Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात कोल्हापूर येथील मोहिनी विद्यापीठात ज्यु शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला. विजय मच्छिंद्र बर्डे हा २ दिवसांपूर्वी,  चितळी येथे, माहेरी आलेली पत्नी शैला बर्डे हिस घेण्यासाठी आला होता. त्यावेळी आप आपसात झालेल्या वादातून, विजय  बर्डे याने, दुपारी दीड वाजेच्या सुमारास, शैला हिच्या डोक्यात फरशी टाकून तिला जखमी करून. विजय बर्डे हा फिर्याद देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात आला असता. दुपारी २ ते अडीच वाजे दरम्यान आरोपी विजय बर्डे याने त्याच्या जवळील चाकूने, अचानक पणे अंदाधुंद वार करण्यास सुरुवात केल्याने.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष रामकीसन बडे यांच्या हाताला व  तालुका पोलीस ठाण्यात चारित्र पडताळणीसाठी आलेल्या,पाथरवाला जिल्हा परिषद शाळा नेवासा,राहणार टाकळीभान येथील शिक्षक किशोर शीवाजी शिंदे यांच्या डोक्याला व पाठीला चाकू लागल्याने हे गंभीर जखमी झाले आहे . जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात माहिती मिळताच. डीवायएसपी संदीप मिटके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात, सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई केली जानार आसल्याचे व पोलीस फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे प्रतिनिधी- बेंगळुरू येथे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील १८८ विद्यापीठांमधील ४ हजार ५२९ खेळाडू सहभाग नोंदवला होता.या गेम्स मध्ये २० खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.वेटलिफ्टिंग संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण,१ रौप्य तर ४ कांस्यपदकाची कमाई केली. वैष्णव ठाकूर व चिराग वाघवले यांनी सुवर्ण,महेश अस्वले रौप्यपदक तर गणेश वायकर धैर्यशील साळुंके,तृप्ती माने व योगिता खेडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये एकूण ३९ पदके या मध्ये ८ सुवर्ण,१४ रोप्य व १७ कांस्यपदक पटकावून देशात आठवा क्रमांक पटकावला.वेटलिफ्टिंग संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रा श्री सुभाष देशमुख(एस एस जी एम कॉलेज कोपरगाव) व डॉ राहुल भोसले(अगस्ती कॉलेज,अकोले) यांनी काम पाहिले तर संघ मार्गदर्शक म्हणून प्रा श्री विजय देशमुख(बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी) यांनी काम पाहिले.यशस्वी संघाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर,विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने यांनी खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेपत्ता मुलीस शिर्डी पोलिसांच्या सहकार्याने तिच्या नातेवाईकांनी तिला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी याप्रकरणातील आरोपीस अटक का केली नाही? अशी अरेरावीची भाषा वापरुन तपास सांगण्याची गरज नाही? कायदा शिकऊ नका तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात अर्ज करून आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या अंगावर अचानक धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. यावेळी मध्यस्थीस गेलेल्या दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही मारहाण करून त्यांनाही जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोकनगर येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करत असताना या अल्पवयीन मुलीबाबत खात्रीशीर माहिती समजली की, अपहृत मुलगी ही पुणे येथे आहे. त्यावरुन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे हे पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड हे खाजगी वाहनाने दि. 10 मे 2022 रोजी पुणे येथे तपासकामी गेले. या तपासात अपहृत मुलगी पुण्यात होती. परंतु ती चंदननगर पुणे येथून राहते ठिकाण सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली म्हणून दि. 12 मे 2022 रोजी सकाळी पोलिस पुन्हा श्रीरामपूरला येत असताना माहिती मिळाली की, अपहृत मुलगी ही आरोपीसह शिर्डी येथे आहे.तसेच सदर मुलगी शिर्डी येथे असल्याचे तिच्या पालकांना माहीती मिळाली. सदरची मुलगी तिच्या पालकांच्या संपर्कात आली होती.त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना सदर मुलीचा शोध लवकर व्हावा म्हणुन अपहृत मुलीचा फोटो पाठविले तसेच मुलीचे नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक त्यांचे व्हाट्सअप वर शेअर करुन त्यांचा एकमेकांचा संपर्क करुन दिला. त्यानंतर सपोनि संभाजी पाटील यांनी सदर अपहृृत मुलीचा शोध शिडी परिसरात समाज मंदिर हॉटेल गोल्डन जवळ, हॉटेल गोडीया आणि नगरपालीका पाकिंग नंबर 02 या ठिकाणी शोध घेतला ती मिळुन आली नाही; परंतु सदर मुलगी साईबाबा मंदिराचे गेट नं 04 जवळ तिचे रावसाहेब यांना मिळून आली तेव्हा तिला शिर्डी येथून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. त्यावेळी अपहृत मुलीसोबत आरोपी हा मुलीला शिर्डी शहरात सोडुन पळुन गेला असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर रावसाहेब म्हैसमाळे, दिनांक 12 मे 2022 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुलीला घेऊन आले. काल दि. 12 मे 2022 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीस पोलीस संगणकावर तिचा जबाब नोदविण्याचा कार्यवाही करित असतांना सोबत आमच्या कक्षात अपहृत मुलीची आत्या देखील बसलेल्या होत्या. अचानक विद्युत पुरवठा बंद झाला त्यावेळी विजय बडी, त्याची पत्नी दीपाली विजय बडी, ओंकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग असे आमच्या कार्यालयीन कक्षासमोर आले. तेव्हा विजय बडी हा म्हणाला की, वैद्यकीय तपासणी तुम्ही का करत नाहीत.पोलीस उपनिरतीक्षक समाधान सुरवाडे यांनी सांगितले की वीज गेली असुन वैद्यकीय तपासणी बाबत मेमो प्रिंट काढली की लगेच मेडीकलला पाठवतो, परंतु विजय बडी म्हणाला की, तुम्ही पोलीसांनी आत्तापर्यंत काय झक मारली? तुम्ही आरोपी आत्तापावेतो का पकडला नाही? तुम्हाला समजत नाही का? आत्तादेखिल निष्कारण आमचा वेळ वाया घालवता, तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात तक्रार करुन आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो. तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देत विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांनी अरेरावी करुन, हात बुक्क्यांनी मारहाण करत आमचे सरकारी कामात अडथळा आणला.पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस शिपाई भारत तमनर, महिला पोलीस शिपाई योगिता निकम महिला पोलीस शिपाई सरग, तसेच पोलीस ठाणे अंमलदार आलम पटेल, पोका पोपट भोईटे, तसेच सुनिल मुथ्था व सुभाष जंगले यांनी आमचे कक्षाचे समोर येऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेताना पोलीस नाईक गाडेकर त्यांना देखील धक्काबुक्की केली त्यामध्ये त्यांचे हातास देखील दुखापत झाली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांचेविरुध्द भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचे चारा कापण्याचे यंत्र चोरी करणार्‍या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. चैत्यनपूर परिसरातून एका शेतकर्‍याची 20 हजार रुपये किमंतीचे मिल्कीग मशिन चोरी गेल्याची तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल झाली.या चोर्‍यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचार्‍यांसह जावून चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे तुषार बद्रीनाथ गवांदे, बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैतन्यपुर, ता. अकोले) यांचेकडे मिळुन आले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यांचे साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्यांनी मयुर रामदास महाले, दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा बेलापुर, ता. अकोले) यांचे नावे कळवुन यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील चारही इसमांना नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 20,000/- रुपये किमंतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दुध काढण्याचे मशिन), 24,000/- रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशीनचे इंजिन तसेच सदर चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 50,000/- रुपये किमंतीची बजाज प्लॉटिना मोटार सायकल नंबर एम एच 17 सी एस 2836, 45,000 रुपये किमंतीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच 17 सी पी 6343 असा एकुण 1,39,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पो. ना. किशोर तळपे व पो.ना. विठ्ठल शेरमाळे हे करत आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महामानवांनी समाजात समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच बौद्ध सेवा संघाचे कार्य देखील समाजासाठी दिशादर्शक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये या कार्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.येथील बौद्ध सेवा संघ या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अठरा वा वर्धापन दिन व त्यानिमित्ताने आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुख्याध्यापक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक नानासाहेब रेवाळे, एडवोकेट रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती.आमदार डॉक्टर तांबे पुढे म्हणाले कि आज समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करीत आहेत. परंतु पुरोगामी चळवळीतील चांगल्या विचारांची माणसं आजही कार्यरत आहे. बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रताप देवरे व त्यांचे सहकारी हे देखील समाजपरिवर्तनाचे मोलाचे कार्य करीत आहेत असे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.आमदार लहू कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कि हा देश एकसंघ रहावा याकरता घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात योग्य अशी तरतूद केलेली आहे. इंग्रजांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले. पण ते गेल्यावर राज्यघटनेने सर्वांना न्याय देण्याचे काम केले. बौद्ध सेवा संघाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य राहील असे ही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सत्कार मूर्ती यांच्या वतीने शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, रयत बँकेचे माजी चेअरमन गोरक्षनाथ बनकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.बौद्ध सेवा संघातर्फे याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणारे मान्यवर सर्वश्री आप्पाजी मोहन, विश्वनाथ बोकफोडे, सलीमखान पठाण, गोरक्षनाथ बनकर, सुगंधराव इंगळे, सुरेश चौदंते,अंकुश कानडे,कार्लस साठे, डॉ. वसंत जमदाडे, बाळासाहेब वैद्य, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रा.शिवाजी पंडित, शेख अहमद जहागिरदार, महेंद्र त्रिभुवन, सुभाष तोरणे, छगन बनकर, श्रावण भोसले, प्रकाश माने, अशोक दिवे, सरिता सावंत, वैशाली अहिरे, सुरेश देवकर, विजय शेलार, दीपक कदम, दिलीप सोनवणे, श्रीकांत मोरे, विनोद वाघमारे आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बौद्ध सेवा संघाचे दिवंगत सरचिटणीस दादासाहेब साठे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माऊली मुरकुटे, अशोक बागुल, संतोष मोकळ, उद्योगपती जितेंद्र तोरणे ,मिलिंदकुमार साळवे, सुभाष गोरे,के टी निंभोरे,ल बा कोल्हे, शब्बीर शेख, सुभाष गायकवाड, गौरव देवरे, मनिष पंकमुज, पास्टर अमोलिक, अविनाश काळे, बबन जोर्वेकर, सूर्यकांत अग्रवाल, माजी नगरसेविका मंगल तोरणे, प्रतिभा देवरे, विमल मोहन, विजय बोरडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप देवरे, सूत्रसंचालन प्रा शशिकांत बनकर तर आभार चंद्रकांत मगरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रताप देवरे, प्रकाश खैरे, चंद्रकांत मगरे, मच्छिंद्र धनसिंग, श्रीराम मोरे, भाऊसाहेब सोनवणे, छायाताई सोनवणे, देविदास पंडित, लक्ष्मण मोहन, सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, दिलीप प्रधान, अशोक दिवे, वसंत साळवे, सुभाष तोरणे यांनी प्रयत्न केले.




श्रीरामपूर प्रतिनिधी-आज दि. 09/05/2022 रोजी  संदिप मिटके Dysp  श्रीरामपूर यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे Dysp संदिप मिटके  यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. 388/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम 3,4,5,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विशेष बाब म्हणजे सदर वेश्याव्यवसाय हा गुहा गावातील भर मध्यवस्तीत सुरू होता  व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे Dysp संदीप मिटके आणि pi दराडे यांच्या पथकाचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, PI दराडे, Psi बोकील, Asi  राजेंद्र  आरोळे, HC औटी, HC  जायभाये, लक्ष्मण बोडखे,  PN विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी केली.


अहमदनगर प्रतिनिधी-सोलापूर रोडवरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा 24 तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय 35 रा. दरेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.अहमदनगर- सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी आश्विनच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.तसेच पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सदर मुलाला अहमदनगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.घरगुती वादातून नातेवाईकानेच हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्ह्यात मदत करणार्‍या आरोपीच्या एका नातेवाईकालाही या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमुल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget