श्रीरामपूर आरटीओ अधिकार्‍यास मारहाण दोघांविरुध्द गुन्हा दाखल आरटीओ अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात.

श्रीरामपूर प्रतिनिधी-ऑनलाईन नोंदणी न करताच तात्काळ कागदपत्रांची मागणी करुनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्‍यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकार्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले. मात्र हे दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकार्‍यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन त्यांना मारहाण केली. यावेळी या परिरातील वातावरण संतप्त झाले होते.या घटनेची माहिती कळताच सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेवून सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. या दोघांनाही ताब्यात घेत पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून अशा घटनेचा निषेध करत होते. या दहशतीमुळे परिवहन कार्यालय परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येवून गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे सदर घटनेवर नियंत्रण ठेवून होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget