Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणार आहे म्हणून त्यांचे विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांतर्फे मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी श्रीरामपूर यांना  निवेदन देऊन करण्यात अली आहे,

आपला भारत देश हा सार्वभौम असून भारत देशामध्ये हिंदु, मुस्लिम,सिख, ईसाई, बौद्ध,वगैरे असे सर्वच गुण्यागोविंदाने राहतात,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला आपआपल्या समाजाचा व धर्माचा प्रचार - प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे,त्यातच गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबई येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने मस्जिदीवरील भोंगे वाजल्यास त्यासमोर लाऊड स्पिकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते,त्यांच्या आवाहानाला अनुसरून राज्यामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगली भडकवण्याचे/होण्याचे प्रकार होत आहे ? त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे,त्यामुळे देशाची व राज्याची सुरक्षा धोक्यात येत आहे म्हणून अशा समाजद्रोही प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यात यावा व राज ठाकरे यांचेवर तसेच त्यांना पाठबळ  देणाऱ्या कार्यकर्त्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करणेत यावा.अशा मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी  श्रीरामपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,यावेळी त्यांच्यासह आसिफ तांबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण,इमरान शेख,मतीन शेख, राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह,अफरोज़ शाह,अरबाज़ शाह,सोहेल शेख, रितेश सोनवणे, मोसिन शेख, लियाकत खान, दानिश बागवान, मोसिन शेख, तनवीर शाह,आदी उपस्थित होते.


श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यासह शहरात ऐन सण-उत्सवाच्या काळातच तासन्तास वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या विभागातील अधिकार्‍यांनी तर नको ग्राहकांचा डोक्याला ताप म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून बिनधास्त झाले आहेत. इकडे उष्णतेच्या उकाड्यामुळे नागरिक संतप्त झाले असून आता दाद कोणाकडे मागावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.काल सलग दुसर्‍या दिवशी तालुक्यासह शहरातील वीज दुपारपासून गायब होती. रात्री उशिरा कधीतरी वीज आली आणि गायबही झाली हे लोकांना कळलेच नाही. काही नागरिक उकाड्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, रात्र रात्र जागून काढत आहेत. वीज कधी येणार अशी विचारणा कर्मचार्‍यांकडे केली तर कर्मचारी तर या विभागाचे प्रमुख आहेत असे समजून नागरिकांबरोबर अर्वाच्च भाषा वापरून उडावाउडवीची उत्तरे देत असतात. कधी काहीही न सांगता फोन ठेवून देत कट करत असतात. वरिष्ठ सर्वच अधिकार्‍यांनी तर वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा नाहक त्रास नको म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले आहेत. एकीककडे नागरिकांची झोप उडवायची आणि दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचे असा प्रकार सध्या या विभागात सुरू आहे.काल दुसर्‍या दिवशीही वीज अचानक कधीही जाते आणि कधीही येते. यामुळे शहरातील पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. गेली दोन दिवस शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही हे अचानक जाहीर केल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. भर उन्हाळ्याच्या काळात पाणी पाणी अशी परिस्थिती झाली आहे. वीज कशामुळे गेली? का गेली? अशी चौकशी करण्याकरिता फोन केला असता कोणीही धड उत्तर दिले नाही. महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले असून कर्मचारी मनमानी पध्दतीने आपले कामकाज करत आहेत. त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.लोडशेडींग आहे की नाही याची कल्पना नागरिकांना दिली जात नाही. वीज कधी जाणार कधी येणार याचीही माहिती दिली जात नाही. पूर्वी शहरात व तालुक्यात वीज कधी जाणार कधी येणार याची सविस्तर माहिती मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावर टाकली जात होती. मात्र माहिती टाकणे तर सोडाच परंतु स्वतःचे मोबाईलही स्वीच ऑफ करून ठेवण्याएवढी मजल अधिकार्‍यांची झाल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.

थकबाकी असताना नागरिकांना दमबाजी करून कायद्याची भाषा वापरुन त्याचा धाक दाखवत वसुली करण्याचा धडाका वितरणने चालविला होता तसा धडाका वीज का जाते आणि ती कधी येणार-कधी जाणार याची माहिती देण्याचा ठेवला असता तर नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले नसते. वीज कट करताना त्यांची भाषा ग्राहकांना अपमान करणारी व वेदना देणारी होती आता अधिकार्‍यांची तोंडे बंद का? असा सवालही यावेळी विचारला जात आहे. काही ठिकाणी 80 टक्के वसुली होऊनही त्या ठिकाणी वीज नियमित देण्याची सेवा का दिली जात नाही? असा सवालही केला जात आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - पवित्र रमजान महिना, श्रीरामवमी,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जंयती, महावीर जयंती, गुड फ्राईडे ह.सय्यदबाबा उर्स अशी विविध धर्मियांची विविध धार्मिक उत्सवांमध्ये लागु केलेले अन्यायकारक विजेचे भार नियमन त्वरित रद्द करून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर समाजवादी पार्टीच्या असंख्य कार्याकर्त्यां समवेत त्रस्त नागरीक आंदोलन छेडणार असल्याचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या पवित्र रमजान हा मुस्लिम धर्मियांचा उपवासाचा महिना सुरु आहे,उपवास (रोजा), तरावीह नमाज (प्रार्थना) असून भारनियमनामुळे अत्यावश्यक सेवामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील भरल्या जात नाही, त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही,सध्या एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळा जानवू लागला असल्याने पुढे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हंगाम सुरु होणार आहे,तसेच याच महिन्यात सर्वधर्मियांचे सण /उत्सव  सुरु असून विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाने जाणुन बुजून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे,तो खुपच त्रासदायक असून अन्यायकारक पध्दतीने तब्बल नऊ तासांचे दररोजचे भार नियमन सुरु केलेले आहे,त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे,तसेच विज बिलाची तर आगदी सक्तीने वसुली होत असून विज बिल भरले नाहीतर विज पुरवठा खंडित करण्यात येतो आहे,तरी आपणास या नम्र निवेदनाद्वारे विनंती करणेत येते की, हे जुलुम जबरदस्तीचे विज भारनियमन तातडीने रद्द करून वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करणेत यावा अन्यथा नाईलाजास्तव आपले कार्यालया समोर समाजवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्रस्त नागरीक कोणतीही पुर्व सुचना न देता येत्या दोन चार दिवसातच लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यापासून उद्भवलेल्या बरे - वाईट परिणाममास संबंधित महावितरण प्रशासनच जबाबदार राहील तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार होऊन विजेचे अन्यायकारक भार नियमन तातडीने रद्द करावे,असा ईशारा समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी महावितरण कंपनीच्या उप व कार्यकारी अभियंत्यांसह तहसिलदार श्रीरामपूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,

यावेळी आसिफ ताबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण, इमरान शेख,मतीन शेख,राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह, अफरोज़ शाह,अरबाज़ शाह, सोहेल शेख,रितेश सोनवणे, मोसिन शेख,लियाकत खान, दानिश बागवान,मोसिन शेख, तनवीर शाह, आदी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर उक्कलगाव रोडवरील असलेल्या रहेमानीया काँम्प्लेक्स मधील मागील बाजुचे पत्रे पाच दुकाने फोडण्यात आली असुन चोरट्यांनी गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये लांबविले  बेलापुरातील काही दिवसापूर्वी झालेल्या दोन चोरींचा तपास लागलेला नसतानाच काल बेलापुर उक्कलगाव रोडवरील नविन झालेल्या पत्र्याच्या गाळ्याचे असलेल्या मागील बाजुचे पत्रे उचकटून चार दुकाने फोडण्यात आलीअसुन या दुकानातील काही रक्कम चोरीस गेलेली आहे या ठिकाणी असलेले जनता ट्रेडर्स हे दुकान

पाठीमागील बाजुकडून फोडण्यात आले त्या दुकानात मोठ्या प्रमाणात माल भरलेला असल्यामुळे नेमका किती माल गेला हे समजु शकलेले नाही मात्र या ठिकाणी देणगी करीता ठेवण्यात आलेले बाँक्स फोडून त्यातील पैसे लांबविण्यात आले त्या ठिकाणी गल्यातील पाच हजार रुपयांची चिल्लर चोरट्याने लंपास केली त्या नंतर जे बी फँशन हे कपड्याचे दुकान फोडण्यात आले मात्र दुकानात काहीही नसल्यामुळे चोरट्याने तेथुन काढता पाय घेतला या दुकानात गल्ल्यात २५ हजार रुपये रोख होते तसेच काउंटरला चावी देखील तशीच होती परंतु दुकानात काहीच सामान नसल्यामुळे गाळा बंद

असावा असा गैरसमज झाल्यामुळे गाळामालाक बिनसाद यांचे २५ हजार रुपये वाचले त्यानंतर अश्पाक बागवान यांचे सेतू कार्यालयही फोडण्यात आले त्या शेजारी आसणारी भोसले डेअरीच्या गाळ्याचाही पत्रा मागीला बाजुने उचकटुन दुकानात प्रवेश केला परंतु तेथील काहीच सामान चोरीला गेले नाही त्यानंतर चोरट्याने आपला मोर्चा अरुण गोळे यांच्या अश्विनी मेडीकलकडे वळवीला छतावरील पत्रा कापून चोरट्याने दुकानात प्रवेश केला गल्ल्यात असणारी चिल्लर तसेच चेकबुक काही ठेव पावत्या घेवुन चोरट्याने तेथुन पोबारा केला मेडीकल मधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झालेला आहे त्याच शेजारी असणाऱ्या ताईसाहेब द फँमीली लेडीज व मेन्स वेअर हे ही दुकान वरील पत्रा उचकटून फोडण्यात आले तेथील एक ड्रेस व सुटे पैसे नेण्यात आले असुन चोरटे हे दोन जण असावेत असा अंदाज आहे घटनेची माहीती समजताच बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी घटनास्थळी भेट देवुन माहीती घेतली  बेलापुर बाजार समीतीच्या आवारातून संचेती यांच्या तीस गोण्या सोयाबीनची  सुमारे सव्वा लाख रुपयांची चोरी झाली असुन त्यांनी देखील फिर्याद देण्याचे टाळले आहे बाजार समीतीच्या सेल हाँल मधुन यापूर्वीही बऱ्याच वेळा व्यापाऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे बाजार समीतीने या करीता मजबुत असे सेल हाँल बांधुन द्यावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे या बाबत बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला कुणीही चोरी झाल्याचे कळवीले नाही तसेच पोलीसाकडेही तक्रार दाखल झालेली नाही सव्वा लाखाची चोरी होवुन देखील व्यापारी गप्प का ? असा सवाल उपस्थित होतो

पुणे ( प्रतिनिधी) : उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या १४ व्या यू १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी श्री विरल शहा यांची नियुक्ती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.६ ते १३ जुन २०२२ दरम्यान तस्खेत,उज्बेकिस्तान येथे चौदाव्या यु १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.श्री शहा यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा काम पाहिले आहे. तसेच नेपाळ येथे झालेल्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महिला संघाने पटकावलेल्या सुवर्णपदक संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या श्री शाह हे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री शहा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आगामी १४ व्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताच्या मुली सर्वोत्तम प्रदर्शन करतील व स्पर्धेचे विजेतेपद निश्चित पटकावतील.आपला संघ सर्व क्षेत्रात मजबूत आहे,असे ते पुढे म्हणाले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतिक जयंत पाटील, राज्यातील सर्व विभागीय सचिव तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी-भाजपा प्रणित मोदी सरकार हे भांडवलधार्जिने सरकार असून शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय न घेता आपला मित्र असलेल्या उद्योगपतींच्या व बड्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने देशातील शेतकरी गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. असे प्रतिपादन आ. लहूजी कानडे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाई मुक्त भारत अभियानांअंतर्गत श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात लाँग मार्च प्रसंगी काढले.यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, नगरसेवक अंजुमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, माजी नगराध्यक्ष देवळाली प्रवरा बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक रवींद्र गुलाटी, अंकुशराव कानडे, अशोक कानडे, अशोक बागुल, अनु.जाती सेलचे सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, जिल्हा सचिव समीन बागवान, श्रीरामपूर महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीमती अप्सरा भाभी शेख, नगरसेवक राजेश अलग, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, किशोर बकाल, विष्णुपंत खंडागळे होते.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी हाजी मुक्तार शहा,विजय शेळके, कलिम कुरेशी,बद्रुद्दिन पिरजादे,सुरेश शिंदे, सरपंच दत्तात्रय आदिक, सागर मुठे, दिनकर बनसोडे, किशोर नाना बनकर, सोपान औताडे सुरेश पवार,राजेंद्र औताडे, मदन हाडके, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, ॲङ विलास थोरात, एन.एस.यु.आय.प्रदेश सचिव अक्षय नाईक, युवक शहरअध्यक्ष अभिजित लिप्टे, काँग्रेस सेवादलचे पन्नालाल कुमावत, सराला बेटाचे सचिन जगताप, सरवरअली सय्यद, दीपक कदम, सुदाम पटारे, राजेंद्र भांड, दिलीप अभंग, सुहास शेलार, कामगार संघटनेचे इम्रान शेख, भैय्याभाई शहा, अशोक भोसले, रामराव शेटे, ॲङ मधुकर भोसले, सुनील शिनगारे, राजेंद्र कोकणे, नानासाहेब रेवाळे, मच्छींद्र मासाळ, अमोल आदिक, भाऊसाहेब पारखे, दिलीप गलांडे, साईनाथ गवारे, राजेंद्र कोकणे, मुदस्सर शेख, संभाजी राजे कदम, अजय खिलारी, राजेंद्र बोरुडे, सुखदेव मुसमाडे, दीपक ना.पठारे, सुहास शेलार, सुहास महांकाळे, संतोष मोकळ, अंतोन अमोलिक, गोविंदराव वाघ, दिनकर बनसोडे, नरेंद्र आसने आदींनी मोलाचे सहकार्य केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-ऑनलाईन नोंदणी न करताच तात्काळ कागदपत्रांची मागणी करुनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्‍यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकार्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले. मात्र हे दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकार्‍यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन त्यांना मारहाण केली. यावेळी या परिरातील वातावरण संतप्त झाले होते.या घटनेची माहिती कळताच सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेवून सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. या दोघांनाही ताब्यात घेत पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून अशा घटनेचा निषेध करत होते. या दहशतीमुळे परिवहन कार्यालय परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येवून गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे सदर घटनेवर नियंत्रण ठेवून होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget