आपला भारत देश हा सार्वभौम असून भारत देशामध्ये हिंदु, मुस्लिम,सिख, ईसाई, बौद्ध,वगैरे असे सर्वच गुण्यागोविंदाने राहतात,भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला आपआपल्या समाजाचा व धर्माचा प्रचार - प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे,त्यातच गुढी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुंबई येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने मस्जिदीवरील भोंगे वाजल्यास त्यासमोर लाऊड स्पिकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते,त्यांच्या आवाहानाला अनुसरून राज्यामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगली भडकवण्याचे/होण्याचे प्रकार होत आहे ? त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे,त्यामुळे देशाची व राज्याची सुरक्षा धोक्यात येत आहे म्हणून अशा समाजद्रोही प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यात यावा व राज ठाकरे यांचेवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करणेत यावा.अशा मागणीसाठी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांनी मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,यावेळी त्यांच्यासह आसिफ तांबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण,इमरान शेख,मतीन शेख, राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह,अफरोज़ शाह,अरबाज़ शाह,सोहेल शेख, रितेश सोनवणे, मोसिन शेख, लियाकत खान, दानिश बागवान, मोसिन शेख, तनवीर शाह,आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या वक्त्वयांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका ; कारवाई करण्यासाठी समाजवादीची मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणार आहे म्हणून त्यांचे विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांतर्फे मा.उप विभागीय (प्रांत)अधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन देऊन करण्यात अली आहे,
Post a Comment