Latest Post

पुणे ( प्रतिनिधी) : उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या १४ व्या यू १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी श्री विरल शहा यांची नियुक्ती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.६ ते १३ जुन २०२२ दरम्यान तस्खेत,उज्बेकिस्तान येथे चौदाव्या यु १७ मुलीच्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.श्री शहा यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा काम पाहिले आहे. तसेच नेपाळ येथे झालेल्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महिला संघाने पटकावलेल्या सुवर्णपदक संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या श्री शाह हे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्री शहा यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की आगामी १४ व्या आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत भारताच्या मुली सर्वोत्तम प्रदर्शन करतील व स्पर्धेचे विजेतेपद निश्चित पटकावतील.आपला संघ सर्व क्षेत्रात मजबूत आहे,असे ते पुढे म्हणाले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री प्रतिक जयंत पाटील, राज्यातील सर्व विभागीय सचिव तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी-भाजपा प्रणित मोदी सरकार हे भांडवलधार्जिने सरकार असून शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय न घेता आपला मित्र असलेल्या उद्योगपतींच्या व बड्या भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याने देशातील शेतकरी गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. असे प्रतिपादन आ. लहूजी कानडे यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महागाई मुक्त भारत अभियानांअंतर्गत श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात लाँग मार्च प्रसंगी काढले.यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, नगरसेवक अंजुमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, माजी नगराध्यक्ष देवळाली प्रवरा बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक रवींद्र गुलाटी, अंकुशराव कानडे, अशोक कानडे, अशोक बागुल, अनु.जाती सेलचे सुभाष तोरणे, किशोर बकाल, प्रताप देवरे, जिल्हा सचिव समीन बागवान, श्रीरामपूर महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीमती अप्सरा भाभी शेख, नगरसेवक राजेश अलग, तालुका उपाध्यक्ष सतीश बोर्डे, किशोर बकाल, विष्णुपंत खंडागळे होते.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी हाजी मुक्तार शहा,विजय शेळके, कलिम कुरेशी,बद्रुद्दिन पिरजादे,सुरेश शिंदे, सरपंच दत्तात्रय आदिक, सागर मुठे, दिनकर बनसोडे, किशोर नाना बनकर, सोपान औताडे सुरेश पवार,राजेंद्र औताडे, मदन हाडके, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, रमेश आव्हाड, ॲङ विलास थोरात, एन.एस.यु.आय.प्रदेश सचिव अक्षय नाईक, युवक शहरअध्यक्ष अभिजित लिप्टे, काँग्रेस सेवादलचे पन्नालाल कुमावत, सराला बेटाचे सचिन जगताप, सरवरअली सय्यद, दीपक कदम, सुदाम पटारे, राजेंद्र भांड, दिलीप अभंग, सुहास शेलार, कामगार संघटनेचे इम्रान शेख, भैय्याभाई शहा, अशोक भोसले, रामराव शेटे, ॲङ मधुकर भोसले, सुनील शिनगारे, राजेंद्र कोकणे, नानासाहेब रेवाळे, मच्छींद्र मासाळ, अमोल आदिक, भाऊसाहेब पारखे, दिलीप गलांडे, साईनाथ गवारे, राजेंद्र कोकणे, मुदस्सर शेख, संभाजी राजे कदम, अजय खिलारी, राजेंद्र बोरुडे, सुखदेव मुसमाडे, दीपक ना.पठारे, सुहास शेलार, सुहास महांकाळे, संतोष मोकळ, अंतोन अमोलिक, गोविंदराव वाघ, दिनकर बनसोडे, नरेंद्र आसने आदींनी मोलाचे सहकार्य केले.

श्रीरामपूर प्रतिनिधी-ऑनलाईन नोंदणी न करताच तात्काळ कागदपत्रांची मागणी करुनही ती दिली नाही म्हणून शिरसगाव येथील दोघांनी श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ आरटीओ अधिकार्‍यास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.शिरसगाव येथील गणेश आमले व विजय जाधव हे दोन तरुण मोटारसायकलवरुन आले आणि बरेच दिवस झाले सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली असून आम्हाला आमची रजिस्टर नोंदणी करावी, अशी मागणी केली. त्यावर आरटीओ अधिकार्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करा तुम्हाला तात्काळ तुमचे रजिस्ट्रेशन नोंदणी करतो असे सांगितले. मात्र हे दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी त्या अधिकार्‍यास शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन त्यांना मारहाण केली. यावेळी या परिरातील वातावरण संतप्त झाले होते.या घटनेची माहिती कळताच सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेवून सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून घटनास्थळी धाव घेतली. या दोघांनाही ताब्यात घेत पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून अशा घटनेचा निषेध करत होते. या दहशतीमुळे परिवहन कार्यालय परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येवून गणेश आमले व विजय जाधव या दोघांविरुध्द शिवीगाळ करुन मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे सदर घटनेवर नियंत्रण ठेवून होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपल्या विविध मागण्या बाबत बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  सुरु केलेले धरणे आंदोलन सरपंच महेंद्र साळवी  उपसरपंच अभिषेक खंडागळे  व ग्रामविकास  अधिकारी राजेश तगरे यांच्या अश्वासनानंतर मागे घेण्यात आले.  महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु करु कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावेत प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी पगार वाढ देण्यात यावी भविष्य निर्वाह निधीची रक्कम नाशिक येथील खात्यावर भरण्यात यावी आदिसह विविध मागण्यासाठी बाबासाहेब प्रधान राजेंद्र भिंगारदिवे अशोक राऊत नंदकुमार गायकवाड म्हाळू खोसे रविंद्र मेहेत्रे रमेश लगे दत्तात्रय वक्ते योगेश अमोलीक बाबासाहेब लोंढे सचिन नगरकर सचिन साळूंके अमोल साळवे संकेत मोडके अनिल गाढे किरण खरोटे रविंद्र बागडे अविनाश तेलोरे अविनाश शेलार असिफ ठाकुर शाम भिंगारदीवे सागर भिंगारदीवे उज्वला मिटकर अलका भिंगारदीवे सुशिला खरात सरस्वती बागडे निर्मला तेलोरे सागुणा तांबे कलाबाई शेलार निर्मला भिंगारदीवे निर्मला गाढे आदि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व  श्रमीक संघाचे काँ जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केले होते सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी सुरुडे व इतर कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही  कोरोनामुळे वसुली नाही तसेच फेर आकारणी करावयाची आहे त्यामुळे फेर आकारणी नंतर पगार वाढीबाबत  निर्णय घेण्यात येईल अश्वासन दिले त्यांच्या अश्वासनावर समाधान झाल्यामुळे आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याचे सुरुडे यांनी सांगितले

श्रीरामपूर प्रतिनिधी:-ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन श्रीरामपूर या संस्थेचे संस्थापक कलीम बिनसाद यांच्या अकॅडमीचे पंचवीस विद्यार्थी हे समता इंटरनॅशनल स्कूल उक्कलगाव याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या कराटे या कॉम्पिटिशन मध्ये विजय झाले यांचा सनमान प्रमाणपत्र व गुणगौरव करण्यासाठी श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मा.प्रशांत पाटील साहेब,मा. नगराध्यक्षा अनुराधाताई अदीक, शहर पोलीस स्टेशनचे ए पीआय बोरसे साहेब, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे शेख बरकत अली, पत्रकार प्रदीप आहेर, मा.अल्तमश पटेल,

आदित्य अदीक, तिरंगा न्यूज व इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन च्या विजयी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करून त्यांना प्रशस्तिपत्रक व कलर बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  मा. तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांनी मुलांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करत या क्षेत्रामध्ये मुलांचं करिअर घडतात यापासून शरीर व बुद्धी खूप वाढते यामध्ये कोणी पोलीस मध्ये कोणी तहसीलदार तर कोणी शिक्षक अशा मोठमोठ्या पदावर जाऊ शकतात यामुळे पालकांनी इतक्या लहान वयात मुलांना मार्शल आर्ट या खेळासाठी पाठवून खूप चांगले काम केले आहे आणि कलीम बिनसाद यांनी मुलांना मोबाईल पासून दूर करून या ग्राऊंड वर मार्शल आर्ट या खेळाकडे आकर्षित केले त्याबद्दल कलीम बिनसाद यांचे आपण मनापासून धन्यवाद देतो असे म्हणत त्यांच्या या कामाचे कौतुक केले तसेच यावेळी माननीय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी या लहान मुलांचे फाईट ,योगा हे करत अस्थानी या मुलांना मॅट ची गरज आहे

आणि हे मॅट आपल्या तर्फे देण्याचे कबुल करत त्वरित आपन ऑर्डर करण्यासाठी प्रशिक्षक कलीम बिनसाद यांना सांगितले संस्थेचे कलीम बिनसाद हे खूप मोठे काम करत आहे आणि हे मुलं माझे संरक्षण करतील असे बोलत मुलांना प्रोत्साहन दिले त्याच पद्धतीने ए पीआय बोरसे यांनी मुलांचे मनोबल वाढवत आपण मुला मुलींचा देखील मोठ्या पदावर या ग्राउंड वर खेळणाऱ्या खेळाच्या बेसवर एक चांगले अधिकारी होऊ शकतात एक चांगला अधिकारी होण्यासाठी ग्राऊंड व फिटनेस खूप महत्त्वाचे असते असे ते म्हणाले व सर्वांनी मार्शल आर्ट च्या सर्व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या  यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अजित डोके यांनी केले तर आसलम बिनसाद यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मासीक बैठक नियमानुसार न घेता आगोदरच सत्ताधारी गटाच्या  सह्या ईतिवृत्तावर घेवुन विरोधकांना गैरहजर दाखविण्याचा चुकीचा प्रकार बेलापुर ग्रामपंचायतीत सुरु असुन तो थांबविण्यात यावा अशी मागणी विरोधी सदस्य रविंद्र खटोड यांनी केली आहे.ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिलेल्या निवेदनात माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुर ग्रामपंचायतीत सत्ताधारी मन मानेल तसा कारभार करत असुन विरोधकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने कामकाज करत आहेत अशा प्रकारे चुकीचे होणारे कामकाज थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेलापुर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीचे आज दिनांक ३०मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजन करण्यात आले होते .मासीक बैठकीसाठी रविंद्र खटोड व भरत साळूंके  सह विरोधी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात आले असता  बैठकीची वेळ झालेली असतानाही सत्ताधारी सदस्य हजर नसल्याचे लक्षात येताच खटोड व साळूंके यांनी ईतिवृत्ताची मागणी केली व मासीक बैठकीच्या ईतिवृत्तावर सह्या करण्यासाठी पाहीले असता त्या ईतिवृत्तावर विरोधी सदस्य वगळता सर्वांच्या सह्या असल्याचे लक्षात आहे सदस्य बैठकीला नसतानाही सह्या कशा झाल्या याचे कोडे विरोधकांना उलगडले नाही त्यांनी पत्रकार व इतर कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलविले व सह्या झालेले ईतिवृत्त दाखविले त्या नंतर बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले रविंद्र खटोड भरत साळूंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दुरध्वनी केला त्या नंतर सर्व जण तक्रार करण्यासाठी पंचायत समीतीत गेले तेथे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी दिले तसेच सदर बाब ही अतिशय गंभीर असुन त्या बाबत आपण योग्य ती कारवाई न केल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही खटोड व साळूंके यांनी दिला आहे या बाबत सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की बैठकीचे कामकाज नियमानुसारच झालेले आहे मार्च अखेर असल्यामुळे वसुली व इतर कामकाजामुळे बैठक लवकर आटोपती घ्यावी लागली त्या वेळेपर्यत विरोधक आलेले नव्हते परंतु बैठकीचा कोरम पुर्ण झाल्यामुळे बैठक सुरु करुन आटोपती घेण्यात आली असुन विरोधकांचे कामच आहे आरोप करणे परंतु आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्यामुळे विरोधकांना तक्रारीस वावच नसल्यामुळे हा खोटा उपद्व्याप केला जात असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे .

खंडाळा प्रतिनिधी -शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जवळपास 10-15 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. काल दि. 28 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली. या आगीचा गावातील चार शेतकर्‍यांना फटका बसला.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी अरविंद डेंगळे, अप्पासाहेब म्हसे, एस. शर्मा, परसराम डेंगळे यांच्या उसाला आग लागली. या आगीत शेतकर्‍यांचा 10 ते 15 एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला.या घटनेची माहिती मिळताच गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी

दाखल झाला. मात्र वार्‍यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदत कार्यात अडथळे आले. त्यामुळे आग आणखी वाढत राहिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. यापुर्वी याच महिन्यात येथे आगीची घटना घडली होती. त्यावेळीही सुमारे 10-15 एकर उसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget