Latest Post

क्रीडा प्रतिनिधी गौरव डेंगळे-भुवनेश्वर (ओडिशा) : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (VFI) ने आगामी १४ व्या  यू १८ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी  २० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे.या संघामध्ये नेवासा येथील त्रिमूर्ती महाविद्यालयाची कु रक्षा खेनवार व पुण्याच्या डेक्कन जिमखानाची कु वेदिका शिंदे यांची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.कु वेदिका हि भारतीय महिला व्हॉलीबॉलचे नामांकित प्रशिक्षक श्री देविदास

जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना,पुणे येथे प्रशिक्षण घेते तर रक्षा ही ज्ञानेश्वर महाविद्यालय संचालित श्री यशवंत स्पोर्ट्स क्लब,नेवासा येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री पापा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.कु रक्षाचे शालेय शिक्षण वर्धा जिल्ह्यातील कारंजा या गावी झाले व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी नेवासा येथे प्रवेश घेतला.

६ ते १३ जुन या कालावधीत थायलंड मध्ये स्पर्धा होणार आहे. दि २१ व २२ एप्रिल रोजी भुवनेश्वर,ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीतून संभाव्य २० सदस्य भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड झालेले

खेळाडू दि २३ एप्रिल ते ४ जुन दरम्यान संघाचे सराव शिबिरामध्ये सहभागी होईल. निवड झालेल्या कु रक्षाचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतीक जयंत पाटील, सचिव श्री विरल शहा तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर प्रतिनिधी - वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यानुसार आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध अहमदनगर मंडलात धडक मोहीम हाती घेतली असून, २१ व २२ एप्रिल या दोन दिवसांत २ हजार ४०५ आकडे काढून त्यांच्या केबल जप्त करण्याचे काम केले आहे. तसेच २३९ वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रयत्नांमुळे दोन दिवसात सदर वीज वाहिन्यांवरील ताण कमी होऊन वीजभार हलका होण्यास मदत झाली आहे. या मोहीमेमध्ये कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० एम्पिअरच्या पुढे असलेल्या विद्युत वाहिन्या अहमदनगर मंडळात आहेत त्यांना लक्ष्य करुन गुरुवारी व शुक्रवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अनाधिकृतपणे कृषीपंपाला जोडलेले केबल आदी जप्त केले आहेत . घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा यावेळी काढण्यात आले आहेत. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. यामध्ये अहमदनगर मंडळातील अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर विभागात हुक टाकणाऱ्या ८९८ कृषी तर १२९ इतर वर्गवारीचे ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ कृषी व ५१ इतर ग्राहकांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागात हुक टाकणाऱ्या ३५३ कृषी तर ३७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४ इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर शहर विभागात हुक टाकणाऱ्या ३१४कृषी तर १२२ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४० कृषी व५२इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर ग्रामीण विभागात हुक टाकणाऱ्या १७१ कृषी तर १०५ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ८२इतर ग्राहकांचा समावेश आहे. कर्जत विभागात हुक टाकणाऱ्या२२२ कृषी तर ५४इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ इतर ग्राहकांचा समावेश आहे. असे एकूण अहमदनगर मंडळात हुक टाकणाऱ्या कृषी ग्राहकांमध्ये १९५८ तर ४४७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५२ कृषी व १८७ इतर असून अशाप्रकारे यामोहिमेत एकूण २ हजार ६४४ अनधिकृत जोडण्या काढण्यात आलेल्या आहेत.तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून मागणीमध्ये वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. खुल्या बाजारात विजेचे दर प्रचंड महागडे आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.मुख्यालय पातळीवरून सर्व वीजवाहिन्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधीकाऱ्यांकडे पाठवली आहे. रोहीत्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहीमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहीमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार आहे . तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नेवासा (प्रतिनिधी)राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पी.ए.  राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव येथे जीवघेणा हल्ला केला. यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला.राजळे यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. घटना काल शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली.हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी रात्री परिसराची नाकाबंदी केली होती. हल्लेखोरांचा कसून शोध सुरू होता. हल्लेखोर सराईत आणि परिसरातील असावेत असा कयास आहे.दरम्यान मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल राजळे यांचा काही वर्षांपासून गडाख परिवारासोबत आहेत. सध्या ते मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी- श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच पुनम हॉटेल महादेवाच्या मंदिराजवळ राहत असणारी 70 ते 80 वयाची वयोवृद्ध महिला ज्यांना डोळ्याने दिसण्यास कमी असल्याकारणाने रात्री पाटाच्या कडेने जात असताना पाय सटकून पाण्यात पडल्याने पाण्याच्या प्रवाहने वाहून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी च्या पाण्याच्या पाईप लाईन ला धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करून टाकल्यानंतर जिवंत राहण्याची आशा सोडली होती अशातच श्रीरामपूर शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस आपली ड्युटी बजावत असताना श्रीरामपूर कडून टिळक नगर कडे रात्री 02:30 ते 02:45 या सुमारास जात असताना गाडीचा पोलीस सायरन

वाजवला आणि त्या ठिकाणी सायरन चा आवाज ऐकून या वृद्ध महिलेने जीव वाचवण्याकरता मदत करा म्हणून आवाज लावला थोडावेळ काहीतरी आवाज आला म्हणून पोलिस सायरन बंद करून या कर्तव्यदक्ष पोलीस दादा यांनी सायरन बंद करून पुन्हा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तो आवाज पाटावरील पुलाच्या बाजून येत असल्याचा अंदाज घेत त्यांनी रात्रीच्या वेळी अंधारात मोबाइल टॉर्च मारून पाहिलं तर एक वयोवृद्ध महिला आपला जीव वाचण्याकरिता आवाज देत आहे आणि पाण्याचा प्रवाह त्या आजीला आत मध्ये वढण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य पाहून कुठल्याही क्षणाच विलंब न करता या  पो. कॉ.सातकर, पो.कॉ.गावडे ,पो.कॉ.राशीनकर, पो.कॉ.पानसंबळ कर्तव्यदक्ष पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून त्वरित आजीला वाचण्याचा प्रयत्न सुरू केला यामध्ये वीस पंचवीस मिनिटे प्रयत्न करून या आजिला वाचवण्यात आमच्या कर्तव्यदक्ष श्रीरामपूर पोलीस यांना यश आले आणि त्यांनी आजीची चौकशी करत त्यांना अगदी सुखरूप त्यांच्या घरी पोचवले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि पोलिसांचा नागरिकातून कौतुक होत आहे आणि या आजीने तर जिवंत राहण्याची आस सोडली होती पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी आणि या म्हणीप्रमाणे या पोलिसांनी या आजीला जीवदान दिले बिनदास न्यूज टीमचा सलाम या  कर्तव्यदक्ष पोलिसांना. 

श्रीरामपूर प्रतिनिधी -दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथे झालेल्या 10 th invitational national level martial arts championship स्पर्धेत श्रीरामपूर शहरातील ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मास्टर कलीम बिनसाद यांच्या मार्गदर्शनाखाली 42 विद्यार्थी या नॅशनल लेवल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मुंबई या ठिकाणी रवाना झाले होते या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली यामध्ये कलिम बिनसाद यांना 5 th dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी शुभम राऊत 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट व किरण वाघ 2nd dan black belt डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थ्यांनी हजारो मुलांमधून सुवर्णपदके व रौप्य पदके बाजी मारून ग्लोबल मार्शल आर्ट श्रीरामपूर चे नाव उंचावत नॅशनल लेव्हल चे सेकंड प्राईस ट्रॉफी मिळविली सर्वच मुलांनी

सुवर्ण व रौप्य पदक मिळवलेली आहे तसेच सप्टेंबर 2022 मध्ये थायलंडला होणाऱ्या international level world martial arts championship मध्ये या सर्व टिम ची निवड झाली आहे सप्टेंबर 2022 ला ही टिम थायलंड ला स्पर्धे साठी रवाना होईल या कार्यक्रमाचं आपल्या श्रीरामपूर शहरातील मिनी स्टेडियम याठिकाणी मुलांना मोटीवेट करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.स्वाती भोर मँडम , तलाठी भाऊसाहेब राजेश घोरपडे ,अर्थो स्पेशलिस्ट डॉ.मयूर कापसे,महाराष्ट्र लघु वृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली, इलेक्ट्रोनिक मिडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित माननीय अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्या हस्ते मुलांना मेडल सर्टिफिकेट तसेच थायलँड याठिकाणी जाण्यासाठी मुलांची नियुक्तीचे लेटर या ठिकाणी देण्यात आले याप्रसंगी अप्पर पोलीस

अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या या जगात सध्याच्या वातावरणात गरजेच महाराष्ट्र पोलीस महिलांच्या स्वरक्षणावर जास्तीत जास्त लक्ष देऊन आहे याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आम्ही मार्गदर्शन व प्रशिक्षण हे मोफत कॉलेजमध्ये शाळांमध्ये महिला गटांमध्ये कायम करत असतो मात्र आज या ठिकाणी मुलींची संख्या पाहता त्यातच अगदी सात ते आठ वर्षांच्या मुली देखील या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या या स्ट्रेचिंग योगा फाईट आणि स्वसंरक्षणाची कला पाहून मी दंग झाले इतक्‍या कमी वयात आपण इतके काही केले हे सोपे नाही आणि मी त्या पालकांचे कौतुक करेल ज्यांनी आपल्या मुलांना व मुलींना या खेळासाठी अकॅडमीत पाठवले तसेच मास्टर कलीम बिनसाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले प्रशिक्षक या मुलांना मिळाले आणि खूप कमी वेळात ज्या मुलाने तिथे गोल्ड मेडल व थायलँड ला जाण्याची संधी मिळवली त्याबद्दल मास्टर कलीम बिनसाद यांचे कौतुक करत मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तलाठी भाऊसाहेब यांनी यापूर्वी देखील मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धेत देखील चांगल्या प्रमाणात गोल्ड मेडल आणले होते असे हे ग्लोबल मार्शल आर्ट चे विद्यार्थी कायमच अशी मेडल मिळवतात आपल्या कार्यालयाच्या शेजारी या मुलांचे प्रशिक्षण पाहून मला खूप आनंद होतो आणि मी मनापासून या मुलांना शुभेच्छा देतो मास्टर कलीम बिनसाद हे अगदी चिकाटीने या मुलांना प्रशिक्षण देतात हे मी कायम पाहत असतो असे बोलून या ठिकाणी मुलांना पाठवणाऱ्या पालकांचे देखील त्यांनी कौतुकच केले

त्याचप्रमाणे शेख बरकत आली यांनी ज्या मुलांनी मुंबई या ठिकाणी जाऊन गोल्ड मेडल तसेच थायलंड याठिकाणी होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेत खेळण्यासाठी मुलांना पाठवावे व ते मुलं आपल्या शहराचे व आपल्या देशाचे नाव देश-विदेशात मोठे करतील यासाठी आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे व काही अडचण आल्यास आम्ही खंबीर उभे राहू असे त्यांनी यावेळेस मुलांचे कौतुक करतानी व शुभेच्छा देताना बोलले या वेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट अजित डोखे यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार ललित ताथेड यांनी मानले. 

 

श्रीरामपुरात प्रतिनिधी- शहरातील एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व प्राथमिक  या शाळा ची पुर्ण पणे दुरवस्था झाली आहे.  मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर शाळा ची वालकॅमपाऊड भिंत खचली व तुटली आहे ,मुलांना  मुतारी व सौचलय  मोडके आहे खेळाला मैदान शौच्छालय नाही आशा अनेक कारण्यावरून भारतीय लहुजी सेना यांनी विस्तार आधीकारी संजिवन  दिवे पंचायत समिती यांना निवेदन मध्ये कळवीयात आले आहे. सदर मागणी आठ दिवस पुर्ण न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन  26/4/022 दिवसीय  करण्यात येईल असा इशारा भारतीय लहुजी सेना च्या वतीने निवेदन मध्ये  सांगीतले आहे. सदर निवेदन मध्ये मा बाळासाहेब बागुल राष्ट्रीय अध्यक्ष, हानिफ भाई पठान राष्ट्रीय सचिव, रज्जाक भाई शेख नगर जिल्हा अध्यक्ष, रईस शेख जिल्हाप्रसिद्धी प्रमुख, राजेंद्र त्रिभोवन जेष्ठ पत्रकार, साबीर शाहा, शेरू कुरेशी, अमजद कुरेशी, आदी च्ये सह्या आहे.

श्रीरामपूर-चित्रकार भरतकुमार उदावंत व चित्रकार रवी भागवत संचलित रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगलहरी चित्रकला स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील सुमारे १५०० हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रकलेचा आनंद लुटला. स्पर्धेचे वैशिष्ठय् म्हणजे वय वर्षे ४ पासून ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील यात सहभाग नोंदविला.येथील रंगलहरी कला दालनाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन किशोर निर्मळ, संदिप शाह, राजेंद्र कांबळे, अजय डाकले, दिलीप कांबळे, चेतन नलावडे, विश्वजीत सुखदरे, सुरज सोमाणी, अशोकराज आहेर, प्रसिद्ध निवेदक संतोष मते, अभिषेक खंडागळे, बिनीत शाह उदावंत, भागवत, आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. किलबील, लहान, मध्यम व खुला अशा चार गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निर्मळ म्हणाले,

सांस्कृतिक वारसा वाढविणयासाठी अशा उपक्रमांचे वरचेवर आयोजन करणे गरजेचे आहे. त्यातून येणारी पिढी मनाने सशक्त बनेल . सर्वच वयोगटातील स्पर्धकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद बघून भारावलो असल्याचे ते म्हणाले.राजेंद्र कांबळे म्हणाले, कलेच्या सानिध्यात मनुष्याला किती आनंद मिळतो, हे आज पहावयास मिळाले. कुठल्याही कलेची साधना केल्यास मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मकता प्रवेशच करू शकत नाही. ही कलेची ताकद असते.आयोजकांकडून स्पर्धकांना ड्रॉईंग शिट्स वाटप करण्यात आले होते तरीही काही स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चाने कॅनव्हॉस, हॅण्डमेड पेपर्स आणून चित्रे काढली. कोरोनामुळे दोन ते तीन वर्षांपासून अशा स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. त्यामुळे रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने राबविलेल्या या उपक्रमास श्रीरामपूर तालुक्यासह, नाशिक, पुणे, कोपरगाव, राहाता येथील स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पत्रकार विकास अंत्रे, अशोकराज आहेर, श्री. धनवटे सर, संदिप कासार,  जीवन सुरूडे, सत्यजित उदावंत, अमितराज आहेर, राजेंद्र उदावंत, विजय फुलारे, ललित बनसोडे, भाऊसाहेब बनकर, प्रशांत जोर्वेकर, सोनिया कंकड, रविंद्र निकम, भारत शेंगळ, अर्चना आहेर, मिनल भागवत, पुर्वा पवार, चैतन्या आहेर, ईश्वरी भागवत, साईश भागवत, कविता बनसोडे

आदी प्रयत्नशील होते. सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक संतोष मते यांनी केले.चौकट-६५ वर्षांचा ज्येष्ठ स्पर्धक चित्रकलेतील सर्वांच्या अभिरूचीला वाव देण्यासाठी रंगलहरी आर्ट ॲकॅडमीने स्पर्धेत चार वर्षांपुढील सर्वांनाच सहभाग घेण्याची मुभा दिली होती. त्यास खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सर्वच वयोगटातील अनेक कलाकारांनी आपली हौस यावेळी भागवली. येथील कारभारी सलालकर या ६५ वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारानेही स्पर्धेत सहभाग घेत अतिशय सुंदर चित्र रेखाटले. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबच अनेक शिक्षकांनीही चित्र रेखाटून स्पर्धेचा आनंद लुटला.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget