बेलापूर (प्रतिनिधी )-दरवर्षीप्रमाणे नाताळ व नवीन वर्षानिमित्त समता स्पोर्ट क्लबच्या वतीने भव्य सायकल व रनिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात असल्याची माहीती समता स्पोर्ट क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.समता स्पोर्ट क्लबच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नाताळ व नव वर्षाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेआहे शनिवार, दि. २५/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता सायकल स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम बक्षिस: सायकल, निर्मला जोगदंड यांचे तर्फे ( स्व. अजीत शेलार यांचे स्मरणार्थ), द्वितीय बक्षिस: २२२२, प्रा. बाबासाहेब शेलार यांचे तर्फे (अध्यक्ष, जागृती प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय, बेलापूर), तृतीय बक्षिस : ११११, शाहनवाज सय्यद, सहारा ग्रुप यांचे तर्फे, चौथे बक्षिस: ७७७ (स्व. छबुबाई पावलस शेलार यांचे स्मरणार्थ) सुयश शेलार व अतिश शेलार यांचे तर्फे तर, उत्तेजनार्थ : ५५५, मनोज खर्डे व कैलास गांगुर्डे यांचे तर्फे देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रविवार, दि. २६/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता खुल्या रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम बक्षिस: ३३३३ विशेष राहुल शेलार व जोएल राजेंद्र शेलार यांचे तर्फे, द्वितीय बक्षिस: २२२२ राजमहंमद शेख यांचे तर्फे, तृतीय बक्षिस: ११११ इब्राहिम शेख यांचे तर्फे (सिव्हील कॉन्ट्रॅक्टर) चौथे बक्षिस: ७७७ मा. भाऊसाहेब तेलोरे यांचे तर्फे तर उत्तेजनार्थ : ५५५ गोरख फुलमाळी यांचे तर्फे देण्यात आले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत. प्रवेश फी नाममात्र १०रु. आहे. स्पर्धेचे ठिकाण झेंडा चौक, बेलापूर बु.II असून इच्छूकांनी 9370207224, 9503902858, 9370207224 या मोबाईल नंबरशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन समता स्पोर्ट्स क्लबचे विजय शेलार, संजय शेलार, सुहास शेलार, बंन्टी शेलार, संतोष शेलार, अक्षय शेलार, संकेत शेलार, सुयश शेलार, निनाद शेलार, ललित शेलार, निष्कांत शेलार, रामा उमाप आदिंनी केले आहे.
Post a Comment