उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाकडून बेलापूरात जुगार अड्ड्यावर छापा पावणे तीन लाखाचा ऐवज जप्त.
बेलापुर (प्रतिनिधी )-उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बेलापूर खूर्द मळहद शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकुन पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन दहा जणाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे या बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहीती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की बेलापुर खूर्द शिवारातील मळहद सातभाई वस्ती शिवारात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु आहे लगेच कारवाई केली तर सर्व जुगारी पकडले जातील अशी खबर मिळाल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी राजेंद्र आरोळे यांना संबधीत ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या आदेशानुसार राजेंद्र आरोळे विलास उकीर्डे रविंद्र माळी रविंद्र बोडखे नितीन शिरसाठ या पथकाने दोन पंचाना सोबत घेवुन सातभाई वस्ती मळहद शिवारात छापा टाकला असता चिंचेच्या झाडाखाली आडोशाला काही ईसम तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आले पोलीसांनी जुगाराचे साहीत्य मोबाईल मोटार सायकली सह सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे दोन लाख एकाहत्तर हजार नऊशे वीस रूपयांचा मुद्देमाल मिळून आला या वेळी चंद्रकांत राजाराम खरोटे प्रविण कचरु मांजरे दिपक विनायक गायकवाड संजय दिनकर जगताप सुनिल दिगंबर शिदे रज्जाक सरदार शेख गौरव आण्णासाहेब घुले संजय कचरु राऊत लक्ष्मण मोरे ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे हे तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले असुन त्यांचेवर मुंबई जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध धंद्याबाबत श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यामुळे काही काळ अवैध धंदे बंद होते परंतु आता पुन्हा नव्या जोमाने गुटखा मटका जुगार बिंगो लाँटरी हे अवैध सुरु झाले असुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी या अवैध धंद्यांना आवर घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.
Post a Comment