देशातील एकूण 152 जणांना उत्कृष्ट तपास पदक सन्मानपत्र व मान चिन्ह जाहीर झालेले आहे त्यात महाराष्ट्रातील 11 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यातील नगर जिल्ह्यातील एकमेव अधिकारी (तत्कालीन श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक) सुनील कडासने यांचा समावेश आहे यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अति दुर्मिळातील दुर्मिळ खून प्रकरणात मुख्य चिंधीचोर पापी पाप्या शेख सह 12 आरोपींना त्यांनी केलेल्या तपासा मुळे नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या खून प्रकरणानंतर नगर जिल्ह्यात मोठी घबराट पसरली होती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना अत्यंत बारकाईने तपास करून यातील सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केलेला होता.
सदर केस ही नाशिक येथील मोक्का न्यायालयात सुरू होती त्यानंतर न्यायालयाने यातील मुख्य आरोपी चींधिचोर पापी पाप्या शेख सह बारा आरोपींना जन्मठेप व तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचा दंड सुनावला होता या तपासात उत्कृष्ट काम केले म्हणून सुनील कडासने यांना केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून उत्कृष्ट तपास पदक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनील कडासने यांनी दै. साईदर्शन शी बोलतांना सांगितले की आपण केलेल्या प्रामाणिक कामाचे अश्या सन्मानामुळे मोठे समाधान वाटते तसेच अश्या सन्मानमुळे पोलिस दलात काम करण्यास अजुन जास्त ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या दुहेरी हत्याकांडात दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदाणी हे सरकार पक्षाच्या वतीने एकमेव साक्षीदार होते या आरोपींना शिक्षा होणेकामी लोकचंदानी यांचीही मोलाची भूमिका होती ...
Post a Comment