाले आहे.आपली संपूर्ण सेवा ज्या शालेय विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी पूर्ण झाली. त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आपणही सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा मधील उपशिक्षिका सौ अरुणा प्रकाश माने(लोखंडे) या आपल्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने शाळेतर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पटारे हे बोलत होते.व्यासपीठावर नगरसेवक संतोष कांबळे,निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी के टी निंभोरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे, सलीमखान पठाण, विद्यमान संचालक बाळासाहेब सरोदे, पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार,सुभाष तोरणे, अशोक बागुल,ॲड. रमेश कोळेकर,शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन आदी उपस्थित होते.

सौ अरुणा प्रकाश माने यांनी श्रीरामपुरातच शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली. नगरपालिकेच्या विविध शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या सेवा काळात कधीही मुलांना शिक्षा केली नाही किंवा हातात छडी घेतली नाही याचा अनेक मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी विद्यार्थीनी सविता मोरे, दीप लोखंडे, मृण्मयी लोखंडे, तसेच पोपटराव वाघचौरे, अजय शिंदे, लता आवटी, मंदाकिनी गायकवाड, सचिन शिंदे आदींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सर्वश्री. लतीफ शेख, शब्बीर शेख, अशोकराव कानडे, संजय तुपे, सचिन डोळस, सचिन दळवी, मुख्याध्यापिका कृष्णा थोरे, कल्पना गायकवाड, प्रतिभा जयकर, आशाबाई शिंदे, नवनाथ अकोलकर, ताराचंद पगारे,अशोक गायकवाड, हर्षल माने, कल्पेश माने, वर्षा वाकचौरे, अमोल कल्हापुरे, संतोष लोखंडे, मंगेश लोखंडे, शुभांगी माने, सुरेखा डांगे, दिपाली शेळके, दिलावर भाई शेख, गणेश कानडे, विठ्ठल तुपे, नंदू तुपे, विनोद चतुर्भुज, मुख्याध्यापक बाबासाहेब पिलगर, दिगंबर तुपे, शंकरराव डहाळे, राजेंद्र तुपे, धनंजय तुपे, प्रकाश क्षीरसागर, योगेश शिरसागर, सविता मोरे, शरद नागरगोजे, भरत गिरी, संभाजी त्रिभुवन, सुरेश दळवी, गणेश वाकचौरे, सुमित माने, श्रीमंत चव्हाण, अजय धाकतोडे, सतीश खामकर, कांबळे टेलर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मदने यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन मुसळे, यास्मिन शेख, मनीषा सांगळे, सुनीता हंडाळ, मंदाकिनी गायकवाड, लता आवटी, अनिता बडे, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget