Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी )-दरवर्षीप्रमाणे नाताळ व नवीन वर्षानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भव्य सायकल व रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात असल्याची माहीती समता स्पोर्ट क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.समता स्पोर्ट क्लबच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेआहे शनिवार, दि. २५/१२/२०२१ रोजी सकाळी ९.००  वाजता सायकल स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम बक्षिस: सायकल, निर्मला जोगदंड यांचे तर्फे ( स्व. अजीत शेलार यांचे स्मरणार्थ), द्वितीय बक्षिस: २२२२, प्रा. बाबासाहेब शेलार यांचे तर्फे (अध्यक्ष, जागृती प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय, बेलापूर), तृतीय बक्षिस : ११११, शाहनवाज सय्यद, सहारा ग्रुप यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ७७७ (स्व. छबुबाई पावलस शेलार यांचे स्मरणार्थ) सुयश शेलार व अतिश शेलार यांचे तर्फे तर, उत्तेजनार्थ : ५५५, मनोज खर्डे व कैलास गांगुर्डे यांचे तर्फे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रविवार, दि. २६/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता खुल्या रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस: ३३३३ विशेष राहुल शेलार व जोएल राजेंद्र शेलार यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: २२२२ राजमहंमद शेख यांचे तर्फे, तृतीय बक्षिस: ११११ इब्राहिम शेख यांचे तर्फे (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर) चौथे बक्षिस: ७७७ मा. भाऊसाहेब तेलोरे यांचे तर्फे तर उत्तेजनार्थ : ५५५ गोरख फुलमाळी यांचे तर्फे देण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. प्रवेश फी नाममात्र १०रु. आहे. स्पर्धेचे ठिकाण झेंडा चौक, बेलापूर बु.II असून इच्छूकांनी 9370207224, 9503902858, 9370207224 या मोबाईल नंबरशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समता स्पोर्ट्स क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निष्कांत शेलार, रामा उमाप आदिंनी केले आहे.



श्रीरामपूर - येथील गोंधवणी भागातील नवीन पिण्याच्या पाण्याच्या तलावांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार असून हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येत असल्याने पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन साठवण तलाव  निर्माण केलेला आहे.मात्र या तलावाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही येथे वाजपेय असणे गरजेचे असताना तिथे वाचमेन वगैरे नाही त्यामुळे सर्व प्रकारची जनावरे त्या पाण्यामध्ये मुक्त संचार करतात तलावाच्या मागच्या बाजूने मिल्लत नगर कडील भागातून भिंत उंच नसल्याने वेगवेगळ्या प्रकारची जनावरे तलावात उतरतात यामध्ये डुकरांचा देखील समावेश आहे पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत असल्याने पाणी दूषित होत आहे आणि हेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी

सोडले जात आहे हे विशेष याबाबत काही जागरूक नागरिकांनी या डुकरांच्या तलावाच्या पाण्यात संचार करणारे फोटोसोशल मीडियावर पाठवून नगरपालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे मात्र पालिकेचा आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी या बाबीकडे सपशेल कानाडोळा केल्याने डुकरांच्या या तलावातील संचारा बद्दल प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना होऊ शकलेली नाही .नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी जरगावातील पाणी आपल्या घरात पीत असतील तर किमान त्याचे भान ठेवून तरी अशा जनावरांपासून या तलावाच्या संरक्षण व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशा प्रकारची जनावरे तलावाच्या पाण्यात उतरणार नाही यासाठी वाचमेन किंवा इतर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बेलापूर खूर्द मळहद शिवारात जुगार अड्ड्यावर  छापा टाकुन पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दहा जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे                                              या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की बेलापुर खूर्द शिवारातील मळहद सातभाई वस्ती शिवारात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु आहे लगेच कारवाई केली तर सर्व जुगारी पकडले जातील अशी खबर मिळाल्यावरुन उपविभागीय  पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी राजेंद्र आरोळे यांना संबधीत ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या आदेशानुसार राजेंद्र आरोळे विलास उकीर्डे रविंद्र माळी रविंद्र बोडखे नितीन शिरसाठ या पथकाने दोन पंचाना सोबत घेवुन सातभाई वस्ती मळहद शिवारात छापा टाकला असता चिंचेच्या झाडाखाली आडोशाला काही ईसम तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आले पोलीसांनी जुगाराचे साहीत्य मोबाईल मोटार सायकली सह सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे वीस रूपयांचा मुद्देमाल मिळून आला या वेळी चंद्रकांत राजाराम खरोटे प्रविण कचरु मांजरे दिपक विनायक गायकवाड संजय दिनकर जगताप सुनिल दिगंबर शिदे रज्जाक सरदार शेख गौरव आण्णासाहेब घुले संजय कचरु राऊत लक्ष्मण मोरे ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले असुन त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध धंद्याबाबत श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यामुळे काही काळ अवैध धंदे बंद होते परंतु आता पुन्हा नव्या जोमाने गुटखा मटका जुगार बिंगो लाँटरी हे अवैध सुरु झाले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी या अवैध धंद्यांना आवर घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.




पाथर्डी (प्रतिनिधी)-तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात उसाच्या शेतामधे बनावट दारूची निर्मिती केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर पथकासह पाथर्डी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बनावट तयार केलेली दारू व दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा पाच लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट दारू तयार करणारा विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अनिल बडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी आव्हाडला अटक केली आहे. बनावट दारू निर्मितीप्रकरणी यापूर्वीही आव्हाड याला दोन वेळा अटक केली आहे. तरीही त्याने हा उद्योग सुरूच ठेवला होता. त्याने घराशेजारीच उसाच्या शेतामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. याची खबर पोलिसांना लागली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांनी आव्हाड याच्या बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारला. तेथे 600 लीटर स्पिरीट, दोन पाण्याच्या टाक्या, लेबल, स्क्रिनपेंटींगचे मशीन, बुच लावण्याचे मशीन, विविध कंपनी लेबरच्या दारू बाटल्या असा मोठा ऐवज पोलिसांना सापडला. पोलीस आले त्यावेळी आव्हाड बनावट दारूची निर्मिती करत होता. आव्हाड याच्या विरूद्ध यापुर्वीही बनावट दारू प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. त्याने पुन्हा तोच उद्योग सुरू केल्याची माहीती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यराम वाघ, पोलीस अंमलदार अनिल बडे, भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे, सागर मोहिते, भारत अंगरखे, राजेंद्र सुद्रिक, प्रतिभा नागरे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी. टी. घोरताळे, ए. बी. बनकर, एस. बी. विधाटे, एन. एस. उके, यु. जी. काळे, एस. व्ही. बिटके, एस. आर. आठरे, महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास फाजगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. 



बेलापुर (प्रतिनिधी  )-राहुरी कारागृहाचे गज कापुन फरार झालेला आरोपी नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपीं नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलीसांना  लागला परंतु पोलीस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला.राहुरी कारागृहाचे गज कापुन पाच आरोपी फरार झाले होते पैकी तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले मात्र दोघे आरोपी अजुनही पसारच आहेत पोलीस त्यांचा कसुन शोध घेत आहे यातील एक आरोपी नितीन उर्फ सोन्या माळी हा त्याच्या उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे असल्याची खबर पोलीसांना  गुप्त बातमीदाराने दिली होती आरोपी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता त्याला काहींनी पाहीले व पोलीसांना कळवीले राहुरीच्या कारागृहातून गज तोडून पळालेला आरोपी उक्कलगाव शिवारात नातेवाईकाकडे आलेला आहे ही बातमी समजताच पोलीस तातडीने मोटारसायकलवर मिळालेल्या ठिकाणी पोहोचले मोटारसायकलचा आवाज येताच आरोपी पोलीसांच्या समोरच जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात घुसला ऊसाच्या शेतात शोध घेतला असता दुसऱ्यांदा तो पोलीसासमोरुन पळाला  मग जादा पोलीस कुमक मागवीण्यात आली  ऊसाच्या शेतात शोध घेतला परंतु  आरोपी फरार होण्यात सफल झाला अनेक पोलीसांच्या गाड्या उक्कलगावाच्या दिशेने धावु लागल्यामुळे गावकऱ्यांनाही नेमके काय झाले हे समजण्यास बराच उशिर झाला हा आरोपी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस होता तसेच वेळ रात्रीची असल्यामुळे शोध कार्यात अडचणी आल्या त्यातच त्या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलीसांना ऊसात आरोपीचा शोध घेणे अवघड झाले तरीही पोलीसांनी जिव धोक्यात घालुन ऊसात आरोपीचा शोध घेण्याचा रात्री बराच वेळ पर्यत शोध घेतला परतु मोठ्या प्रमाणात फौज फाटा असतानाही तो आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला अन पोलीसांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.



बेलापूरः (प्रतिनिधी  )-बेकायदेशीर  उपोषण करुन बेलापुर ग्रामपंचायत प्रशासन व संपुर्ण गावाला वेठीस धरल्या प्रकरणी शोभा फुलारे व किशोर फुलारे यांचेवर कायदेशीर बाबीनुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तसेच गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी लेखी  दिल्यामुळे बेलापुरचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी  सुरु केलेले उपोषण मागे घेतले.                     किशोर फुलारे यांनी अतिक्रमण करुन बेकायदेशीर टाकलेली टपरी ग्रामपंचायतीने उचलून नेली त्यामुळे त्यांच्या पत्नी शोभा फुलारे या पंचायत समीती कार्यालयासमोर सर्व अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकरीता उपोषणास बसलेल्या आहेत. याबाबत संबधीतास काही झाले तर ती जबाबदारी आपली राहील असे पत्र बेलापुर ग्रामपंचायतीस पाठविण्यात आले. तसेच  सदर उपोषण बेकायदेशीर असल्याचे गट विकास अधिकारी यांनी पोलिस प्रशासनास लेखी कळविले होते.तरी देखील सदर उपोषणकर्त्या महिलेने उपोषण सुरुच ठेवले.तसेच काही भलेबुरे झाल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहिल असे धमकविण्याचा प्रकार केला.अखेरीस सदर प्रकरणी उपोषण बेकायदेशीर असल्याने पंचायत समिती व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करावी यासाठी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण  केले.    दरम्यान जि.प.सदस्य शरद नवले,ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,देविदास देसाई,दिलीप दायमा आदिंनी गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली.ग्रामपंचायतीने सदरचे उपोषण बेकायदेशीर  आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये नविन पदाधिकारी यांनी कारभार स्विकारलेनंतर पक्षपात न अतिक्रमणे हटविली   आहेत.त्यात उपोषणकर्त्याचीही अतिक्रमीत टपरी हटविली आहे.त्यामुळे सदर प्रकरणी हस्तक्षेप करुन बेकायदेशीर उपोषणाबाबत योग्य निर्णय घ्यावा असे पञ ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी यांना दिले.गट विकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्या महिलेस दोन तीन वेळा चर्चेसाठी बोलाविले माञ त्यांनी चर्चेस नकार दिला.             त्यानंतर सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पुन्हा उपोषणस्थळी  आले.त्यानंतर पोलिस उपआधिक्षक संदीप मिटके,पोलिस निरीक्षक संजय सानप,गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस आदि उपोषणस्थळी आले.अखेरीस गटविकास अधिकारी यांनी बेकायदेशीर  उपोषण करणेबाबत काययदेशीर बाबीनुसार कार्यवाही करुन उपोषणापासून परावृत्त केले जाईल असे लेखी पञ दिले.सदरचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने व पोलिस प्रशासनानेही दखल घेतल्याने ग्रामस्थांचे उपोषण स्थगित  करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,भारती लांबोळे,शशिकला म्हस्के,निकिता झिने,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,पुरुषोत्तम भराटे,अरविंद साळवी,प्रभात कु-हे,मोहसिन सय्यद,जाकिर हसन शेख,किरण साळवी,मारुती गायकवाड,पप्पू मांजरे,शफीक बागवान,विशाल आंबेकर,महेश कु-हे,जिना शेख,नितीन नवले,सुभाष लांबोळे,सचिन अमोलिक,जब्बार आतार,राज गुडे,गोपी दाणी,कैलास त्रिभुवन, संजय पाडळे, शफीक आतार,विनायक जगताप,सुभाष शेलार,शशिकांत तेलोरे,नवाब सय्यद,बाबूराव पवार बाळासाहेब शेलार आदींसह महिला,बेलापूर-ऐनतपूर येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.



अहमदनगर पोलिस दलातील भिंगार येथील रहिवाशी व सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे अहमदनगर आस्थापनेवर  नेमणुकीस असलेले पोलिस उपनिरीक्षक तथा गुप्तवार्ता अधिकारी श्री.कृष्णा बबनराव विधाते यांचा त्यांचे पोलिस दलातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल गौरव करून दि. १७.१२.२०२१ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे "पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२१" या पदकाने सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तथा  अति.पोलिस महासंचालक श्री. आशुतोष डुंबरे, भा.पो.से. श्री राजेश प्रधान (भा.पो.से.) ( विशेष पोलीस महानरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य)  श्री. सुनील कोल्हे (भा.पो.से.) (सह. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ),  तसेच राजेंद्र मगर, (सहायक आयुक्त), अहमदनगर, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी श्री. प्रवीण देवकर, अहमदनगर व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. श्री. कृष्णा विधाते हे मूळ अहमदनगर पोलीस दलातील होतकरू अधिकारी असून त्यांचे उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व इतर महत्वाच्या घटनांबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत केले असून सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांना मिळालेल्या पोलिस सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget