Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सामाजीक , शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जाणकारांनी एकत्र  येवुन व्यापारी ,कष्टकरी ,सर्वसामान्य नागरीकासाठी सुरु केलेल्या गांवकरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल असा विश्वास महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यानी व्यक्त केला. जि .प .सदस्य शरद नवले व साहेबराव वाबळे यांच्या नेतृत्वाखाली गांवकरी ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे उद्धाटन सद्गुरु नारायणगीरीजी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाण नेवासा येथील मठाधिपती महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यांच्या हस्ते संपन्न झाले  त्या वेळी बोलताना महंत उध्दव महाराज मंडलीक म्हणाले की आपला जिल्हा हा सहकार चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गांवकरी पतंसंस्थेमुळे बेलापुरच्या वैभवात आणखी भर पडली आहे मोठ्या बँंकाकडे कर्ज मागणी करताना अनेक कागदपत्रांची तरतुद करावी लागते त्यामुळे व्यापारी ,कष्टकरी लोकांचा कल पतसंस्थेकडे वाढत आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची उत्तम सेवा घडो असेही मंडलीक महाराज म्हणाले या वेळी संस्थेचे सभासद १३०० असुन उद्धाटनापूर्वीच संस्थेकडे ५० लाख रुपयांच्यापुढे ठेवी गोळा जमा झाल्या असल्याची माहीती पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे व व्हा चेअरमन रामेश्वर सोमाणी यांनी दिली या वेळी माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात जि प सदस्य शरद  नवले पंडीत महेशजी व्यास रणजीत श्रीगोड भास्कर खंडागळे गिरीधर पा आसने नितीन भागडे युवराज भोसले सुनिल साठे हरिष थोरात किशोर कलांगडे अमोल शेटे विलास शेटे प. स. सदस्य अरुण पा. नाईक युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे सरपंच महेंद्र साळवी सुभाष अमोलीक रावसाहेब अमोलीक प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर संजय गोरे  जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई मारुती राशिनकर ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम अजिज शेख हाजी ईस्माईल शेख प्रकाश पा नाईक मोहसीन सय्यद अनील पवार आदिसह सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी केले तर विशाल आंबेकर यांनी आभार मानले.

 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली                येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले

नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेलापुर  (प्रतिनिधी  )--बेलापूरातून अल्पवयीन मुलगी गेल्या वीस दिवसापासून गायब असून या विषयांमध्ये आरोपी आयुब शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल आहे .या गुन्ह्याच्या तपासामध्ये एल सी बी ला सामील करून घेण्यात आलेले आहे. मुलीचा तपास  लवकरात लवकर लावून आरोपीला कडक शासन करू असे अश्वासन श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके साहेब यांनी दिल्यामुळे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले                             सुमारे दीड तास हे रास्ता रोको आंदोलन चालले होते पोलीस अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अश्वासनानंतरच बेलापूर येथे महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला.

गेल्या 20 दिवसा पूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही या घटनेच्या निषेधार्थ  महाराणा सामाजिक प्रतिष्ठान व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बेलापूर  श्रीरामपुर चौकात रास्ता रोको करण्यात आला होता.  उपविभागीय पोलिस अधिकारी  संदीप मिटके  यांनी  रास्ता रोको आंदोलध मागे घेण्याचे आवाहन केले . त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार 'तहसीलदार प्रशांत ,पाटील पोलीस  निरीक्षक संजय सानप  आदींनी निवेदन स्विकारले .

*या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ, भाजपचे नेते प्रकाश चित्ते. शिवप्रतिष्ठानचे प्रवीण , जय श्रीराम मंडळाचे भरत , जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बेलापूर चे उपसरपंच अभिषेक खंडागळे  सुनील मुथ्था भाजपा नेत्या पुष्पाताई हरदास, सौ किरण सोनवणे मार्केट कमिटीचे संचालक सुधीर नवले, महाराणा प्रताप सामाजिक प्रतिष्ठानचे सुहास पवार ,राजेंद्र चव्हाण , संदीप पवार , लक्ष्मण साळुंके , नरहरी पवार ,रामभाऊ पवार ,संतोष चव्हाण , कैलास पवार , नवनाथ पवार,  रवी चव्हाण ,राजु पडवळ ,  विजय पवार , केशव गोविंद ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब हरदास आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

*यावेळी बोलताना विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाठ , म्हणाले की गेल्या वीस दिवसांपासून पोलिस प्रशासनाने अपहरण झालेल्या मुलीच्या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून कुठल्याही स्वरूपात तपास पुढे सरकलेला नाही याचा निषेध करून डॉक्टर शिरसाठ पुढे म्हणाले की मुलीचा तपास लवकर न लागल्यास या आंदोलनाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाईल असा इशारा डॉक्टर शिरसाठ यांनी दिला यावेळी बोलताना भाजपा नेते प्रकाश चित्ते म्हणाले लव जिहाद च्या घटनांचा सर्व हिंदू समाजाच्या कुटुंबांमध्ये प्रचार आणि प्रसार करून सर्व हिंदू समाजाला जागृत केले पाहिजे व आपल्या मुलींना लव्ह जिहाद पासुन वाचविले पाहिजे. यापूर्वी भेर्डापूर येथे असा प्रकार घडला होता त्याही वेळेला पोलिसांच्या विरोधात आंदोलन करावे लागले. आंदोलना शिवाय पळवून नेलेल्या मुलींचा तपासच लागत नाही या घटनेचा मी निषेध करतो अशा पळून नेलेल्या मुलींच्या विषयांमध्ये पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यास श्रीरामपूरातील सामाजिक संतुलन बिघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  यावेळी त्यांनी दिला.

* यावेळी बोलताना सुनील मुथ्था म्हणाले की पोलीस नुसत्या आश्वासनांवर दिवस काढून हिंदू समाजाच्या तोंडाला पाने पुसत आहेत. तपासावर त्यांचे लक्ष केंद्रित नाही पोलिसांनी मुलीचा तपास लवकर न लावल्यास आम्ही सर्व प्रथम बेलापूर बंद करू असा इशारा मुथा यांनी दिला 

*या  वेळी सचिन दोडकर ,सौ पुष्पाताई हरदास , शुभम हरदास ,आदींची भाषणे झाली .याप्रसंगी घिसाडी समाज बांधव व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .


बेलापूर-(प्रतिनिधी  )-सुजाण व समृध्द पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय गरजेचे असुन खरे ज्ञान हे ग्रंथालयातूनच मिळते असे उदगार  बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा ,सतिश पावसे यांनी काढले ग्रंथालय दिनानिमित्त बोलतना.ते पुढे म्हणाले की, आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ रंगनाथन यांचे अनन्य साधारण योगदान आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुले करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांनीच रुजवला .नंतर तो जोपासण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.  डॉ.रंगनाथन यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ रंगनाथन यांचा वाढदिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून आपण साजरा करतो. यानिमित्ताने वाचन संस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वाढावी यासाठी ग्रंथालयांचे महत्त्व आहे .प्रा. पावसे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील अतिशय महत्वाचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाचे स्थापना केली . ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .पुढे ते असेही म्हणाले की,  वाचनालयांचा ग्रामीण भागात महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालय वाचकाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ग्रंथामुळे स्वतःची माहिती व ज्ञान यात भर पडते . माणूस समृद्ध होतो. त्याचे विचार समृद्ध होतात.वाचनाने माणूस विवेकी बनतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्व वाढत आहे. त्यादृष्टीने ही नव ग्रंथ पालांना ई-लायब्ररीची देखील संधी उपलब्ध झाली आहे .सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे . त्याचा उपयोग करून बुद्धीची मशागत करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय समितीचे प्रा.अशोक थोरात व प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी केले. डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते झाले.प्रा.सुनिल विधाटे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-मुलीचे बी एच एम एस पदवी प्रमाणपत्र देण्याकरीता एक  लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा येथील प्रभारी प्राचार्य व लिपीका विरुध्द लाचलुचपत विभागाने कारवाई केली असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहै.  या बाबत मिळालेली माहीती आशी की तक्रारदार यांच्या मुलीने बी एच एम एस पदवीचे पासींग प्रमाणपत्र तसेच इंटरशिप पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्याकरीता मागणी केली त्या वेळी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे वय ५२धंदा नोकरी प्रभारी प्राचार्य होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा महादेव तालुका श्रीरामपुर राहणार मानुर तालुका राहुरी यांनी हजेरीची अँडजस्टमेंट करुन प्रमाणपत्र  देण्यासाठी पंचासमक्ष एक लाख ४५ हजार ५०० रुपयाची मागणी केली आरोपी क्रमांक दोनभारती बापुसाहेब इथापे लिपीक होमीओपँथीक मेडीकल काँलेज वडाळा महादेव यांनी ती रक्कम पंचासमक्ष  स्विकारली असता दोन्हा आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे पोलीस अधिक्षक सुनील कडासने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर  पोलीस निरीक्षक दिपक करांडे हवालदार संतोष शिंदे रमेश चौधरी रविंद्र निमसे वैभव पांढरे संध्या म्हस्के हारुन शेख राहुल डोळसे यांनी सापळा यशस्वी पार पाडला.



संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या शिर्डी येथील दोन तरूण रचित पाटणी व प्रवीण गोंदकर यांचे दुहेरी हत्याकांड राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजले होते सदरची घटना 15 जून 2013 रोजी  मध्यरात्री घडली होती या घटनेत त्यावेळेचे श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेला बारकाईने तपास यामुळे यातील चींधीचोर पापी पाप्या शेख सह 12 आरोपींना नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याबरोबरच महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक निर्णयात मोक्का न्यायालयाने सदर आरोपींना एक कोटी 38 लाख इतका दंड देखील ठोठावला होता अतिशय कुशलतेने तपास करून यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी केलेला प्रामाणिक तपास पाहता त्या कामाची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून सध्या नाशिक येथे असलेले लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना उत्कृष्ट तपास पदक देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे

    देशातील एकूण 152 जणांना उत्कृष्ट तपास पदक सन्मानपत्र व मान चिन्ह जाहीर झालेले आहे त्यात महाराष्ट्रातील 11 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यातील  नगर जिल्ह्यातील एकमेव अधिकारी (तत्कालीन श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक) सुनील कडासने यांचा  समावेश आहे यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अति दुर्मिळातील दुर्मिळ खून प्रकरणात मुख्य चिंधीचोर पापी पाप्या शेख सह 12 आरोपींना त्यांनी केलेल्या तपासा मुळे नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या खून प्रकरणानंतर नगर जिल्ह्यात मोठी घबराट पसरली होती  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता मात्र अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना अत्यंत बारकाईने तपास करून यातील सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केलेला होता. 


सदर केस ही नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायालयाने यातील मुख्य आरोपी चींधिचोर पापी पाप्या शेख सह बारा आरोपींना जन्मठेप व तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचा दंड सुनावला होता या तपासात उत्कृष्ट काम केले म्हणून सुनील कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून उत्कृष्ट तपास पदक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनील कडासने यांनी दै. साईदर्शन शी बोलतांना सांगितले की  आपण केलेल्या प्रामाणिक कामाचे अश्या सन्मानामुळे मोठे समाधान वाटते तसेच अश्या सन्मानमुळे पोलिस दलात काम करण्यास अजुन जास्त ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 या दुहेरी हत्याकांडात दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी हे सरकार पक्षाच्या वतीने एकमेव साक्षीदार होते या आरोपींना शिक्षा होणेकामी लोकचंदानी यांचीही मोलाची भूमिका होती ...

संपूर्ण अहमदनगर जिल्हा तसेच नासिक जिल्हा पोलिस दलातून दबंग पोलिस अधिकारी सुनील कडासने यांचे अभिनंदन होत आहे तसेच दैनिक साईदर्शन सुद्धा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांचे आभार व्यक्त करत त्यांचे अभिनंदन याप्रसंगी करत आहे.

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-नेवाशातील पोलीसाविषयी व्हायरल झालेल्या क्लिपचे वादळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा नेवासा पोलीस व वाळू तस्कर यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यामुळे कायद्याचे रक्षकच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.मागील पोलीस अधिकाऱ्यांची व्हायरल झालेल्या क्लिपची चौकशी पुर्ण होत नाही तोच नेवाशातील पोलीस अधिकारी व वाळू तस्कर यांच्या संभाषणाची क्लिप सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झालेली आहे काही दिवसापूर्वी स्वादिष्ट बिर्याणीची क्लिप महाराष्ट्रभर गाजली आता नेवासा पोलीस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्यांनेच वाळू तस्करांना मी बाहेर पडत आहे आपली वाहने काढुन घ्या असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला असुन या संभाषणाची क्लिप सर्वत्र सोशल मिडीयावर फिरत आहे या बाबत पत्रकारांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करण्याचे आदेश शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले आहे एकंदरीतच पोलीस व अवैध व्यवसायाचे अर्थपूर्ण संबध आता उघड होत आहे पोलीस अधिकारी स्वतः वाळू तस्करांना वाहने पळविण्याचे या क्लिप मध्ये सांगत आहे त्यावरुन त्यांच्यातील अर्थपूण मैत्रीची कल्पना येते पोलीसा अधिकारीच जर वाळू तस्करी सारख्या अवैध व्यवसाय करणाराला पाठीशी घालत असतील तर सर्व सामांन्याचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे महसुल अधिकारी  आपल्या परीने वाळू तस्करी थांबविण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीसच त्यांना पाठीशी घालतात त्यातलाच हा प्रकार असुन वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे ही क्लिप उघड झाली परअसे अनेक ठिकाणे आहेत की जेथे वाळू तस्करांना खूलेआम पाठीशी घातले जाते काही वाळू तस्कर तर कुणाला किती दिले हे अभिमानाने सांगत असतात या सर्वांचा बदोबस्त होवुन अवैध व्यवसायाला पायबंद केव्हा बसेल असा सवाल नागरीक विचारत आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget