श्रीरामपुर (प्रतिनिधी )-नेवाशातील पोलीसाविषयी व्हायरल झालेल्या क्लिपचे वादळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा नेवासा पोलीस व वाळू तस्कर यांच्यातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यामुळे कायद्याचे रक्षकच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.मागील पोलीस अधिकाऱ्यांची व्हायरल झालेल्या क्लिपची चौकशी पुर्ण होत नाही तोच नेवाशातील पोलीस अधिकारी व वाळू तस्कर यांच्या संभाषणाची क्लिप सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झालेली आहे काही दिवसापूर्वी स्वादिष्ट बिर्याणीची क्लिप महाराष्ट्रभर गाजली आता नेवासा पोलीस स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्यांनेच वाळू तस्करांना मी बाहेर पडत आहे आपली वाहने काढुन घ्या असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला असुन या संभाषणाची क्लिप सर्वत्र सोशल मिडीयावर फिरत आहे या बाबत पत्रकारांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करण्याचे आदेश शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले आहे एकंदरीतच पोलीस व अवैध व्यवसायाचे अर्थपूर्ण संबध आता उघड होत आहे पोलीस अधिकारी स्वतः वाळू तस्करांना वाहने पळविण्याचे या क्लिप मध्ये सांगत आहे त्यावरुन त्यांच्यातील अर्थपूण मैत्रीची कल्पना येते पोलीसा अधिकारीच जर वाळू तस्करी सारख्या अवैध व्यवसाय करणाराला पाठीशी घालत असतील तर सर्व सामांन्याचे काय हा प्रश्न निर्माण होत आहे महसुल अधिकारी आपल्या परीने वाळू तस्करी थांबविण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीसच त्यांना पाठीशी घालतात त्यातलाच हा प्रकार असुन वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे ही क्लिप उघड झाली परअसे अनेक ठिकाणे आहेत की जेथे वाळू तस्करांना खूलेआम पाठीशी घातले जाते काही वाळू तस्कर तर कुणाला किती दिले हे अभिमानाने सांगत असतात या सर्वांचा बदोबस्त होवुन अवैध व्यवसायाला पायबंद केव्हा बसेल असा सवाल नागरीक विचारत आहे.
Post a Comment