आर.टी.ओ.ची दडपशाही, परमिटधारक रिक्षा चालकांवार अन्याय.
श्रीरामपूर प्रतिनिधी- कुटुंबाच्या उपजीविकेसाठी सर्वच जण काही ना काही खटाटोप करता. ज्यात शासनाच्या परवानगी घेऊन, संगमनेर नगरपालिके समोरील ८० परवाना धारक रिक्षा चालक, इमाने इतबारे, राजहंस रिक्षा स्टॉप रिक्षा चालवून आपले पोट भरत असतांना. जाणीवपूर्वक ८० रिक्षा धारकांच्या अन्नात माती काळविण्यासाठी.खोट्या तक्रारी केल्याने, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता. ४५ वर्षांपासून इमानदारीत कष्ट करणाऱ्या रिक्षा चालकांवर, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागाने, दडपशाहीचा वापर करून. सदर परमिटधारक रिक्षा चालकांना हुसकून लावल्याने. ४५ वर्षात कोणत्याही प्रकारची तक्रार नसतांना. आमच्यावर हा अन्याय का असा सवाल करत.वाहन चालक मालक सामजिक संघाच्या वतीने. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवाहन विभागास निवेदन देण्यात आले. यावेळी खोट्या तक्रारींची शहानिशा न करता. जर आमच्या अन्नात माती काळवणार असाल तर, ८ दिवसात शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून असा इशारा. चालक मालक सामजिक संघाने दिला आहे. यावेळी कुमार परदेशी, पप्पू गोरे, मोरेश्वर परदेशी, विकास ढमाले , शाम आव्हाड ,आसिर मन्यार, सोपान चोळके, आनंदा पानसरे, मोईन शेख,विक्रांत जाधव, सचिन चौधरी, अन्वर शेख,रिपाई वाहतूक आघाडीचे सलीम शेख आदींसह, चालक मालक सामजिक संघाचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
Post a Comment