अहमदनगर जिल्हा श्रीरामपुर, निमगाव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री.नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने "राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्यसन मुक्तीवर जनजागृतीपर वक्तृत्व स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ तसेच विशेष घटक युवक प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील न्यू मिलन मंगल कार्यालय याठिकाणी सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते,तसेच यानिमित्ताने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सन्मान करत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले,यामध्ये श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले बैतूश्शिफा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर सलीम सिकंदर शेख यांना,त्यांनी केलेल्या विविध समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय समाजरत्न " पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याचबरोबर विविध क्षेत्रात अनेक समाजोपयोगी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही यावेळी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यामध्ये श्रीरामपूर येथील अलमिजान उर्दू शाळेच्या उपमुख्याध्यापक इक्बाल इस्माईल काकर (सर) यांनाही समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले, शब्दगंध प्रकाशन संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मिराबक्षभाई बागबान (सर) आणि त्यांच्या कन्यारत्न सौ.आरिफाबानो बागवान यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.सदरील कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकेत भुमिका बजावलेले अभिनेते अशिष सातपुते यांनी उत्कृष्ट विनोदी अदाकारी सादर करत तथा विविध प्रसिद्ध मराठी,हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलावंतांचे हुबेहूब आवाज काढत मिमिक्रीद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले,यावेळी शब्दगंध महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा तथा बेलापूर येथील प्राचार्या सौ. गुंफाताई कोकाटे,खुलताबाद (जि. औरंगाबाद) येथील प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे (सर) ,लायन्स मिगटाऊन अहमदनगर अध्यक्षा सौ.संपुर्णा सावंत, उद्योजक अजय लामखडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.माधवराव लामखडे, तसेच प्रसिद्ध मराठी कवी आनंदा साळवे, निमगांव वाघाचे सरपंच, उपसरपंच, संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे आणि सौ. डोंगरे, यासोबतच स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक,परीसरातील तथा जिल्हाभरातील कवी, लेखक, समाजसेवक आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करत सामाजिक अंतर,मास्क आणि सॅनिटायझरचे वापर करत मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला.स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख, अॅड. मोहसिन शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment