अपहरण झालेल्या मुलाचा 24 तासांत शोध स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; एकास अटक

अहमदनगर प्रतिनिधी-सोलापूर रोडवरील केदारी वस्ती परिसरातून अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा 24 तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश चंद्रभान भिंगारदिवे (वय 35 रा. दरेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.अहमदनगर- सोलापूर रोडवरील केदारे वस्ती येथून अश्विन या आठ वर्षीय मुलाचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी आश्विनच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकातून अपहरण करणारा संशयित नागेश चंद्रभान भिंगारदिवे याला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.तसेच पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने सदर मुलाला अहमदनगर रेल्वे स्टेशन वरून एका रेल्वेमध्ये बसवून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. पुणे रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही पुण्याला रवाना झाले. सोमवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या मुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.घरगुती वादातून नातेवाईकानेच हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गुन्ह्यात मदत करणार्‍या आरोपीच्या एका नातेवाईकालाही या गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, दिनेश मोरे, संदीप घोडके, देवेेंद्र शेलार, शंकर चौधरी, विशाल दळवी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, रोहित येमुल, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget