वयाच्या ५७ व्या वर्षी श्रीरामपूरचे सुभाष देशमुख यांची गरुडभरारी.राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत देशासाठी पटकावले सुवर्णपदक.
श्रीरामपूर प्रतिनिधी-गौरव डेंगळे ऑकलॅण्ड (न्युझीलँड): राष्ट्रकुल पावर लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ऑकलँड न्यूझीलंड येथे राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सुरू आहे.या स्पर्धेत ९३ किलो वजन गटात श्रीरामपूरचे प्रा सुभाष देशमुख यांनी ऐतिहासिक कामगिरी करत १६७.५ किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.९३ किलो वजन गटात इंग्लंड,कॅनडा,पाकिस्तान,श्रीलंका दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड,बांगलादेश,आयर्लंड,ऑस्ट्रेलिया या देशातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करताना प्रा देशमुख यांनी सुवर्णपदक पटकावले. न्यूझीलंडच्या खेळाडूला रोप्यपदक तर कॅनडाच्या खेळाडूला कांस्यपदक मिळाले. देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे ही माझ्या वडिलांची इच्छा होती.आज मी वयाच्या ५७ व्या वर्षीशी मी ती पूर्ण केली असे प्रा देशमुख यांनी राष्ट्रकुल पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Post a Comment