बेलापुर (प्रतिनिधी )- येथील मोफत कोविड केअर सेंटरचे कार्य केवळ दाते सामाजिक कार्यकर्ते डाँक्टर पत्रकार पोलीस यांच्या सहकाऱ्यानेच यशस्वीरीत्या पार पडले असल्याचे मत उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले. बेलापुर गावात मोफत कोविड सेंटर सुरु करुन अनेक रुग्णावर योग्य उपचार केल्यामुळे सर्व रुग्ण सुखरुप घरी गेले त्या बद्दल कोविड सेंटरमध्ये विशेष योगदान देणारे पोलीस पाटील अशोक प्रधान रुग्ण कल्याण सामीतीचे विशाल आंबेकर गोपी दाणी बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योध्दा
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख देविदास देसाई ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक शेख उपस्थित होते या वेळी बोलताना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे सस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख म्हणाले की सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देण हे पत्रकार संघाचे व पत्रकारांचे कर्तव्य आहे या पत्रकार संघास २९ वर्षाचा सामाजिक वारसा लाभलेला आहे समाजातील चांगल्या गोषौटीची संघ नेहमीच दखल घेत असतो कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जिवाची काळजी करणारांना संघाच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचेही शेख यांनी सांगितले या वेळी पत्रकार देविदास देसाई अमीर जहागीरदार रियाज पठाण आरोग्यदुत सुभाष गायकवाड पोलीस पाटील अशोक प्रधान आदिंनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मुस्ताक शेख दिलीप दायमा फकीर मोहमंद शेख रियाज पठाण गुलाब वायरमन कासम शेख एजाज सय्यद शफीक शेख मुसा सय्यद अमीर बेग मिर्झा अजिज शेख योगेश नागले उपस्थित होते कार्यक्रमचे सूत्रसंचलन राजमोहंमद शेख यांनी केले तर प्रास्ताविक कासम शेख यांनी केले असलम बिनसाद यांनी आभार मानले.
Post a Comment