Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बेलापुरात केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे पोलीसांनी धडक कारवाई करत अनेक दुकानदारांकडून दंड वसुल केला असुन चार नंतर दुकाने सुरु असल्यास कारवाई करण्याचा ईशारा बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके  यांनी दिला आहे           मा .जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून सर्व व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे  असे असताना बेलापूरात चार वाजेनंतरही अनेक दुकाने सुरुच होती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ गावात फेरी मारुन दुपारी चार नंतर जी दुकाने सुरु होती अशा जवळपास वीस दुकानदारांना दंड ठोठावला आहे कोरोना नियमाचा भंग करणारावर यापुढेही अशीच दंडात्मक कारवाई सुरुच राहणार असुन नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावे असे अवाहन हवालदार लोटके यांनी केले आहे

राहुरी - दि.२९ जून रोजी राहुरी कृषी मंडळात केंदळ बुद्रुक, पिंप्री वळण व देसवंडी या गावांमध्ये मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत कापूस व सोयाबीन पिकांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. यावेळी तज्ञ पर्यवेक्षक तुळशीराम पवार यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी शरद लांबे व भिमराज गडधे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत चर्चेद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. चंद्रकांत म्हसे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली.यावेळी केंदळ बु.येथे सहाय्यक कृषी अधिकारी सोमनाथ बाचकर, शेतकरी प्रमोद तारडे,नामदेव तारडे, प्रल्हाद तारडे, भिमराज चव्हाण, बापूसाहेब मांगुर्डे,सदाशिव तारडे, बापूसाहेब तारडे, विठ्ठल भोसले, गोविंद जाधव व रामेश्वर कैतके उपस्थित होते.पिंप्री वळण येथे सहाय्यक  कृषी अधिकारी मंगेश बनकर, बिरू केसकर, आकाश गोरे, शेतकरी शत्रुघ्न आढाव, भाऊसाहेब पुंड,राजेंद्र गरूड, यशपाल पवार, बजरंग कानडे, मेघवर्मा जाधव, आबासाहेब लहारे,अशोक जरे,धनराज जाधव, बाबासाहेब डमाळे व आरिफ शेख उपस्थित होते.देसवंडी येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती विमल शेंडगे, महिला शेतकरी वैशाली शिरसाठ,शकुंतला शिरसाठ, अनुराधा शिरसाठ, उषा शिरसाठ आदी उपस्थित होत्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- राहुरी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीबाहेर असलेल्या बेलापुर गावातील वाळूच्या गाड्या पकडून त्यांचेवर कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोड करुन त्या सोडून दिल्या असुन अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष  व बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे केली आहे                    जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे दिनांक १९ जुन ते २० जुन च्या रात्री दोन वाजता बेलापुर येथे आले व त्यांनी पढेगाव रोडवरुन वाळू वहातूक करणारी वाहने पकडून बेलापुर चौकातुन नेली या वाहनधारकाकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वसुली करण्यात आली असुन हे सर्व सी सी टी व्ही कँमेर्यात कैद झाले आहे त्यांची हद्द नसतानाही ते श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे आपल्या चार सहकार्यासमवेत आले त्यांनी वाळूच्या गाड्याही पकडल्या परंतु नंतर आर्थिक तडजोडी करुन त्या गाड्या सोडून देण्यात आलेल्या आहेत यात फार मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण झालेली आहे ज्या गाडीने पी एस आय शिंदे आले होते ती गाडी शिंदे यांच्या मुलाच्या नावावर आहे पी एस आय शिंदे यांनी केलेले कृत्य हे पोलीस खात्याला काळीमा फासणारे आहे आपल्या सारख्या कर्तबगार आधिकार्याच्या कार्यक्षेत्रात आशा प्रकारे कृत्य करत असेल तर न्याय कुणाकडे मागावा ही लुट म्हणजे  कायद्याचे ज्ञान असणारांनी टाकलेला दरोडाच नव्हे काय  ? त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुथा यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भाजपाच्या वतीने श्रीरामपुरात करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात श्रेयवादावरुन चाललेली धुसफुस अखेर चव्हाट्यावर आली असुन कार्येकर्त्या समोरच पदाधिकार्यांनी एकमेकावर तोंड सुख घेतल्याने कार्येकर्त्यांनी याचा काय आदर्श घ्यावयाचा हाच प्रश्न निर्माण झाला आहे                                       महाअघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यांआंदोलना नंतर तहसीलदार श्रीरामपुर यांना निवेदन द्यावयाचे ठरले होते परंतु तहसीलदार कार्यालयात नाहीत असे  भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकार्याने सांगितले त्यामुळे बेलापुररातील सुनिल मुथासह काही कार्येकर्ते निघुन गेले त्या नंतर त्याच पदाधिकार्यांने तहसीलदार साहेब कार्यालयात आले असुन आपल्याला निवेदन देण्यास जायचे आहे असे सांगताच बेलापुर येथील भाजपाचे पदाधिकारी प्रफुल्ल डावरे यांनी याचा जाब विचारला सुनिल मुथा सह काही कार्येकर्ते निघुन गेल्यावरच निवेदन देण्याचे का ठरविले असा जाब विचारताच भाजपाच्या जबाबदार पदाधिकार्याने जाब विचारणारे भाजपाचे पदाधिकारी डावरे यांना सर्वासमोर शिवी दिली त्यामुळे डावरे यांनी देखील मागेपुढे न पहाता त्याच भाषेत साडेतोड उत्तर दिले सर्व कार्येकर्त्यासमोरच पदाधिकार्यात एकमेकांना शिव्याची लाखोली वाहीली जात होती आंदोलन राहीले बाजुला परंतु श्रेय वादावरुनच भाजपा पदाधिकारी आपापसात भिडले एकमेकांना मनसोक्त अरेरावी शिवीगाळ झाल्यानंतर सुनिल मुथाही पुन्हा त्या ठिकाणी आले बेलापूरातील भाजपाचे कार्येकर्ते व मुथा समर्थक तातडीने जमा झाले परंतु  तो पर्यंत श्रीरामपुरातील ते पदाधिकारी निघुन गेले होते नाही तर मुद्द्याची श्रेयवादाची लढाई गुद्द्यापर्यत पोहोचली असती आता हा श्रेय वादाचा चेंडू जिल्हाध्यक्ष याच्या कोर्टात पोहोचला आहे.

मुंबई-राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळांसंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.जमावबंदी कशी असेल?nजमावबंदीच्या आदेशानुसार आपत्ती म्हणून कोविड-१९ जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. nखुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही. एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कार्यक्रम असतील तर कार्यक्रमांमध्ये पुरेसा कालावधी असावा.nसंमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार मार्गदर्शक एसओपींचे उल्लंघन होत असेल तर त्या आस्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि कोविड आपत्ती असेपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही. जर एखाद्या ठिकाणी खाण्यापिण्यासह संमेलन असेल अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची  अंमलबजावणी केली जाईल.

 धार्मिक स्थळे - स्तर तीन, चार आणि पाचमध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील.

1)जमावाचे सर्व नियम पाळून स्तर एकमधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील.

2)स्तर तीन, चार आणि पाचमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धार्मिक स्थळे बंद असतील. जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, अशा धार्मिक स्थळी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. 

3)कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल. अपवाद : कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी, वैद्य कौशल्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणारे कौशल्य केंद्रे हे अपवाद असतील. अशा प्रकारच्या वर्गांवर कोणतेही निर्बंध नसतील. क्षमतेच्या अटीवर हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी चालू राहतील. सुविधांचा उपयोग निर्बंधांना अनुसरूनच करावा.

पाहुण्यांसाठी हॉटेल उघडी-पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल. तरीही वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी आस्थापनेवर असेल.   पर्यटन स्थळे प्रशासन कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकतात. यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सिजन बेड हे निकष नसतील. या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. जर हे पर्यटनस्थळ स्तर पाचमध्ये असेल तर ई-पासशिवाय कोणत्याही अभ्यागतांना तेथे येण्याची परवानगी नसेल. पाहुणे स्तर पाचमधील असतील तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात राहावे लागेल. 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका महिलेच्या  गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे गंठण चोरण्याचा प्रकार थत्ते ग्राऊंड परिसरातील उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंटसमोर घडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत साई उत्सव अपार्टमेंट, उत्सव मंगल कार्यालयाजवळ, वॉर्ड नं.7 श्रीरामपूर  येथे राहणार्‍या अश्विनी वैभव गोडसे (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 जून 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी साई उत्सव अपार्टमेंटच्या पार्किंगसमोर उभा असताना एक अज्ञात इसम तेथे आला आणि त्याने पत्ता विचारला. पत्ता विचारण्याचा बहाणा करून माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने धक्का देवून ओढून घेतले आणि गेटबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून आरोपी पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अश्विनी गोडसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत कलम गु.र.नं. 419/ 2021 प्रमाणे भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान सुरवडे करीत आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर निवड व्हावी अशी विनंती स्वरूप मागणी श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे करण्यात आली आहे. 

   आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डीचे साईबाबा संस्थान हे जगात श्रद्धाभावाचे तीर्थस्थान आहे.श्रद्धा आणि सबुरी ही  जीवनमूल्ये जपणारे, चरित्र आणि चारित्र्य,अभ्यास आणि भक्तीध्यास, संस्कृती आणि सदवृत्ती,शुद्धविचारांची पत्रकारिता, सामाजिक सेवाभाव,साहित्य आणि  परंपरा अशा गुणवत्तेने वाटचाल करणारे पत्रकार प्रकाश कुलथे जिल्ह्यातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत. श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, राज्य  अधिस्वीकृती समितीचे सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त उपाध्यक्ष, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णंकार संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक  उपाध्यक्ष,वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर संस्थेचे उपाध्यक्ष, साहित्य प्रबोधन मंच, श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष, टाकळीभान येथील साहित्य परिवाराचे संस्थापक सदस्य, वर्ल्ड सामनाचे मुख्य संपादक, दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अशा विविध संस्था आणि सेवाकार्यात सदैव सहभागी असलेले पत्रकार प्रकाश कुलथे हे श्रीसाईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा आदर्श जपत कार्य करतील असा आम्हा साहित्यिकांना विश्वास आहे, तरी त्यांची साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी निवड व्हावी अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते अविनाश आपटे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा डॉ बाबुराव उपाध्ये, नामदेवराव देसाई, सुखदेव सुकळे, डॉ.  शिवाजी काळे,कवी  पोपटराव पटारे, डॉ रामकृष्ण जगताप,कवयित्री  संगीता फासाटे कटारे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, पत्रकार शौकतभाई शेख,आदी साहित्यिक, पदाधिकारी यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget