पुणे प्रतिनिधी- बेंगळुरू येथे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील १८८ विद्यापीठांमधील ४ हजार ५२९ खेळाडू सहभाग नोंदवला होता.या गेम्स मध्ये २० खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.वेटलिफ्टिंग संघाने या स्पर्धेत २ सुवर्ण,१ रौप्य तर ४ कांस्यपदकाची कमाई केली. वैष्णव ठाकूर व चिराग वाघवले यांनी सुवर्ण,महेश अस्वले रौप्यपदक तर गणेश वायकर धैर्यशील साळुंके,तृप्ती माने व योगिता खेडकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये एकूण ३९ पदके या मध्ये ८ सुवर्ण,१४ रोप्य व १७ कांस्यपदक पटकावून देशात आठवा क्रमांक पटकावला.वेटलिफ्टिंग संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रा श्री सुभाष देशमुख(एस एस जी एम कॉलेज कोपरगाव) व डॉ राहुल भोसले(अगस्ती कॉलेज,अकोले) यांनी काम पाहिले तर संघ मार्गदर्शक म्हणून प्रा श्री विजय देशमुख(बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी) यांनी काम पाहिले.यशस्वी संघाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर,विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ दीपक माने यांनी खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन केले.
Post a Comment