श्रीरामपुर (प्रतिनिधी )- दोन हजार रुपयाची लाच घेताना श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे संजय काळे यांना लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात पकडले त्यामुळे पोलीसा वार्तुळात खळबळ उडाली आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपुर शहर पोलीसा स्टेशन येथे दाखल असलेल्या भा द वि कलम ३९२ च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी आलोसे संजय काळे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली होती ही रक्कम श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न ३ चे कार्यालय येथे स्विकारली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन एकनाथ बाविस्कर पळशीकर यांनी हा सापळा यशस्वी पार पाडला असुन या कारवाई मुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Post a Comment