श्रीरामपुरात पोलीस उपनिरीक्षकास मारहाण, श्रीरामपूर पोलीस स्टेशनमधील धक्कादायक घटना

श्रीरामपूर प्रतिनिधी-एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेपत्ता मुलीस शिर्डी पोलिसांच्या सहकार्याने तिच्या नातेवाईकांनी तिला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी याप्रकरणातील आरोपीस अटक का केली नाही? अशी अरेरावीची भाषा वापरुन तपास सांगण्याची गरज नाही? कायदा शिकऊ नका तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात अर्ज करून आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या अंगावर अचानक धावून जात त्यांना जोरदार मारहाण केली. यावेळी मध्यस्थीस गेलेल्या दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही मारहाण करून त्यांनाही जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोकनगर येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करत असताना या अल्पवयीन मुलीबाबत खात्रीशीर माहिती समजली की, अपहृत मुलगी ही पुणे येथे आहे. त्यावरुन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे हे पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड हे खाजगी वाहनाने दि. 10 मे 2022 रोजी पुणे येथे तपासकामी गेले. या तपासात अपहृत मुलगी पुण्यात होती. परंतु ती चंदननगर पुणे येथून राहते ठिकाण सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली म्हणून दि. 12 मे 2022 रोजी सकाळी पोलिस पुन्हा श्रीरामपूरला येत असताना माहिती मिळाली की, अपहृत मुलगी ही आरोपीसह शिर्डी येथे आहे.तसेच सदर मुलगी शिर्डी येथे असल्याचे तिच्या पालकांना माहीती मिळाली. सदरची मुलगी तिच्या पालकांच्या संपर्कात आली होती.त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांना सदर मुलीचा शोध लवकर व्हावा म्हणुन अपहृत मुलीचा फोटो पाठविले तसेच मुलीचे नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक त्यांचे व्हाट्सअप वर शेअर करुन त्यांचा एकमेकांचा संपर्क करुन दिला. त्यानंतर सपोनि संभाजी पाटील यांनी सदर अपहृृत मुलीचा शोध शिडी परिसरात समाज मंदिर हॉटेल गोल्डन जवळ, हॉटेल गोडीया आणि नगरपालीका पाकिंग नंबर 02 या ठिकाणी शोध घेतला ती मिळुन आली नाही; परंतु सदर मुलगी साईबाबा मंदिराचे गेट नं 04 जवळ तिचे रावसाहेब यांना मिळून आली तेव्हा तिला शिर्डी येथून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. त्यावेळी अपहृत मुलीसोबत आरोपी हा मुलीला शिर्डी शहरात सोडुन पळुन गेला असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर रावसाहेब म्हैसमाळे, दिनांक 12 मे 2022 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे मुलीला घेऊन आले. काल दि. 12 मे 2022 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास सदर गुन्ह्यातील अपहृत मुलीस पोलीस संगणकावर तिचा जबाब नोदविण्याचा कार्यवाही करित असतांना सोबत आमच्या कक्षात अपहृत मुलीची आत्या देखील बसलेल्या होत्या. अचानक विद्युत पुरवठा बंद झाला त्यावेळी विजय बडी, त्याची पत्नी दीपाली विजय बडी, ओंकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग असे आमच्या कार्यालयीन कक्षासमोर आले. तेव्हा विजय बडी हा म्हणाला की, वैद्यकीय तपासणी तुम्ही का करत नाहीत.पोलीस उपनिरतीक्षक समाधान सुरवाडे यांनी सांगितले की वीज गेली असुन वैद्यकीय तपासणी बाबत मेमो प्रिंट काढली की लगेच मेडीकलला पाठवतो, परंतु विजय बडी म्हणाला की, तुम्ही पोलीसांनी आत्तापर्यंत काय झक मारली? तुम्ही आरोपी आत्तापावेतो का पकडला नाही? तुम्हाला समजत नाही का? आत्तादेखिल निष्कारण आमचा वेळ वाया घालवता, तुझ्या विरुध्द वरिष्ठ कार्यालयात तक्रार करुन आम्ही आत्ता तुझी नोकरीच घालवतो. तुला व तुझ्या साहेबांना खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देत विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांनी अरेरावी करुन, हात बुक्क्यांनी मारहाण करत आमचे सरकारी कामात अडथळा आणला.पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस शिपाई भारत तमनर, महिला पोलीस शिपाई योगिता निकम महिला पोलीस शिपाई सरग, तसेच पोलीस ठाणे अंमलदार आलम पटेल, पोका पोपट भोईटे, तसेच सुनिल मुथ्था व सुभाष जंगले यांनी आमचे कक्षाचे समोर येऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेताना पोलीस नाईक गाडेकर त्यांना देखील धक्काबुक्की केली त्यामध्ये त्यांचे हातास देखील दुखापत झाली.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान अशोक सुरवाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विजय गुलाब बडी, ओकार भरत गायकवाड, पवनसिंग केशवसिंग यांचेविरुध्द भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget