गोमांस पकडले; क्रेटाकार, टेम्पो जप्तः युपी, श्रीरामपूर, नगरच्या आरोपींचा समावेश
अहमदनगर- एसपी राकेश ओला यांच्या निर्देशाने जिल्हाभर अवैध व्यवसायावर धडक कारवाई सुरुच असून काल महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 8,000 (आठ हजार) किलो गोमांस, दोन आयशर टेम्पो व एक हुंडाई क्रेटा कार असा एकुण 34,00,000/- (चौस्तीस लाख रु) किंमतीचा मुद्देमाल जामखेड येथुन जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कारवाई केली. धक्कादायक बाब म्हणजे या गोवंश जणावरांचे मांस तस्करीत युपी (उत्तर प्रदेश) चा एक परप्रांतीय आरोपी असून श्रीरामपुर व नगरचे आरोपी आहेत. या बाबात अधिक माहीती अशी की, कर्तव्यदक्ष एसपी राकेश ओला यांनी पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/संदीप पवार, अमोल भोईटे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ/विनोद मासाळकर, जालिंदर माने, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशांना बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तौफिक कुरेशी, अहमदनगर हा त्याचा हस्तक नामे मुक्तार शेख याचे मार्फत अहमदनगर कडुन जामखेडच्या दिशेने दोन आयशर ट्रक मधुन गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने दोन आयशर टेम्पोमधुन वाहतुक करत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ अनिल कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेवुन जामखेड येथे जावुन देशी तडका हॉटेल जवळ रोडवर सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील नमुद दोन आयशर टेम्पो येताना दिसले. टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने सदर दोन्ही टेम्पो चालकांनी टेम्पो रस्त्याचे कडेला उभे केले. लागलीच पथकातील अंमलदार यांनी टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मुक्तार अब्दुल करीम शेख वय 50, रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर, 2) अल्तमश फैयाज चौधरी वय 24, रा. नालबंदखुट, अहमदनगर, 3) महेशकुमार जगदेव लोध वय 27, 4) सिराज अहमद कल्लु अन्सारी वय 28, 5) समी अहमद मुर्शरफ खान वय 28, सर्व रा. शंकरपुरमुका, ता. रिसीया, जिल्हा बहरुच, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. अहमदनगर 6) सादीक सत्तार कुरेशी वय 38, रा. खर्डा रोड, जामखेड असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष दोन्ही आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे 7) तौफिक कुरेशी, अहमदनगर यांचे मालकीचे असुन गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता 8) शेख अजहर आयुब वय 29, रा. खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड यांचेकडे जामखेड येथे पोहच करणेसाठी घेवुन चाललो असल्याची कबुली दिली. त्याचा शोध घेतला असता तो हुंडाई कंपनीचे क्रेटा कारसह पळुन जात असतांना त्याचा शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तौफिक कुरेशी, (फरार) अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
Post a Comment