अहमदनगर जिल्ह्याचे श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार हा बहुमान मिळाला त्याबद्दल हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना असलम बिनसाद यांनी आपले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सोबत लोकडाऊन काळात काम करत असतानाचे आपले काही अनुभव याळवेली सांगितले शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जनतेची गऱ्हाणी अडचणी सोडविण्याचे काम प्रशांत पाटील यांनी केले अन त्या कामाची जेव्हा बातमी झाली त्यावेळेस पाटील साहेबांचे माझ्या सोबत फोनवर जे बोलणं झालं ते आयकून मला हे आपल्या शहराचे तहसीलदार असल्याचे अभीमान वाटले प्रशांत पाटील म्हणाले मी कार्यालयात आलेल्या आजीची विचारपुस केली तिची किरकोळ समस्या होती ती सोडविली हे फार काही वेगळे काम केले असे मला वाटत नाही माझ्या परिवाराचे माझ्यावर संस्कारच असे झालेले आहेत की आपल्याकडे कुणीही समस्या घेवुन आला तर त्याचे समाधान करणे हे माझे पहीले कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांच्या
वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांचा सत्कार आम्ही करत आहोत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष असलम बिनसाद,उपाध्यक्ष जावेद इनामदार,जुबेर भाई बिनसाद, ऍडव्हकेट अजित डोके, कलीम बिनसाद, प्रशांत गौड, सुजित कडू, सुरेश वालतुरे, ललिता ताथेंड, सलीम बिनसाद,कृष्णा धुवाविया,बाबा दुशिंग,नूर महंमद पटेल, रुपेश बोराडे, गौरव काळे, अहमदनूर कुरेशी, शकील पठाण,अबूबकर बिनसाद, शोएब पटेल,पत्रकार कासिम शेख, शफिक शेख,एजाज सैय्यद त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी उपिस्थत होते.
Post a Comment