अकोले प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील शेतकर्यांचे चारा कापण्याचे यंत्र चोरी करणार्या टोळीला अकोले पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. चैत्यनपूर परिसरातून एका शेतकर्याची 20 हजार रुपये किमंतीचे मिल्कीग मशिन चोरी गेल्याची तक्रार अकोले पोलीस स्टेशनला दाखल झाली.या चोर्यांना आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचार्यांसह जावून चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे तुषार बद्रीनाथ गवांदे, बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैतन्यपुर, ता. अकोले) यांचेकडे मिळुन आले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यांचे साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्यांनी मयुर रामदास महाले, दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा बेलापुर, ता. अकोले) यांचे नावे कळवुन यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील चारही इसमांना नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 20,000/- रुपये किमंतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दुध काढण्याचे मशिन), 24,000/- रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशीनचे इंजिन तसेच सदर चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 50,000/- रुपये किमंतीची बजाज प्लॉटिना मोटार सायकल नंबर एम एच 17 सी एस 2836, 45,000 रुपये किमंतीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच 17 सी पी 6343 असा एकुण 1,39,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पो. ना. किशोर तळपे व पो.ना. विठ्ठल शेरमाळे हे करत आहे.
Post a Comment