श्रीरामपूर - येथील गोंधवणी भागातील नवीन पिण्याच्या पाण्याच्या तलावांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार असून हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येत असल्याने पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने नवीन साठवण तलाव निर्माण केलेला आहे.मात्र या तलावाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही येथे वाजपेय असणे गरजेचे असताना तिथे वाचमेन वगैरे नाही त्यामुळे सर्व प्रकारची जनावरे त्या पाण्यामध्ये मुक्त संचार करतात तलावाच्या मागच्या बाजूने मिल्लत नगर कडील भागातून भिंत उंच नसल्याने वेगवेगळ्या प्रकारची जनावरे तलावात उतरतात यामध्ये डुकरांचा देखील समावेश आहे पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत असल्याने पाणी दूषित होत आहे आणि हेच दूषित पाणी नागरिकांना पिण्यासाठी
सोडले जात आहे हे विशेष याबाबत काही जागरूक नागरिकांनी या डुकरांच्या तलावाच्या पाण्यात संचार करणारे फोटोसोशल मीडियावर पाठवून नगरपालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे मात्र पालिकेचा आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभाग यांनी या बाबीकडे सपशेल कानाडोळा केल्याने डुकरांच्या या तलावातील संचारा बद्दल प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना होऊ शकलेली नाही .नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी जरगावातील पाणी आपल्या घरात पीत असतील तर किमान त्याचे भान ठेवून तरी अशा जनावरांपासून या तलावाच्या संरक्षण व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशा प्रकारची जनावरे तलावाच्या पाण्यात उतरणार नाही यासाठी वाचमेन किंवा इतर बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे केली आहे.
Post a Comment