Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मतदानाच्या रुपाने अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी लोकसेवा विकास अघाडीच्या सर्वच्या सर्व संचालकांना निवडून दिले व आमच्यावर विश्वास दाखविला त्या विश्वासाला कधीच तडा जावू दिला जाणार नाही असा विश्वास माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बेलापुर येथील आभार सभेत व्यक्त केला . लोकसेवा विकास अघाडीच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पा. नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे सुभाष पटारे जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले द्वारकनाथ बडधे सुवालाल लुक्कड ,रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल पा .नाईक,जालींदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विलास मेहेत्रे,उपसरपंच अभिषेक खंडागळे,दत्ता कु-हे,भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ,शेषराव पवार,प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,सुरेश कु-हे,गावकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे उपस्थित होते .या वेळी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की आसपासच्या तालुक्यातील कारखान्याची काय अवस्था आहे हे सुज्ञ मतदारांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी लोकसेवा मंडळाच्या पुर्ण २१संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले .अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर ऊस असुन आपण आजपर्यंत सभासदाप्रमाणेच त्यांच्याही ऊसाला भाव दिलेला आहे .केंद्र शासनाचे इथेनाँल निर्मितीला प्रोत्साहन असल्यामुळेअशोकच्या इथेनाँल प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा विचार असुन अधुनिक तंत्रज्ञानासह पाच हजार टन क्षमतेचा नविन प्रकल्प उभारण्याचा मानस आहे .तसेच विजनिर्मितीतही वाढ करण्याचे नियोजन आहे कारखाना प्रदुषणमूक्त करण्याचा आपला मानस आहे बेलापूरच्या जनतेने मला भरभरुन प्रेम दिले आहे त्यामुळे या परिसरात अशोक बंधाऱ्याची मालीका उभारली .भविष्यात आपल्या परिसराचा पाणी प्रश्न जटील होणार आहै त्या करीता कारखान्याच्या माध्यमातून उपाय योजना कराव्या लागतील .असेही ते म्हणाले. यावेळी जालिंदर कु-हे,बाळासाहेब वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कलेश सातभाई, वसंतराव कुताळ,सुधाकर खंडागळे,विश्वनाथ गवते,शिवाजी वाबळे,आण्णा गारडे ,प्रकाश कुऱ्हे ,भरत सोमाणी,शरद देशपांडे ,प्रभाकर कुऱ्हे सुरेश कुऱ्हे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,राजेंद्र सातभाई,वृद्धेश्वर कु-हे,प्रभात कु-हे, सुभाष अमोलीक,शफीक बागवान,मोहसीन सय्यद,प्रसाद कु-हे,वैभव कु-हे,गोरक्षनाथ कु-हे, पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा,जिना शेख,रावसाहेब गाढे,सुरेश केशव कु-हे,राजेंद्र ओहोळ ,राजेंद्र कुताळ, गणेशबंगाळ,दादासाहेब कुताळ,सुधीर कोळसे,सुभाष खंडागळे, हेमंत कोळसे मोहसीन सय्यद,शफीक बागवान, विश्वनाथ गवते बाळकृष्ण खोसे,महेश कुऱ्हे,अजिज शेख जाकीर शेख,गोरख कुताळ, रावसाहेब अमोलिक, प्रभाकर ताके,उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले. सूत्रसंचलन महेश कु-हे  यांनी केले तर अनिल नाईक यांनी आभार मानले.

अहमदनगर प्रतिनिधी-पैशाच्या वादातून मजुराचा खून करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी (ता. नगर) शिवारात अटक केली. बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले आहे.संजय पांडु पवार (वय 40) हे कुटुंबीयासह पिंप्री घुमरी (ता. आष्टी) येथे राहतात. त्यांचे वडील पांडू हे बाभळीची लाकडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे गावातील बबन वारूळे याचे बरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरीवरून वाद झाला होता. त्यावेळेस संजय यांनी बबन वारूळे यांना आतापर्यंत झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करून देईल, असे म्हणून वाद मिटवला होता. परंतु, 21 जानेवारी 2022 रोजी पिंप्री ते घुमरी रस्त्याच्याकडेला सखाराम महादेव साबळे यांच्या घरापाठीमागे पांडू चंदर पवार (वय 60) हे जखमी अवस्थेत पडलेले आहेत, अशी माहिती मिळाली. संजय यांनी खात्री केली असता, पांडू पवार यांचा खून झालेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. आष्टी पोलिसांनी आरोपी बबन हा अहमदनगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबन यास शेंडी शिवारात सापळा लावून पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार संदीप पवार, मनोज गोसावी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरुट, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले.


शिर्डी ( प्रतिनिधी)शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने लाडू प्रसादासाठी हरिद्वार येथील मे.हर्ष फ्रेश डेअरी कडून शुद्ध गाईचे तूप घेतले होते. त्यापैकी 214 क्विंटल शुद्ध गाईचे तूप एक्सपायर झाल्यानंतरही त्याचा ईलिलाव काढून साई संस्थानने  ते विक्री केले. मात्र अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (तीन) अंतर्गत हा गुन्हा ठरतो. त्यामुळे साई संस्थांनच्या एक्सपायर तूप विक्री करणाऱ्या जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात आदेश द्यावेत .अशी  मागणी एका पत्राद्वारे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी यांनी भारताचे‌ पंतप्रधान नरेंद्र मोदी व संबंधित सर्व मंत्री व विभागाकडे केले आहे.या पत्रकात पुढे म्हटले आहे की,‌शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात लाडू प्रसाद बनविण्यासाठी खरेदी करण्यात आलेले 214 क्विंटल गाईचे शुद्ध  तूप एक्सपायर झालेले असताना साईबाबा संस्थान ने इ लिलाव काढून ते विक्री करण्यात आले व यासंदर्भात साईसंस्थांनवर आरोप झाल्यानंतर अखाद्य म्हणून साई संस्थानने हे एक्सपायर तुप विक्री केल्याचे नंतर

जाहीर केले. मात्र  माहिती अधिकारात   अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाकडून या संदर्भात माहिती मागितली असता त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे एक्सपायर झालेले अन्न हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3) अंतर्गत विक्री केल्यास गुन्हा ठरतो .असे असताना साई संस्थांनने हे एक्सपायर तुप  इ लिलावाद्वारे विक्री कसे केले? असे एक्सपायर तूप विक्री  केल्यामुळे साई संस्थांनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एक प्रकारे हा गुन्हाच केला आहे. त्यामुळे साई संस्थानच्या जबाबदार असणाऱ्या या एक्सपायर‌ तुप विक्रीप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधितांवर अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 27 (3)अंतर्गत  गुन्हा दाखल व्हावा. व त्यासाठी आपण या प्रकरणी विशेष लक्ष घालून संबंधित खात्याला तसे आदेश द्यावेत.अशी मागणी या पत्राद्वारे जितेश लोकचंदानी यांनी केली आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्त्या सुल्तानाबानो शाह यांची समाजवादी पार्टीच्या श्रीरामपुर शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली,त्यांची सामाजिक कार्याच्याप्रती असलेली आवड तथा विविध सामाजातील उपेक्षित घटकांसाठी असलेली तळमळ पाहता समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,श्रीरामपुर तालुकाध्यक्ष आसिफ तांबोळी, शहराध्यक्ष अय्यूब पठाण यांनी सुल्तानाबानो शाह यांच्यावर समाजवादी पार्टीच्या श्रीरामपूर महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले,यामुळे त्यांच्या कार्याना अधिक गती प्राप्त होऊन उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक बळ प्राप्त झाले आहे . समाजवादी पार्टी हा  राजकिय पक्ष आपल्या भारत देशात मोठे योगदान देणारा पक्ष असुन या पक्षाची महाराष्ट्र राज्याची धुरा प्रदेशाध्यक्ष माननिय आमदार आबु असिम आझमी संभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर समाजवादी पार्टीची मोठी पक्षबांधणी सध्या सुरु आहे, तमाम बहुजन तथा वंचीत सामाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पक्षातर्फे कसोसीचे प्रयत्न केले जात आहे. शाह यांच्या निवडीबद्दल फातेमा शाह,हाजरा शाह,शाहीन पठाण,सईदा शेख,सोफिया शेख, इकरा पठाण,इमरान शेख, कलीम वेल्डर, अल्तमश शेख, अनवर तांबोळी, गुड्डू जमादार, समीउल्लाह शेख,आरिफ शाह, अज्जु शेख,सलीम शेख, अली पठाण,आदींनी त्यांच्या भावी उज्वल कारकिर्द आणि बाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


श्रीरामपूर प्रतिनिधी- आज दि.  23/01/2022 रोजी Dysp  संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड  व  श्रीरामपुर शहरातील सूतगिरणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.1) रणजीत लक्ष्मण गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.2) सुधीर काशिनाथ गायकवाड 

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1000/- रू  किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र. 3)  मिनाबाई श्याम पवार

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

2000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

 एकूण 1,34,000/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका  व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव  व श्रीरामपूर शहर परिसरातील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा.  स्वाती भोर,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dysp संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ  आदींनी केली.


अहमदनगर प्रतिनिधी -अहमदनगर  जिल्ह्यात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.  राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी  राहुरी 711/21 IPC 395, 397,341,506 आर्म ॲक्ट  4/25 प्रमाणे नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते .तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन अहमदनगर पोलिसांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dy.s.p. संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. आज रोजी Dy.s.p  संदीप मिटके यांनी खालील आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.1) सागर भांड (टोळी प्रमुख) 2) निलेश संजय शिंदे(टोळी सदस्य) 3)  गणेश रोहिदास माळी  (टोळी सदस्य) 4) रमेश संजय शिंदे (टोळी सदस्य) या गुन्ह्यातील आरोपींनी राहुरी येथील दुय्यम कारागृह चे गज कापून पलायन केल्यामुळे PI इंगळे सह अन्य सहा पोलीस निलंबित करण्यात आलेले आहेत. पोलिस त्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

सरकारी पक्षातर्फे   ॲड.  दिवाने व Dy.s.p  संदीप मिटके यांनी जोरदार युक्तिवाद  केला मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून  आरोपीस आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपीच्या बाजूने ॲड. बाफना  व ॲड. सरिता साबळे यांनी काम पाहिले.


अहमदनगर जिल्हा श्रीरामपुर, निमगाव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री.नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने "राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्यसन मुक्तीवर जनजागृतीपर वक्तृत्व स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ तसेच विशेष घटक युवक प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमांतर्गत  रक्तदान शिबिराचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील न्यू मिलन मंगल कार्यालय याठिकाणी सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते,तसेच यानिमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान करत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले,यामध्ये श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले बैतूश्शिफा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर सलीम सिकंदर शेख  यांना,त्यांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय समाजरत्न "  पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याचबरोबर विविध क्षेत्रात अनेक समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही यावेळी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यामध्ये श्रीरामपूर येथील अलमिजान उर्दू शाळेच्या उपमुख्याध्यापक इक्बाल इस्माईल काकर (सर) यांनाही समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले, शब्दगंध प्रकाशन संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मिराबक्षभाई बागबान (सर) आणि त्यांच्या कन्यारत्न सौ.आरिफाबानो बागवान यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.सदरील कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकेत भुमिका बजावलेले अभिनेते अशिष सातपुते यांनी उत्कृष्ट विनोदी अदाकारी सादर करत तथा विविध प्रसिद्ध मराठी,हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलावंतांचे हुबेहूब आवाज काढत मिमिक्रीद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले,यावेळी शब्दगंध महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा तथा बेलापूर येथील प्राचार्या सौ. गुंफाताई कोकाटे,खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथील  प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे (सर) ,लायन्स मिगटाऊन अहमदनगर अध्यक्षा सौ.संपुर्णा सावंत, उद्योजक अजय लामखडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.माधवराव लामखडे, तसेच प्रसिद्ध मराठी कवी आनंदा साळवे, निमगांव वाघाचे सरपंच, उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे आणि सौ. डोंगरे, यासोबतच स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक,परीसरातील तथा जिल्हाभरातील कवी, लेखक, समाजसेवक आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करत सामाजिक अंतर,मास्क आणि सॅनिटायझरचे वापर करत मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला.स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख, अॅड. मोहसिन शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.

 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget