पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी न्यू इंग्लिश स्कूल श्रीरामपूरचे ७ विद्यार्थी पात्र.
श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे ७ विद्यार्थी पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष खैरनार, ऋग्वेद गांगुली,मोहित माळवे अनुष्का राठी,सावरी खटाणे तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अस्मिता रासकर,मोहीन पाटील यांनी चांगले गुण मिळवून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे,सचिव प्रतिक्षित टेकावडे, सदस्य जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश अरुण पुंड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment