श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात कोल्हापूर येथील मोहिनी विद्यापीठात ज्यु शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला. विजय मच्छिंद्र बर्डे हा २ दिवसांपूर्वी, चितळी येथे, माहेरी आलेली पत्नी शैला बर्डे हिस घेण्यासाठी आला होता. त्यावेळी आप आपसात झालेल्या वादातून, विजय बर्डे याने, दुपारी दीड वाजेच्या सुमारास, शैला हिच्या डोक्यात फरशी टाकून तिला जखमी करून. विजय बर्डे हा फिर्याद देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात आला असता. दुपारी २ ते अडीच वाजे दरम्यान आरोपी विजय बर्डे याने त्याच्या जवळील चाकूने, अचानक पणे अंदाधुंद वार करण्यास सुरुवात केल्याने.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष रामकीसन बडे यांच्या हाताला व तालुका पोलीस ठाण्यात चारित्र पडताळणीसाठी आलेल्या,पाथरवाला जिल्हा परिषद शाळा नेवासा,राहणार टाकळीभान येथील शिक्षक किशोर शीवाजी शिंदे यांच्या डोक्याला व पाठीला चाकू लागल्याने हे गंभीर जखमी झाले आहे . जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. सदरच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात माहिती मिळताच. डीवायएसपी संदीप मिटके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संदर्भात, सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई केली जानार आसल्याचे व पोलीस फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Post a Comment