बेलापुर (देविदास देसाई )-श्रीरामपुरात पहीला ओमीक्राँनचा रुग्ण आढळला असुन ज्यांनी अजुनही कोविड लसीचा पहीला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी ताबडतोब लस घ्यावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.नायजेरीयाहुन दोन नागरीकांचे श्रीरामपुर तालुक्यात आगमन झाले होते त्याच्या आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्या पाँझीटीव्ह आल्या त्यामुळे दोघाच्याही ओमीक्राँन टेस्ट करण्यात आल्या असुन त्यात एकाचा अहवाल पाँझीटीव्ह आल्यामुळे श्रीरामपुराकरांचा जिव टांगणीला लागलेला आहे कोविड लसीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून लसीकरण करुन घेण्यास नागरीकांचा उत्साह कमी आहे लस सर्वत्र उपलब्ध आहे तरी देखील काही नागरीक लस घेत नाही त्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील जनतेला अवाहन केले आहे की कोविड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन नागरीकांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे घरी गेल्यावर हात स्वच्छ धुवा आपली काळजी आपणच घ्या आपण सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा असे अवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले आहे
Post a Comment