बौद्ध सेवा संघाचे कार्य दिशादर्शक - आ.डॉ. सुधीर तांबे मान्यवरांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे अशा महामानवांनी समाजात समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसारच बौद्ध सेवा संघाचे कार्य देखील समाजासाठी दिशादर्शक आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये या कार्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.येथील बौद्ध सेवा संघ या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अठरा वा वर्धापन दिन व त्यानिमित्ताने आयोजित समाजरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते.

प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, मुख्याध्यापक संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक नानासाहेब रेवाळे, एडवोकेट रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती.आमदार डॉक्टर तांबे पुढे म्हणाले कि आज समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे प्रयत्न काही घटक करीत आहेत. परंतु पुरोगामी चळवळीतील चांगल्या विचारांची माणसं आजही कार्यरत आहे. बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष प्रताप देवरे व त्यांचे सहकारी हे देखील समाजपरिवर्तनाचे मोलाचे कार्य करीत आहेत असे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.आमदार लहू कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले कि हा देश एकसंघ रहावा याकरता घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात योग्य अशी तरतूद केलेली आहे. इंग्रजांनी अनेक वर्षे देशावर राज्य केले. पण ते गेल्यावर राज्यघटनेने सर्वांना न्याय देण्याचे काम केले. बौद्ध सेवा संघाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य राहील असे ही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सत्कार मूर्ती यांच्या वतीने शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण, रयत बँकेचे माजी चेअरमन गोरक्षनाथ बनकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.बौद्ध सेवा संघातर्फे याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणारे मान्यवर सर्वश्री आप्पाजी मोहन, विश्वनाथ बोकफोडे, सलीमखान पठाण, गोरक्षनाथ बनकर, सुगंधराव इंगळे, सुरेश चौदंते,अंकुश कानडे,कार्लस साठे, डॉ. वसंत जमदाडे, बाळासाहेब वैद्य, डॉ. राजेंद्र लोंढे, प्रा.शिवाजी पंडित, शेख अहमद जहागिरदार, महेंद्र त्रिभुवन, सुभाष तोरणे, छगन बनकर, श्रावण भोसले, प्रकाश माने, अशोक दिवे, सरिता सावंत, वैशाली अहिरे, सुरेश देवकर, विजय शेलार, दीपक कदम, दिलीप सोनवणे, श्रीकांत मोरे, विनोद वाघमारे आदींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बौद्ध सेवा संघाचे दिवंगत सरचिटणीस दादासाहेब साठे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माऊली मुरकुटे, अशोक बागुल, संतोष मोकळ, उद्योगपती जितेंद्र तोरणे ,मिलिंदकुमार साळवे, सुभाष गोरे,के टी निंभोरे,ल बा कोल्हे, शब्बीर शेख, सुभाष गायकवाड, गौरव देवरे, मनिष पंकमुज, पास्टर अमोलिक, अविनाश काळे, बबन जोर्वेकर, सूर्यकांत अग्रवाल, माजी नगरसेविका मंगल तोरणे, प्रतिभा देवरे, विमल मोहन, विजय बोरडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप देवरे, सूत्रसंचालन प्रा शशिकांत बनकर तर आभार चंद्रकांत मगरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रताप देवरे, प्रकाश खैरे, चंद्रकांत मगरे, मच्छिंद्र धनसिंग, श्रीराम मोरे, भाऊसाहेब सोनवणे, छायाताई सोनवणे, देविदास पंडित, लक्ष्मण मोहन, सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, दिलीप प्रधान, अशोक दिवे, वसंत साळवे, सुभाष तोरणे यांनी प्रयत्न केले.




Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget