बेलापुर (प्रतिनिधी )-आपल्या विविध मागण्या बाबत बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु केलेले धरणे आंदोलन सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांच्या अश्वासनानंतर मागे घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु करु कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावेत प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी पगार वाढ देण्यात यावी भविष्य निर्वाह निधीची रक्कम नाशिक येथील खात्यावर भरण्यात यावी आदिसह विविध मागण्यासाठी बाबासाहेब प्रधान राजेंद्र भिंगारदिवे अशोक राऊत नंदकुमार गायकवाड म्हाळू खोसे रविंद्र मेहेत्रे रमेश लगे दत्तात्रय वक्ते योगेश अमोलीक बाबासाहेब लोंढे सचिन नगरकर सचिन साळूंके अमोल साळवे संकेत मोडके अनिल गाढे किरण खरोटे रविंद्र बागडे अविनाश तेलोरे अविनाश शेलार असिफ ठाकुर शाम भिंगारदीवे सागर भिंगारदीवे उज्वला मिटकर अलका भिंगारदीवे सुशिला खरात सरस्वती बागडे निर्मला तेलोरे सागुणा तांबे कलाबाई शेलार निर्मला भिंगारदीवे निर्मला गाढे आदि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमीक संघाचे काँ जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केले होते सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी सुरुडे व इतर कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही कोरोनामुळे वसुली नाही तसेच फेर आकारणी करावयाची आहे त्यामुळे फेर आकारणी नंतर पगार वाढीबाबत निर्णय घेण्यात येईल अश्वासन दिले त्यांच्या अश्वासनावर समाधान झाल्यामुळे आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याचे सुरुडे यांनी सांगितले
Post a Comment