उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या १४ व्या यू १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी श्री विरल शहा यांची नियुक्ती.
पुणे ( प्रतिनिधी) : उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या १४ व्या यू १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी श्री विरल शहा यांची नियुक्ती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.६ ते १३ जुन २०२२ दरम्यान तस्खेत,उज्बेकिस्तान येथे चौदाव्या यु १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.श्री शहा यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा काम पाहिले आहे. तसेच नेपाळ येथे झालेल्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महिला संघाने पटकावलेल्या सुवर्णपदक संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या श्री शाह हे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री शहा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आगामी १४ व्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताच्या मुली सर्वोत्तम प्रदर्शन करतील व स्पर्धेचे विजेतेपद निश्चित पटकावतील.आपला संघ सर्व क्षेत्रात मजबूत आहे,असे ते पुढे म्हणाले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतिक जयंत पाटील, राज्यातील सर्व विभागीय सचिव तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment