या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सध्या पवित्र रमजान हा मुस्लिम धर्मियांचा उपवासाचा महिना सुरु आहे,उपवास (रोजा), तरावीह नमाज (प्रार्थना) असून भारनियमनामुळे अत्यावश्यक सेवामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील भरल्या जात नाही, त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही,सध्या एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळा जानवू लागला असल्याने पुढे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हंगाम सुरु होणार आहे,तसेच याच महिन्यात सर्वधर्मियांचे सण /उत्सव सुरु असून विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाने जाणुन बुजून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे,तो खुपच त्रासदायक असून अन्यायकारक पध्दतीने तब्बल नऊ तासांचे दररोजचे भार नियमन सुरु केलेले आहे,त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे,तसेच विज बिलाची तर आगदी सक्तीने वसुली होत असून विज बिल भरले नाहीतर विज पुरवठा खंडित करण्यात येतो आहे,तरी आपणास या नम्र निवेदनाद्वारे विनंती करणेत येते की, हे जुलुम जबरदस्तीचे विज भारनियमन तातडीने रद्द करून वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत करणेत यावा अन्यथा नाईलाजास्तव आपले कार्यालया समोर समाजवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्रस्त नागरीक कोणतीही पुर्व सुचना न देता येत्या दोन चार दिवसातच लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल यापासून उद्भवलेल्या बरे - वाईट परिणाममास संबंधित महावितरण प्रशासनच जबाबदार राहील तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार होऊन विजेचे अन्यायकारक भार नियमन तातडीने रद्द करावे,असा ईशारा समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी महावितरण कंपनीच्या उप व कार्यकारी अभियंत्यांसह तहसिलदार श्रीरामपूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,
यावेळी आसिफ ताबोळी,संदीप पवार,गणेश पवार,शादाब पठाण, इमरान शेख,मतीन शेख,राजू वेल्डर, अवेज़ शेख,दानिश शाह, अफरोज़ शाह,अरबाज़ शाह, सोहेल शेख,रितेश सोनवणे, मोसिन शेख,लियाकत खान, दानिश बागवान,मोसिन शेख, तनवीर शाह, आदी उपस्थित होते.
Post a Comment