प्रमाणपत्र देण्यासाठी दिड लाखाची लाच घेताना प्राचार्यासह लिपीकास रंगेहात पकडले.
श्रीरामपुर (प्रतिनिधी )-मुलीचे बी एच एम एस पदवी प्रमाणपत्र देण्याकरीता एक लाख ४७ हजार ५०० रुपयांची लाच घेताना होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा येथील प्रभारी प्राचार्य व लिपीका विरुध्द लाचलुचपत विभागाने कारवाई केली असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहै. या बाबत मिळालेली माहीती आशी की तक्रारदार यांच्या मुलीने बी एच एम एस पदवीचे पासींग प्रमाणपत्र तसेच इंटरशिप पुर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्याकरीता मागणी केली त्या वेळी बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे वय ५२धंदा नोकरी प्रभारी प्राचार्य होमीओपँथी मेडीकल काँलेज वडाळा महादेव तालुका श्रीरामपुर राहणार मानुर तालुका राहुरी यांनी हजेरीची अँडजस्टमेंट करुन प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष एक लाख ४५ हजार ५०० रुपयाची मागणी केली आरोपी क्रमांक दोनभारती बापुसाहेब इथापे लिपीक होमीओपँथीक मेडीकल काँलेज वडाळा महादेव यांनी ती रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता दोन्हा आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे पोलीस अधिक्षक सुनील कडासने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर पोलीस निरीक्षक दिपक करांडे हवालदार संतोष शिंदे रमेश चौधरी रविंद्र निमसे वैभव पांढरे संध्या म्हस्के हारुन शेख राहुल डोळसे यांनी सापळा यशस्वी पार पाडला.