श्रीराम अकॅडमी श्रीरामपूरचा टेबलटेनिस संघ विभागीय पातळीवर.
श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचा श्रीराम अकॅडमी सीबीएससी स्कूलचा टेबलटेनिस १४ वर्षाखालील मुलांचा संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ मुलांच्या टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.१४ वर्षाआतील मुलांच्या गटांमध्ये जिल्हाभरातून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात श्रीराम ॲकॅडमी संघाने दि ग सराफ संगमनेर संघाचा पराभव करून शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या विजेत्या संघातील चिराग दुधेडिया ,सक्षम दळवी ,श्लोक ढाके,अभिज्ञान वेंकटरमन,वेदांत कोरडे आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १७ वर्षाआतील श्रीराम अकॅडमी मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रत्यशित टेकावडे,सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्या जयश्री पोटघन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडाशिक्षक अल्ताफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment