बेलापूर-(प्रतिनिधी )-सुजाण व समृध्द पिढी घडविण्यासाठी ग्रंथालय गरजेचे असुन खरे ज्ञान हे ग्रंथालयातूनच मिळते असे उदगार बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा ,सतिश पावसे यांनी काढले ग्रंथालय दिनानिमित्त बोलतना.ते पुढे म्हणाले की, आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ रंगनाथन यांचे अनन्य साधारण योगदान आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुले करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांनीच रुजवला .नंतर तो जोपासण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ.रंगनाथन यांनी मांडलेले पाच पुस्तकालय विज्ञान सिद्धांत हे भारतीय पुस्तकालय विज्ञानाचा पाया समजले जातात. डॉ रंगनाथन यांचा वाढदिवस भारतात ग्रंथपाल दिन म्हणून आपण साजरा करतो. यानिमित्ताने वाचन संस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वाढावी यासाठी ग्रंथालयांचे महत्त्व आहे .प्रा. पावसे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण देखील अतिशय महत्वाचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाचे स्थापना केली . ग्रंथालय ही सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालय आवश्यक आहेत .पुढे ते असेही म्हणाले की, वाचनालयांचा ग्रामीण भागात महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालय वाचकाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ग्रंथामुळे स्वतःची माहिती व ज्ञान यात भर पडते . माणूस समृद्ध होतो. त्याचे विचार समृद्ध होतात.वाचनाने माणूस विवेकी बनतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्व वाढत आहे. त्यादृष्टीने ही नव ग्रंथ पालांना ई-लायब्ररीची देखील संधी उपलब्ध झाली आहे .सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे . त्याचा उपयोग करून बुद्धीची मशागत करावी असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय समितीचे प्रा.अशोक थोरात व प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी केले. डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते झाले.प्रा.सुनिल विधाटे यांनी आभार मानले.
Post a Comment