२ गावठी कट्टे, ५ जिवंत काडतुसासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.
अहमदनगर प्रतिनिधी- पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एक मोठी कारवाई केली असून. ज्यात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून. कमानी जवळ उभा असलेल्या, शुभम सुभाष सरोदे या २२ वर्षीय राहुरी येथील इसमास ताब्यात घेऊन झडती घेतली असता. त्याच्या जवळून, २ गावठी कट्टे, १ सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे, असा ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची विचारपूस केली असता. आरोपीने जप्त करण्यात आलेले घातक शस्त्र, बेकायदशिररित्या स्वत: तयार करुन विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती समोर आल्याने. आरोपी विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचणा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत आदींच्या पथकाने यशस्वी रित्या पारपडली.
Post a Comment