सेवानिवृत्त शिक्षकांनी ज्ञानदानासाठी सहकार्य करावे- पटारे अरुणा प्रकाश माने यांना भावपूर्ण निरोप*

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  नगरपालिका शिक्षण मंडळामध्ये सध्या निवृत्तीचा ओघ लागला असून दर महिन्याला एक एक मोहरा निवृत्त होत आहे. एकीकडे चांगलं काम करणारे शिक्षक निवृत्त होत असतांना दुसरीकडे नवीन शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.यासाठी निवृत्त होणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी आमच्या शाळांमध्ये येऊन बाल गोपालांना ज्ञानदान करून सहकार्य करावे व बालगोपालांचे आशीर्वाद घ्यावेत. कारण सेवानिवृत्तांची संख्या वाढत असल्याने शालेय कामकाज चालवणे अवघड झाले आहे.आपली संपूर्ण सेवा ज्या शालेय विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी पूर्ण झाली. त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आपणही सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा मधील उपशिक्षिका सौ अरुणा प्रकाश माने(लोखंडे) या आपल्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने शाळेतर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पटारे हे बोलत होते.व्यासपीठावर नगरसेवक संतोष कांबळे,निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी के टी निंभोरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहुजी कोल्हे, सलीमखान पठाण, विद्यमान संचालक बाळासाहेब सरोदे, पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार,सुभाष तोरणे, अशोक बागुल,ॲड. रमेश कोळेकर,शिक्षण मंडळाचे लिपिक किशोर त्रिभुवन आदी उपस्थित होते.

सौ अरुणा प्रकाश माने यांनी श्रीरामपुरातच शिक्षण घेऊन त्याच ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली. नगरपालिकेच्या विविध शाळांमधून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या सेवा काळात कधीही मुलांना शिक्षा केली नाही किंवा हातात छडी घेतली नाही याचा अनेक मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी विद्यार्थीनी सविता मोरे, दीप लोखंडे, मृण्मयी लोखंडे, तसेच पोपटराव वाघचौरे, अजय शिंदे, लता आवटी, मंदाकिनी गायकवाड, सचिन शिंदे आदींनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास सर्वश्री. लतीफ शेख, शब्बीर शेख, अशोकराव कानडे, संजय तुपे, सचिन डोळस, सचिन दळवी, मुख्याध्यापिका कृष्णा थोरे, कल्पना गायकवाड, प्रतिभा जयकर, आशाबाई शिंदे, नवनाथ अकोलकर, ताराचंद पगारे,अशोक गायकवाड, हर्षल माने, कल्पेश माने, वर्षा वाकचौरे, अमोल कल्हापुरे, संतोष लोखंडे, मंगेश लोखंडे, शुभांगी माने, सुरेखा डांगे, दिपाली शेळके, दिलावर भाई शेख, गणेश कानडे, विठ्ठल तुपे, नंदू तुपे, विनोद चतुर्भुज, मुख्याध्यापक बाबासाहेब पिलगर, दिगंबर तुपे, शंकरराव डहाळे, राजेंद्र तुपे, धनंजय तुपे, प्रकाश क्षीरसागर, योगेश शिरसागर, सविता मोरे, शरद नागरगोजे, भरत गिरी, संभाजी त्रिभुवन, सुरेश दळवी, गणेश वाकचौरे, सुमित माने, श्रीमंत चव्हाण, अजय धाकतोडे, सतीश खामकर, कांबळे टेलर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता मदने यांनी केले तर आभार प्रकाश माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन मुसळे, यास्मिन शेख, मनीषा सांगळे, सुनीता हंडाळ, मंदाकिनी गायकवाड, लता आवटी, अनिता बडे, सचिन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget